Aurangabad News Saam Tv
महाराष्ट्र

Marathwada Liberation Day: मुख्यमंत्र्यांचा निषेध म्हणून शिवसेनेच्या वतीने अभिवादनाचा कार्यक्रम

शिवसेनेकडून पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी ध्वजारोहण केलेल्या ठिकाणी अभिवादन करण्यात आले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवनीत तापडिया

औरंगाबाद - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाल्यानंतर शिवसेनेच्या वतीने 9 वाजता अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. सकाळी 9 वाजता होणारे ध्वजारोहण 7 वाजताच करण्यात आलं. याचा निषेध म्हणून शिवसेनेकडून पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी ध्वजारोहण केलेल्या ठिकाणी 9 वाजता अभिवादन करण्यात आले आहे. यावेळी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) उपस्थित होते.

हे देखील पाहा -

यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, केंद्र सरकारने मराठवाडा मुक्ती दिनाच्या कार्यक्रमाची वेळ ठरवून दिलेली आहे. दरवर्षी 9 वाजता हा कार्यक्रम होतो. यावर्षी देखील वेळेवरच कार्यक्रम घ्यायला हवा होता. परंतु, मुख्यमंत्र्यांना हैदराबादला जायचे असल्याने त्यांनी कार्यक्रम लवकर घेतला तरी देखील आम्ही शिवसेनेच्या वतीने बरोबर नऊ वाजता या ठिकाणी शहिदांना अभिवादन करण्यासाठी आलो आहे.‌ खासदार इम्तियाज जलील हे दरवर्षीच या कार्यक्रमाला अनुपस्थित असतात. आम्ही टीका करतो म्हणून हुशारी करत आधीच मीडियाला सांगून ते विदेश दौऱ्यावर गेले आहेत अशी टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी केली आहे.

पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा हे शहरात असतानाही मुख्यमंत्र्यांच्या शासकीय कार्यक्रमाला आले नाही यावर खैरे म्हणाले की, यावरून त्यांच्याच किती जमत असेल असे स्पष्ट होते. दौलताबादला जो भाजपचा कार्यक्रम आहे. त्या ठिकाणी ते गेले आहेत आम्ही त्या ठिकाणी जाणार होतो परंतु तो भाजपचा राजकीय कार्यक्रम असल्याने आम्ही त्या ठिकाणी गेलो नाही. असे वक्तव्य शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबाद येथील सिद्धार्थ उद्यानात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त अभिवादन केल्यानंतर केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! eKYCच्या नावाखाली फेक वेबसाइट; नेमकं सत्य काय?

Maharashtra Live News Update: उल्हासनगरमध्ये कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग

Mumbai News : बोरिवली स्टेशनवर फिल्मी स्टाईल दरोडा, ६ जणांनी लाखो रूपयांवर केला हात साफ

Marathwada Floods : बँकांनीही आवळला शेतकऱ्याभोवती फास; सरकारी बँकांचा, सावकारी कारभार, VIDEO

Cylinder Price: दसऱ्याआधी महागाईचा चटका, गॅस सिलिंडरच्या दरात वाढ, जाणून घ्या नवीन दर

SCROLL FOR NEXT