'मराठवाडा आर्थिक मंथन कार्यक्रमास' केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांची उपस्थिती! दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

'मराठवाडा आर्थिक मंथन कार्यक्रमास' केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांची उपस्थिती!

आज राज्यस्तरीय बँकर्स समिती आणि बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने मराठवाडा आर्थिक मंथन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

लातूर : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Bhagvat Karad) हे लातूर जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांच्या उपस्थितीत आज राज्यस्तरीय बँकर्स समिती आणि बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने मराठवाडा आर्थिक मंथन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्याच्या इतर भागाच्या तुलनेत मराठवाड्यात बँकेचे म्हणावे तसे जाळे नाही. त्यामुळे मराठवाड्यात बँकांचे जाळे अधिकाधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हे देखील पहा :

याशिवाय एटीएम (ATM) संख्या वाढविणे, बँक उघडताना येणाऱ्या अडचणी, सर्वसामान्य नागरिकांना बँकांचे कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी तसेच बँकांशी (Bank) निगडित सर्वसामान्य नागरिकांना येणाऱ्या अडचणीवर मंथन यावेळी करण्यात आले. यावेळी मराठवाड्यातील (marathwada) नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर, उस्मानाबादचे शिवसेना खा. ओमराजे निंबाळकर यांची उपस्थिती होती.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चालत्या दुचाकीवर बिबट्याचा हल्ला; युवती जखमी

Face Care: चेहऱ्यावर वारंवार दिसतात व्हाइटहेड्स? डॉक्टरांनी सांगितलेले सोपे उपाय नक्की करुन बघा, ५ दिवसात दिसेल फरक

Thumb sucking in children: लहान बाळांची अंगठा चोखण्याची सवय कशी मोडाल?

उरलेल्या चपाती फेकू नका! बनवा चटपटीत पदार्थ, न खाणारेही चाटून पुसून खातील

iPhone खरेदी करणाऱ्यांना मोठा धक्का! नवीन मॉडेल्सच्या लाँचनंतर iPhone 17, iPhone 16 आणि iPhone Air महागले

SCROLL FOR NEXT