Vangani Crackdown: Over 100 Illegal Houses Demolished In Major Action Against Chawl Mafia saam tv
महाराष्ट्र

वांगणीत चाळ माफियांना दणका; 100 हून अधिक अनधिकृत घरांवर प्रशासनाने फिरवला बुलडोझर

Vangani 100 Illegal House Demolished : महसूल विभागाने वांगणीच्या एकविरा नगर परिसरातील १०० हून अधिक अनधिकृत घरे पाडली आहेत. ही कारवाई अवैध बांधकामे आणि चाळ माफियांच्या कारवायांवर कडक प्रहार म्हणून पाहिली जात आहे.

Mayuresh Kadav

  • एकविरा नगर भागात महसूल विभागाची मोठी कारवाई.

  • 100 हून अधिक अनधिकृत घरे जमीनदोस्त

  • बेकायदेशीर बांधकामांवर प्रशासनाने फिरवला बुलडोझर

वांगणीतल्या अनधिकृत चाळींवर अखेर महसूल विभागानं हातोडा चालवला. वांगणी पश्चिमेकडील एकविरा नगर भागात धडक कारवाई करत महसूल विभागानं 100हून अधिक घरं जमीनदोस्त केली आहेत. या कारवाईमुळे चाळमाफियांचे धाबे दणाणले आहेत. महत्वाचं म्हणजे या चाळींमध्ये बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांचं वास्तव्य वाढत असल्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे या कारवाईनं गुन्हेगारांनाही चाप बसणार आहे.

वांगणी ग्रामपंचायत हद्दीत चाळ माफियांनी उच्छाद मांडला होता. वांगणी पश्मिमेकडे मोठ्या प्रमाणात अनधिकृत चाळींचं बांधकाम करण्यात आलं होतं. सोशल मीडियात स्वस्त घरांच्या फसव्या जाहिराती करत त्याची गोरगरीबांना विक्री केली जात होती. या चाळ माफियांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या जागेतही अवैध बांधकामं केली होती. याबाबत अनेकदा तक्रारी झाल्यानंतर वांगणीच्या सरपंच वनिता आढाव यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता.

त्यानंतर अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी यांनी मोठ्या फौज फाट्यासह वांगणीत धडक कारवाई केली. या कारवाईत जवळपास 100 हून अधिक घरं जमीनदोस्त करण्यात आली आहेत. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागानेही राज्य महामार्गावरील अतिक्रमाणांवर कारवाई केलीय.

डिसेंबर 2025 मध्ये सरपंच वनिता आढाव यांच्या नेतृत्वात भाजपचे ज्येष्ठ नेते विजय पावसकर, ग्रामपंचायत सदस्य दिपाली कांबरी, अभिजीत शेलार, भाजप शहरप्रमुख सचिन शेलार, राष्ट्रवादी शहराध्यक्ष भुषण देशमुख, प्रमोद शेलार, सईद गाजी यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार अमित पुरी यांची भेट घेत एक निवेदनही दिलं होतं. त्यानंतर तहसीलदारांनी स्वत: पाहणी करून या बांधकामांबाबत आढावा घेतला होता. या बांधकामधारकांना नोटीस बजावून खुलासा करण्यास सांगितलं होतं. मात्र ते दिलेल्या मुदतीत योग्य खुलासा करू शकले नाहीत. त्यामुळे या चाळी जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत.

या कारवाई प्रकरणी तहसीलदार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वांगणीत अनधिकृत बांधकामे वाढल्याने बेकायदेशील कृत्य करणारे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक वांगणीत वास्तव्यास येऊ लागले आहेत. त्यामुळे गुन्हेगारीचं प्रमाण वाढण्याची भीती लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आल्याचं तहसीलदार अमित पुरी यांनी सांगितलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घाई करू नका, किरकोळ खर्च वाढणार; ५ राशींच्या लोकांना दिवसभरात घ्यावा लागणार मोठा निर्णय

Fort In Mumbai : गर्दीपासून दूर असलेला मुंबईचा ऐतिहासिक खजिना, खूप कमी लोकांना माहितेय 'हा' किल्ला

OTT Releases: वीकेंडचा काही प्लॅन नाही? मग घरीच OTT वरच्या 'या' ७ जबरदस्त वेब सिरीजचा आनंद घ्या

Maharashtra News Live Update: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, दोन जखमी

संतापजनक! रूम रिकामी ठेवू पण मराठी लोकांना देणार नाही; मुंबईमध्ये शिंदे कुटुंबाला घर नाकारलं

SCROLL FOR NEXT