Nanded supermarket fire Saam TV
महाराष्ट्र

Nanded : नांदेडमध्ये सूपरमार्केटमध्ये अग्नितांडव! ३ कोटींचं साहित्य खाक|VIDEO

Nanded supermarket fire : नांदेड शहरातील हिंगोली गेट परिसरात पंपटवार किराणा सुपरमार्केटमध्ये मध्यरात्री भीषण आग लागली. आगीत सुमारे ३ कोटी रुपयांचे साहित्य जळून खाक, जीवितहानी नाही.

Namdeo Kumbhar

Nanded Fire News : नांदेड शहरातील हिंगोली गेट परिसरात पंपटवार किराणा सुपरमार्केटमध्ये अचानक भीषण आग लागली. या आगीत कोट्यवधी रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. सोमवारी मध्यरात्री रात्री ही आग लागली होती . आग इतकी भीषण होती की संपूर्ण दुकान आणि घराला अगीने वेढले होते. आग विझवण्यासाठी अग्निशामन दलाच्या १८ गाड्या कार्यरत होत्या. आगीमध्ये तीन कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचे समजतेय.

आगीबाबत माहिती मिळताच अग्निशमन दल आग विझविण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या 18 गाड्या आग विझवण्यासाठी प्रयत्न करत होत्या. या इमारतीत पंपटवार कुटुंब राहते, ज्यांचेकडे सुपरमार्केट आणि किराणा दुकान आहे. आगीची माहिती मिळताच कुटुंबातील सर्व सदस्य आणि 12 भरलेले सिलिंडर सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. आणि काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला.

आगीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले पण कोणतीही जीवितहानी झाली नाही. भोईमुंग, सोया आणि तेलाच्या टाक्या जळून खाक झाल्या. या सुपरमार्केटमध्ये गहू, तांदूळ, डाळी, सुकामेवा अशा सर्व प्रकारच्या किराणा मालाला आग लागल्याने सर्व सामान जळून खाक झालाय. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली की अन्य कारणामुळे लागली हे अद्याप कळू शकलेले नाही. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना आग आटोक्यात आणण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे अग्निशमन विभागाचे कर्मचारी गेल्या सहा तासांपासून ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत अग्निशमन दलाच्या 18 गाड्या तैनात करण्यात आल्या आहेत आणि आग विझवण्याचे काम अजूनही सुरू आहे. या भीषण आगीत सुमारे 3 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT