Karnataka Hijab Row Live Updates Saam TV
महाराष्ट्र

Hijab News: हिजाब, शिक्षण आमच्या हक्काचे! साेलापूरात महिला आंदाेलकांना पाेलिसांनी घेतलं ताब्यात

साेलापूरात हिजाब समर्थनार्थ माेर्चा

विश्वभूषण लिमये

सोलापूर : हिजाब परिधान करण्याच्या समर्थनार्थ आजही सोलापुरात (solapur) पडसाद उमटले. सलग दुसऱ्या दिवशीही हिजाब बंदीच्या विरोधात साेलापूरात निदर्शने सुरु झाली आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्यावतीने कामगार नेते नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली आज मोर्चा काढण्यात आला आहे. हिजाब (hijab) , शिक्षण हे सारं आमच्या हक्काचे आहे असं आंदाेलकांनी सांगत कर्नाटक सरकारचा (karnatak) निषेध केला. (Karnataka Hijab Row Live Updates)

जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कम्युनिस्ट पार्टीने निदर्शने केली. यावेळी धर्मांध धृवीकरणाच्या विरोधात धर्मनिरपेक्ष जनतेने एक होण्याचे आवाहन माजी आमदार नरसय्या आडम यांनी केले. यावेळी आंदाेलक आक्रमक झाल्याने पाेलिसांनी कामगार नेते माजी आमदार नरसय्या आडम (narsayya adam) यांच्यासह आंदाेलकांना ताब्यात घेतलं.

यावेळी आंदाेलन करणा-या महिलांपैकी एक महिलेने हिजाब वरुन सुरु असलेला वाद हा विनाकारण केला गेला असल्याचं नमूद केले. काेणत्याही न्यायालयानं अद्याप त्यावर हिजाब परिधान करण्यावर बंदी घातलेली नाही. शिक्षण (education) आमचं हक्काचे आहे. ते घेण्यासाठी जात असलेल्या मुलीनं हिजाब घातलं म्हणून तिला दूर ठेवता हे कसलं सरकार म्हणायचे. बुरखा हा आमचा हक्क आहे. ताे आम्ही परिधान करणारच असं ठणकावून महिलेने नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paneer Paratha: घरच्या घरी बनवा ढाबा स्टाईल पनीर पराठा; नाश्त्याचा बेत होईल भारी

By-Election: बारामती-राहुरी पोटनिवडणुकीत 'मविआ'चा धर्म की राष्ट्रवादीला साथ? उद्धव ठाकरे काय करणार?

Pune : शक्तिवर्धक औषध घेणं जिवावर बेतलं ! धावता-धावता मानसिक संतुलन बिघडलं, पोलीस भरती दरम्यान घडला भयानक प्रकार

Maharashtra Live News Update : सोलापूरमध्ये अवकाळी पाऊस-गारपिटीचा कहर; 3 एकर पपईची बाग उद्ध्वस्त, शेतकरी हतबल

Marathi Singer Death: प्रसिद्ध मराठमोळा गायक कालवश; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, संगीतविश्वात शोककळा

SCROLL FOR NEXT