मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन; धनंजय मुंडेंनी केलं हुतात्म्यांना अभिवादन   विनोद जिरे
महाराष्ट्र

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन; धनंजय मुंडेंनी केलं हुतात्म्यांना अभिवादन

हे महाविकास आघाडी सरकार नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विनोद जिरे

बीड : बीडमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे. यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शहरातील राजीव गांधी चौक परिसरात असणाऱ्या, हुतात्मा स्मारकाला मानवंदना देत पुष्पचक्र अर्पण करून, आदरांजली वाहिली आहे. त्याचबरोबर पोलीस मुख्यालय या ठिकाणी मुख्य शासकीय ध्वजारोहण देखील पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते संपन्न झाले.

हे देखील पहा-

दरम्यान यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने हुतात्म्यांना ३ राऊंड फैरी झाडत मानवंदना देण्यात आली. दरम्यान यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, आमदार संजय दौंड, जिल्हाधिकारी राधाबीनोद शर्मा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी देखील पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आहे.

यावेळी स्वातंत्र्यसैनिकांसह विविध मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते. दरम्यान अतिवृष्टीने नुकसान झालेल्या, शेतकऱ्यांच्या पाठीशी महाविकास आघाडी सरकार खंबीरपणे उभे आहे. तसेच पीकविमा कंपनीला पीकविमा द्या. असे ठासून सांगू, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी मीडियाशी बोलतांना दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zodiac signs fortune: 24 डिसेंबरचा दिवस ठरणार करिअर टर्निंग पॉइंट? ‘या’ 4 राशींचं नशीब चमकणार

Tirgrahi Yog: 200 वर्षांनी मकर संक्रातीला बनणार त्रिग्रही राजयोग; या राशींच्या व्यक्तींना मिळणार धनदौलत आणि राजेशाही सुख

Thackeray Brothers : महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक क्षण! आज दुपारी 12 वाजता घोषणा, ठाकरे बंधूंची युती कुठे कुठे होणार?

New Rules 2026: १ जानेवारी २०२६ पासून ६ नियम बदलणार, कर्मचाऱ्यांपासून ते शेतकऱ्यांवर होणार परिणाम, वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का, दोन माजी नगरसेवकांचा ही जय महाराष्ट्र

SCROLL FOR NEXT