yavatmal, valentines day, love, police saam tv
महाराष्ट्र

Valentine's Day 2023 : मै तेरा बॉयफ्रेंड तू मेरी गर्लफ्रेंड..., सूत जुळताच लैंगिक संबंध ठेवले अन् पुढं घडलं अघटित

मुलाच्या चकरा वाढल्या. दोघांचे प्रेम बहरत गेले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- संजय राठाेड

Valentine's Day : एका तेवीस वर्षीय युवतीशी मैत्री (girl friend) करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिला लग्नाची (marriage) स्वप्न दाखवत वारंवार तिचे लैंगिक शोषण केले. पीडित मुलीने (girl) आपण लग्न कधी करणार असे विचारल्यावर लग्नास नाकार दिल्याने युवतीने फसवणूक करणाऱ्या प्रियकराच्या (boy friend) विराेधात पाेलिसांत (police) तक्रार केली. यवतमाळच्या (yavatmal) मारेगाव पोलिसांनी व्हॅलेंटाईन डेच्या (Valentine's Day) दिवशी प्रियकराला बेड्या (arrest) ठोकल्या.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी - मुलीच्या घराजवळच मुलाचे परिचित राहायचे. त्या परिचिताच्या घरी मुलगा यायचा. एक दिवस अचानक त्याची शेजारी राहणा-या एका मुलीवर नजर पडली. पहिल्या नजरेत प्रेम झाले. मुलाच्या चकरा वाढल्या. दोघांचे प्रेम (Love) बहरत गेले.

दोघांमध्ये संबंध निर्माण झाले. मात्र आधी लग्नाला हो म्हणून लाडाई गोडाई करणारा प्रेमवीर अचानक बदलला. त्याने लग्नास नकार दिला. अखेर फसवणूक झाल्याचे कळताच मुलीने मालेगाव पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली व ऐन व्हॅलेंटाईन डेलाच मजनू गजाआड झाला.

अंकित सोयाम असे प्रेमवीराचे नाव आहे. तो वणी तालुक्यातील गणेशपूर येथील रहिवासी आहे. चार वर्षाचे प्रेम अचानक तुटल्याने मुलीला धक्का बसला. तिने ही घटना आपल्या आई वडिलांना सांगितली. त्यानंतर मुलीसह पालकांनी मारेगाव पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी अंकित सोयाम विरुद्ध (भादंविच्या कलम 376, 376 (3), 506) गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली. पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी करीत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Rule : 1 ऑक्टोबरपासून सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम! ATM ते LPG पर्यंत 5 नवे नियम लागू, वाचा सविस्तर

Maharashtra News Live Update: २ तारखेच्या सीजेपीच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा- उद्धव ठाकरे

Car tyre replacement: किती किलोमीटर्सनंतर कारचे टायर बदलले पाहिजेत?

Maharashtra Politics : राज ठाकरे इंडिया आघाडीत जाणार? संजय राऊतांचं मोठं विधान

Railway Ticket: रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! तिकीटासोबत हे ओळखपत्र सोबत ठेवा, नाहीतर भरावा लागेल दंड

SCROLL FOR NEXT