Fire In Nallasopara Saam Tv
महाराष्ट्र

Fire In Nallasopara : नालासोपाऱ्यात अग्नितांडव; भंगार गोडाऊनला भीषण आग, 6 अग्निबंब घटनास्थळी

नालासोपाऱ्यातून आगीचं मोठं वृत्त समोर येत आहे. नालासोपाऱ्यात एका एका भंगाराच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली आहे.

चेतन इंगळे

Nallasopara Fire News : नालासोपाऱ्यातून आगीचं मोठं वृत्त समोर येत आहे. नालासोपाऱ्यात एका एका भंगाराच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली आहे. रविवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास आग लागल्याची भीषण घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपाऱ्यातील भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग (Fire) लागली आहे. नालासोपारा पश्चिमेकडील नालासोपारा रोड येथील खंबलेश्वर मंदिराजवळील भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे.

रविवारी सांयकाळी साडेसातच्या सुमारास ही आगीची दुर्घटना घडली आहे. या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. गोडाऊन जवळ उपस्थित लोकांनी तातडीने अग्निशमन दलाला आगीच्या दुर्घटनेची माहिती दिली. या भीषण आगीत गोडाऊनमधील सर्व भंगाराचं सामान जळून खाक झाले आहे. (Maharashtra Latest News)

भंगाराच्या गोडाऊनला आग लागल्याची खबर मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचले. या भीषण आगीमुळं अग्निशमन दलाचे ६ अग्निबंब घटनास्थळी आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू केले आहे.

मात्र, अद्याप गोडाऊनची आग आटोक्यात आलेली नाही. या आगीत जीवितहानी झाली का, याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही. परंतु गोडाऊनमधील सर्व भंगार जळून खाक झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: मुंबईने पंजाबचा खेळ बिघडवला! आता प्लेऑफचं समीकरण काय? कुणाला किती संधी? वाचा नेमकं गणित

Face Care: पिंप्लस, डाग आणि टॅनिंग कमी करायची आहे? मग हा घरी तयार केलेला कुलिंग फेसपॅक करा ट्राय

Maharashtra News Live Update: डॉ.आनंद नाडकर्णींच्या पार्थिवाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं अंत्यदर्शन

राज्यातील प्रशासनात उलटफेर; 4 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Yavtmal : ह्रदयद्रावक! खेळता खेळता कुलरजवळ गेला, पाण्यात हात घालताच शॉक लागून १४ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT