Political contest intensifies in Massajog as a new challenger enters the bypoll against late Sarpanch Santosh Deshmukh’s wife. Saam tv
महाराष्ट्र

Massajog Sarpanch : संतोष देशमुखांच्या पत्नीचा सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभव, कोण झालं विजयी?

Massajog Sarpanch By-Election : बीडमधील मस्साजोग सरपंच पोटनिवडणुकीत अश्विनी देशमुख यांचा पराभव झाला असून स्वरूपानंद देशमुख यांनी ९२ मतांनी विजय मिळवला. या निवडणुकीत तब्बल ८४ टक्के मतदान झाले.

Namdeo Kumbhar

Massajog sarpanch by election result Beed district 2026 : बीडमधील मस्साजोग येथील सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव झाला आहे. स्वरूपानंद देशमुख यांचा ९२ मतांनी विजय झाला आहे. बीडमधील मस्साजोग सरपंचपदाच्या पोट निवडणूक चुरशीची लढत झाली. यामध्ये अश्विनी देशमुख यांचा पराभव झाला. आता मस्साजोगचे नवीन सरपंच स्वरूपानंद देशमुख असतील.

बीडमधील केज तहसील कार्यालयात मस्साजोगच्या पोट निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेसाठी ३ टेबलांची व्यवस्था करण्यात आली होती. मंगळवारी झालेल्या मतदानात एकूण २०८० मतदारांपैकी १७४४ मतदारांनी आपला हक्क बजावला होता. त्यामुळे गावात एकूण ८४ टक्के मतदान झाले आहे.

मस्साजोग सरपंचपदाच्या निवडणुकीत अश्विनी संतोष देशमुख यांचा पराभव झाला असून स्वरुपानंद देशमुख विजयी झाले आहेत. स्वरुपानंद देशमुख यांचा ९२ मतांनी विजय झाला. या विजयानंतर गावात गुलाल उधळण्यात आला आणि ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष साजरा करण्यात आला. स्वरूपानंद यांना खांद्यावर घेत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. या पोटनिवडणुकीत ८४ टक्के विक्रमी मतदान झाले होते, त्यामुळे मतदारांमधील उत्सुकता दिसून आली होती. निकालानंतर अश्विनी संतोष देशमुख यांना मोठा धक्का बसलाय.

माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोट निवडणूक घेण्यात आली होती. ही सरपंचपदाची निवडणूक बीड जिल्ह्यात अत्यंत भावनिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात होती. संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी अर्ज भरल्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. पण स्वरूपानंद देशमुख यांच्या बाजूने मतदारांनी कौल देत सर्वांनाच धक्का दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Tourism : सुट्टीमध्ये करा पुणेकरांच्या आवडत्या वीकेंड डेस्टिनेशनची सफर, 'हे' ठिकाण पावसाळ्यात मन मोहून टाकते

Brain Tumor Symptom: हे 1 सायलेंट लक्षण दिसलं तर समजा मेंदूमध्य तयार होतोय ट्यूमर

Maharashtra News Live Update: पुण्यात कॉक्रोज जनता पार्टीचं आंदोलन

Tuesday Horoscope : रोमॅंटिक दिवस जाईल, ५ राशींचे भाग्य उजळणार, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

आंध्र प्रदेशातील स्टील प्रकल्पात मोठा स्फोट; ८ मजुरांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT