वेळापूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांनी मंगेश तुपे या तरुणाला मारहाण केली. यानंतर आमदार उत्तम जाणकार आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील आक्रमक होऊन थेट पोलीस ठाण्यात आंदोलनात बसले होते. तब्बल दोन तासाच्या आंदोलनानंतर संबंधित सहाय्यक पोलीस निरीक्षक गोसावी यांची तात्काळ बदली करून निलंबित करण्याच्या आश्वासनानंतर आमदाराने खासदारांचे आंदोलन थांबले आहे. आमदार व खासदार यांनी वेळापूर पोलीस ठाणे आणि येथील अधिकारी भाजपच्या दबावात काम करत असल्याचा आरोपही या निमित्ताने केला.
मुलुंड पश्चिम येथील सरदार तारासिंग उद्यानाजवळ असलेल्या साई प्रस्थ येथे बिबट्या आल्याने स्थानिक नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री उशिरा बिबट्याने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून साई प्रस्थ येथे येऊन कुत्र्याची शिकार केली. या भागात असलेल्या सीसीटीव्ही मध्ये बिबट्या दिसून आल्याने आता नागरीकांची झोप उडाली आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला अनेक ठिकाणी संरक्षक भिंत नसल्याने अनेकदा शिकारीच्या शोधात बिबटे नागरी वस्तीत येतात. घाटकोपर ते मुलुंड या भागात अनेकदा बिबट्यांनी नागरीकांवर जीवघेणे हल्ले केले आहेत.
माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त धुळे तालुक्यातील कापडणे गावात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या रक्तदान शिबिरामध्ये ग्रामस्थांमध्ये महिलांची संख्या लक्षवेधी ठरली आहे, यावेळी गावातील महिलांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले आहे,
धुळे तालुक्यातील कापडणे येथे माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले, यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी एकत्र येत रक्तदान शिबिरामध्ये आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला, यावेळी पुरुषांसह मोठ्या संख्येने महिलावर्ग या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याचे बघावयास मिळाले आहे.
निझामाबादचे भाजप खासदार अरविंद धर्मापुरी यांनी तेलंगणा मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याविरुद्ध ट्विन्सबद्दल केलेल्या “असंवेदी” भाषणाबद्दल तक्रार दाखल केली आहे. त्यांनी म्हटले की अशा विधानामुळे दुहेरी शरीराच्या मुलांसंबंधी समाजात वाईट संदेश जाण्याचा धोका आहे आणि याप्रकरणी अधिकारी कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. ही तक्रार संबंधित अधिकाऱ्यांकडे अधिकृतपणे नोंदवण्यात आली आहे.
उबेर च्या ड्रायव्हरच्या मोबाईल मधील हा स्क्रीन शॉट आहे, लाल रंग म्हणजे गाड्यांची कमतरता त्या भागामध्ये कंपनीला जाणवत आहे, जवळपास संपूर्ण मुंबईमध्ये गाड्यांचे मोठ्या प्रमाणात कमतरता आहे, 70 ते 80 टक्के गाड्या रस्त्यावर नाही, त्यामुळे ट्रॅफिक जाम मध्ये सुद्धा आपल्याला फरक जाणवत असेल.
नक्कीच, दरवेळेस जे दीर्घकालीन बंद असतात त्यापेक्षा या एक दिवसीय बंद चा परिणाम थोडा कमीच जाणवेल, कारण एक दिवसीय बंद मध्ये कार्यकर्त्यांना जनजागृती करायला जास्त वेळ मिळत नाही. परंतु उत्स्फूर्तपणे एवढ्या मोठ्या संख्येने संपूर्ण राज्यामध्ये रिक्षा आणि कॅबचालकांनी बंदला प्रतिसाद देणे हे त्यांच्यामध्ये सरकार आणि कंपन्यांबद्दल असणारा रोष किती मोठ्या प्रमाणात आहे याचे ज्वलंत उदाहरण आहे.
पिंपळनेर वनपरिक्षेत्रातील धामणधर गावालगतच्या जंगल परिसरात वनविभागाने मोठी कारवाई करत अवैध सागवान तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त केले आहे, मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वनपरिक्षेत्र अधिकारी ओंकार ढोले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कंपार्टमेंट नंबर 210 मध्ये धडक कारवाई केली आहे.
जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी आज जिल्हाभरात मोठी लगबग पाहायला मिळाली. भंडारा शहरातील चार मुख्य परीक्षा केंद्रांवर आज ही परीक्षा अत्यंत उत्साहात पार पडली. भविष्यातील अधिकारी आणि संशोधक घडवणाऱ्या या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी सकाळपासूनचं केंद्रांवर गर्दी केली होती. जवाहर नवोदय विद्यालयातील दर्जेदार शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी दरवर्षी ही स्पर्धा परीक्षा घेतली जाते. केवळ अभ्यासाचे ओझे न घेता, मुले एका वेगळ्याच उत्साहात परीक्षेला सामोरे जाताना दिसली. अनेक केंद्रांच्या बाहेर पालकांनी आपल्या पाल्याला शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी शिक्षण विभागातर्फे भरारी पथके तैनात करण्यात आली होती. एकंदरीतच, भंडाऱ्यातील या चार परीक्षा केंद्रांवर आज केवळ परीक्षाच नव्हती, तर या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्याची एक मोठी पायरी होती.
ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराने भाजपच्या बुथवर राडा केल्याची घटना समोर आली आहे. बजाज नगर येथील मतदान केंद्रापासून अवघ्या २०० मीटर परिसरात हा गोंधळ झाला. अनिल चोरडिया असे उमेदवाराचे नाव असून, ४० ते ५० कार्यकर्त्यांसह भाजप पुरस्कृत उमेदवाराच्या बुथवर जाऊन धमकी व दमदाटी केल्याचा आरोप आहे. महिलांनाही आरेरावी करण्यात आली. संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
कोल्हापूर शहरात भरधाव चारचाकी वाहनाने तीन दुचाकींना जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलीस व वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातस्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.
खंडवा तिसरी व चौथी रेल्वे लाईन त्याचप्रमाणे पाचोरा - जामनेर नॅरो गेज व ब्रॉड गेज करण्याचे प्रयोजन आहे. त्यासर्वांसाठी बरेचशा जमीनी भूसंपादन करण्याचे विषय आहे. रस्त्यांच्या समस्था यासंदर्भातील शेतकऱ्यांची बैठकीचे घेण्यात आली आहे.शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांचे प्रश्न मांडले आहेत. भुसंपादनाची जी प्रक्रिया आहे. तिचा पुन्हा सर्व्हे करण्यात यावा. शेतकऱ्यांची कमीत कमी जमीन गेली तरी मोबदला व्यवस्थित शेतकऱ्यांना मिळेल की,जेणे करून रेल्वे कामही होईल व शेतकरी समाधान ही राहतील. शेतकऱ्यांचे कुठलेही नुकसान होणार नाही.अशा पद्धतीने काय मार्ग काढता यईल त्या पद्धतीने रेल्वे प्रशासनाने निर्णय घ्यावा अशा सूचना खासदार रक्षा खडसे यांच्याकडून देण्यात आल्या आहेत.
नाशिक -
- सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणकडून WASH तांत्रिक सल्लागार समिती गठीत
- पाणी, स्वच्छता व आरोग्य व्यवस्थापनासाठी तज्ज्ञ मार्गदर्शन
- लाखो भाविकांच्या आरोग्य सुरक्षेला प्राधान्य
- घाट, मंदिरे व छावण्यांसाठी स्वच्छता मास्टर प्लॅनचे परीक्षण
- शौचालये व पिण्याच्या पाण्याच्या सुविधांचे दर्जेदार नियोजन
- सांडपाणी व कचरा व्यवस्थापनावर विशेष लक्ष
- IIT मुंबई, युनिसेफ, वर्ल्ड बँकसह तज्ज्ञांचा समावेश
- पर्यावरणपूरक उपाययोजना राबवण्यावर भर
- बायो-डायजेस्टर व कंपोस्टिंग प्रकल्पांची अंमलबजावणी
- डिजिटल प्रणालीद्वारे रिअल टाइम मॉनिटरिंग
- स्वच्छतेसाठी जनजागृती व सोशल मीडिया मोहिमा
- “क्लीन अँड ग्रीन सिंहस्थ”साठी विशेष अभियान
- गोदावरी नदी संवर्धनाला प्राधान्य
- भाविकांसाठी स्वच्छ व सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा संकल्प
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी हळदीच्या अंगाने घोड्यावरून नवरदेव मतदान केंद्रावर
सातारा जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी आज दिवसभर उत्साहात मतदान सुरू आहे
कराड तालुक्यातील भैरवनाथनगर येथील युवा उद्योजक ऋतुराज भालचंद्र थोरात यांचा आज विवाह होता
दिवसभर विवाहाची गडबड असताना देखील हळद लागल्यानंतर नवरदेव घोड्यावरूनच थेट भैरवनाथनगर येथील मतदानकेंद्रावर पोहचला आणि मतदान केले
लोकशाहीचा पवित्र हक्क बजावला. जितक लग्न महत्वाच आहे तितकंच मतदानही महत्वाचं आहे. त्यामुळे मी मतदान केलं
विद्युत पुरवठा खंडित झाल्याने मालगाडी ठप्प ..
प्लॅटफॉर्म क्रमांक चार आणि पाच दरम्यानच्या लूप लाईन वर घडली घटना
रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम सुरू..
कर्जत लोकल सुमारे 10 मिनिटे उशिरा
रेल्वे प्रशासनाकडून तात्काळ दुरुस्ती; परिस्थिती नियंत्रणात, वाहतूक सुरळीत सुरू
-लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकित भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार यांची काही ठिकाणी युती आहे, मोठी ताकत महायुतीची असल्याने लातूर जिल्ह्या परिषदेवर सत्ता ही महायुतीची येईल असा विश्वास सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केला
रायगड मध्ये मुंबई गोवा महामार्गावर माणगाव आणि इंदापुर येथे मोठी वाहतुक कोंडी झाली आहे. माणगाव आणि इंदापुर येथे दोन्ही ठिकाणी 4 ते 5 किलोमीटर पर्यंत लांब पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या वाहतूक कोंडीत प्रवासी आणि मतदार आडकले आहेत. मतदार तसेच प्रवाशी वाहतुक कोंडी अडकू नयेत यासाठी रायगड जिल्हाधिकारी यांनी अवजड वाहतूक बंदी घातली होती मात्र मोठ्या प्रमाणात अवजड वाहन रस्त्यावर आहेत.
उत्तर पुणे जिल्ह्यात आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकांसाठी मतदान पार पडत असताना आज दुपारपासून चाकण ते राजगुरुनगर पुणे नाशिक महामार्गावर १० किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्यात निवडणूकांमुळे पोलीस बंदोबस्तावर ताण आल्याने महामार्गावर वाहतुककोंडी होत असुन प्रवाशांसह मतदान करण्यासाठी निघालेल्या मतदारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे
लिफ्टमध्ये प्रमानापेक्षा जास्त लोक घुसल्याने लिफ्ट धाड धाड आवाज करत खाली आली
लिफ्टमध्ये इस्लाम पार्टीचे काही नगरसेवक व माजी आमदार आसिफ शेख यांच्या सह माध्यमकर्मी होते. सुदैवाने सर्वाना सुखरूप बाहेर काढण्यात आले,यात कोणालाही ड7खपत झाली नाही
सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक पार पडत आहे.या निवडणुकीवर तासगाव तालुक्यातल्या बलगवडे येथील ग्रामस्थांनी बहिष्कार घातला आहे.गावामध्ये सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जवळपास साडेबारा हजार वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. गावातल्या गायरान जमिनीवर राज्य सरकारच्या माध्यमातून सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येतोय मात्र बेकायदेशीर रित्या गावकऱ्यांनी लावलेली झाडांची कत्तल करण्यात आली आहे,त्यामुळे ग्रामस्थांनी सौर ऊर्जा प्रकल्प अन्यत्र हलवावा,या मागणीसाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय केला होता,त्यानुसार आज पार पडणाऱ्या मतदानावर बलगवडे ग्रामस्थांनी कडून बहिष्कार घालण्यात आला आहे. 2300 इतकं मतदान बलगवडे गावात आहेत.. दोन मतदान केंद्र नियुक्त करण्यात आले आहेत.. मात्र दुपार पर्यंत या ठिकाणी एकही मतदान झालेलं नाही..
आज न्यायालयात काय झाले
आरोपी विष्णू चाटेला लातूर कारागृहातून बीड कारागृहात आणले जावे यासाठी वकिलांकडून अर्ज देण्यात आला
तर सरकारी पक्षाकडून यावर आक्षेप घेत विष्णू चाटेचा यापूर्वी एक अर्ज न्यायालयाला देण्यात आला होता तो रद्द करण्यात आला
त्यामुळे तोच निर्णय अंतिम समजला जावा असा युक्तिवाद करण्यात आला
यावर न्यायालयाचा निर्णय येणे अपेक्षित आहे
तर सरकारी पक्षाकडून अतिरिक्त दाखल करण्यात आलेला लॅपटॉप पुरावा आणि तपासणी अहवाल न्यायालयात जमा करण्या बाबत माहिती देण्यात आली
त्याची कॉपी आरोपीच्या वकिलांना मिळाल्यानंतर 21 फेब्रुवारी रोजी यावर युक्तिवाद होऊ शकतो
अजितदादांच्या अकाली निधनानंतर त्यांचा उपमुख्यमंत्री पद पत्नी सुनेत्रा पवार यांना देण्यात आलं. मात्र अजित दादा जवळील अर्थ खात सुद्धा सुनेत्रा वहिनींना देण्यात यावा अशी मागणी होत आहे अशी मागणी होत असताना ठाकरे सेनेचे नेते संजय राऊत यांनी याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे असं म्हणणं मांडलं यावर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांची दिल्ली उडवत संजय राऊत यांच्या बोलण्याला मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देण्याची काहीच गरज नाहीये अशा शब्दात टीका केली आहे. संजय राऊत हे निराधार आणि बाष्कळ बडबड करतात त्यामुळे याला अधिक महत्व देणे गरजेचे नाही..
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी आज जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी माळशिरस तालुक्यातील शंकरनगर येथील मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदान केले.
संत गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त शेगावात भक्तीचा महासागर उसळणार आहे. प्रगट दिनाचे औचित्य साधत, शेगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिर आज आणि उद्या सलग 24 तास खुले ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय संस्थानने घेतला आहे....यामुळे राज्यासह देशभरातून लाखो भाविक शेगावात दाखल होत असून, आतापर्यंत 300 पेक्षा अधिक भजनी दिंड्या शेगावात दाखल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. संपूर्ण नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे... दरम्यान, 8 तारखेला प्रगट दिन असल्याने होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व यंत्रणा सज्ज असून, शांततेत व भक्तिभावात प्रगट दिन साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
- नाशिक आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन प्रवासी टर्मिनल इमारतीचे काम सुरू, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन उपस्थित राहणार
- मुख्यमंत्री सकाळी चांदवड तालुक्यातील णमोकार तीर्थ महोत्सवापासून दौऱ्याची सुरुवात
- दुपारी बागलाण तालुक्यातील वडगाव बळे येथे देणार भेट
- सायंकाळी ओझर विमानतळावर नवीन टर्मिनल इमारतीचा भूमिपूजन सोहळा
- नाविक इमारत उभारणीसाठी ५५० कोटी रुपयांचा निधी मंजूर
- प्रवासी सुरक्षा, सोयीसुविधांसह आधुनिक टर्मिनल उभारणार
- नवीन टर्मिनलमुळे प्रवासी हाताळणी क्षमता ३०० वरून १ हजारावर जाणार
- समांतर धावपट्टीच्या कामामुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय हवाई सेवांचा मार्ग मोकळा होणार
पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील बावधन पोलिस स्टेशनमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. आदित्य शगुन आणि डीएसके रणवारा या दोन सोसायटीमध्ये चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यांचा प्रयत्न अपयशी ठरला आहे. कापडाने आपल्या चेहऱ्याची ओळख झाकून तसेच हातात चोरी करण्यासाठी लागणारे अवजार घेऊन तीन-चार चोरटे आदित्य शगुन आणि डीएसके रानवारा या सोसायटीमध्ये लपून छपून प्रवेश करताना या सीसीटीव्ही विडियो मध्ये दिसत आहे. चोरट्यांचे धाडस पाहून सोसायटीत राहणारे नागरिक भयभीत झाले आहेत. आता या चोरट्यांच्या मुसक्या आवरण्याचा मोठ आवाहन बावधन पोलिसांसमोर उभ ठाकल आहे.
माझ्यामागे बरेच लागेलत, कारण ते अपुरे पडतात,त्यामुळे अधिकची मदत मिळवण्यासाठी काही लोक भानामतीचा प्रकार करतात,असा मुश्किल टोला राष्ट्रवादी शरद गटाचे आमदार जयंत पाटलांनी विरोधकांना लगावला आहे.जिल्हा परिषद निवड अनोखी दरम्यान वाढवा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात करणाऱ्या भागामतीचे प्रकार घडले होते,अगदी जयंत पाटलांचे वडील राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेबाबत देखील भानामतीचा प्रकार घडला होता, यावरून जयंत पाटलांनी ही प्रतिक्रिया देत भानामतीच्या प्रकाराला जनता उत्तर देईल,असं स्पष्ट केले आहे.
हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असणारे वाई तालुक्यातील पसरणी गावचे श्री काळ भैरवनाथाची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात पार पडत आहे. काळभैरव नाथाच्या नावानं चांगभलं असं म्हणत मोठ्या संख्येने भाविक या यात्रेमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले.या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातला सर्वात मोठा छबिना म्हणून या पसरणी गावाची ओळख असून या गावचे आकर्षण हे श्री काळभैरवनाथाचे बगाड आहे. एक महिना आधीपासूनच या बगाड यात्रेची तयारी पसरणी गावामध्ये होत असते.. चतुर्थीच्या दिवशी या श्री काळभैरवनाथाच्या हळदी समारंभ पार पडतो. मंदिर परिसरात भव्य भगव्या झेंड्याचे निशाण उभारून बगाड यात्रेला सुरुवात होते. मंदिरासमोर असणाऱ्या चौथर्यावर हे बगाड एकाच ठिकाणी गोल फिरवले जाते. यानंतर बगाडा वरील बगाड्याला खाली उतरवून मंदिरातील काळभैरवनाथाच्या दर्शनासाठी ग्रामस्थ घेऊन जातात. यानंतर गाव भगवा निशाणी काट्यांची आणि पालखीची गाव प्रदक्षिणा पार पडते आणि श्री नाथाचा आणि जोगामाईचा विवाह सोहळा मंदिरात पार पडतो.
कांदिवली पोलिस व बीएमसीने संयुक्त कारवाई करत कांदिवली पश्चिमेतील 90 फूट रोड अवैध फेरीवाल्यांपासून मुक्त केला. या कारवाईमुळे रस्त्यावरील वाहतूक व पादचाऱ्यांची अडचण दूर झाली.यासोबतच एकता नगर मैदान परिसरात ग्रुप करून खुलेआम दारू पिणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांनी कारवाई केली.दरम्यान, रिक्षात बसून दारू पिणाऱ्या एका ऑटो रिक्षा चालकालाही रंगेहाथ पकडण्यात आले.सार्वजनिक ठिकाणी शिस्त राखण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत माजी मंत्री रामदास कदम यांनी काही प्रश्न उपस्थित करून सखोल चौकशी करावी अशी मागणी केली तसेच यापुढे सुनील तटकरे यांना राजकारणातील घरचे दरवाजे बंद केले आहेत त्याचा मेव्हणा अजय बिरवटकर याला निवडून आणण्यासाठी त्याने आमच्याशी बेइमानी केली तर भास्कर जाधव हा नाच्या आहे त्याला आपण किंमत देत नाही तर माजी मंत्री रामदास कदम यांनी एका प्रश्नावर उद्धव ठाकरें यांच्यावर बोलणे टाळले
अजित पवार यांचे स्वप्न होईल. १२ तारखेला विलिनीकरणार बोलणार आहे. १० तारखेला अजित पवार यांच्या अपघाती निधनावर बोलेल, असे रोहित पवार म्हणाले.
अमरावती महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवारांना एमआयएमच्या नगरसेविका मीरा कांबळे यांनी मतदान केल्यानंतर भाजपवर टीका होत आहे त्या अनुषंगाने भाजपाचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी यावर प्रतिक्रिया दिली,अमरावती महानगरपालिकेत महापौर निवडणुकीसाठी भाजपा महायुतीजवळ पुरेसे बहुमत होते. ज्या मित्रपक्षांनी भाजप सोबत यावे, असे वाटत होते त्यांच्याशी भाजपा नेतृत्वाने रीतसर संपर्क साधला होता. पराभव चालेल पण आम्हाला AIMIM चे मत नको. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रश्नच नाही. महायुतीकडून अन्य कोणी AIMIM च्या सदस्यांशी बोलल्याचा दावा करत असेल तर तो त्यांना लखलाभ. आम्ही AIMIM ला सोबत घेण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी दिली
एम.आय.एम च्या प्र.क्र.21 जुनी वस्ती मधिल नगरसेविका मिरा कांबळे यांनी एम.आय.एम ला रामराम ठोकत भाजपाच्या महापौर व युवा स्वाभिमान पार्टीच्या उपमहापौर पदाच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला.. यावर टीका झाल्यानंतर भाजपने यावर स्पष्टीकरण दिले मात्र रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेने यांच स्वागत केला आहे.. नगरसेविका मिराताई कांबळे व त्यांचे चिरंजीव संदीप कांबळे हे गेल्या 20 वर्षापासुनचे युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ते असल्याचा दावा देखील आमदार रवी राणा यांनी केला.. एमआयएमच्या नगरसेविका मीरा कांबळे यांचा मुलगा संदीप कांबळे यांनी थेट रवी राणा यांची भेट घेत त्यांना पाठिंबा दिला... भाजपने एमआयएमच्या नगरसेविकेला विरोध दर्शवला असला तरी महायुतीतील घटक पक्ष रवी राणा यांनी दुसरीकडे त्यांच स्वागत केलं
गडचिरोली जिल्ह्यातील नारायणपूर या सीमावर्ती भागात गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या नक्षलविरोधी मोहिमेत आपल्या C-60 पथकाच्या बहाद्दर जवानांनी माओवाद्यांचे 2 तळ मोठ्या शौर्याने उद्ध्वस्त केले आहेत. या कारवाईत आतापर्यंत 7 माओवाद्यांचे मृतदेह आणि 5 अग्निशस्त्रे हस्तगत करण्यात यश आले आहे.
- नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेतील खदखद सोशल मीडियातून समोर
- नाशिक महानगरप्रमुख प्रविण तिदमे राजीनामा देणार
- तिदमे उपमहापौर पदासाठी होते आग्रही, मात्र पक्षाने विलास शिंदेंना दिली संधी
- पक्षात अन्याय होत असल्याचा तिदमे यांचा आरोप
- सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खा. श्रीकांत शिंदे यांच्याकडे देणार राजीनामा
- तर दुपारी ४.३० वाजता नगरसेवक पदाचाही राजीनामा आयुक्तांकडे सादर करणार
- शिवसेनेत फूट पडल्यानंतर नाशिकमधून शिंदेकडे जाणारे तिदमे होते पहिले नगरसेवक
- २०२५ मध्ये ४,७०० हून अधिक उड्डाणे उशिराने....प्रवाशांना तासन्तास प्रतीक्षा कराव्या लागल्याचीही नोंद
- १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ कालावधी...आरटीआयमधून अधिकृत आकडेवारी समोर
- ५७९ रद्द मध्ये इंडिगो आघाडीवर, ५७९ उड्डाणांपैकी ४९३ इंडिगोची विमान रद्द
- नागपूरला येणारी २,३९४ उड्डाणे उशिराने,
- दररोज सरासरी १२ ते १३ उड्डाणे उशिराने प्रवाशांचा संताप..
- वर्षभरात १० आपत्कालीन लँडिंग एक उड्डाण रद्द
- १,६११ खासगी उड्डाणांची नोंद ३३२ हेलिकॉप्टर हालचाली
- २९ लाख ३७ हजार प्रवासी प्रवास विमानतळाला १३७ कोटींहून अधिक उत्पन्न प्राप्त झालं.
- सेवा विस्कळीत तरीही उत्पन्नात वाढ, मात्र विमान कंपन्यांवर प्रश्नचिन्ह
भुसावळ विभागासह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा दिवाळी दरम्यान जोरदार अवकाळी पाऊस झाला होता. यामुळे धरणात उशिरापर्यंत पाण्याची आवक राहिली. यानंतर धरणातून रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन दिल्यानंतर सध्या ३३२.२० दलघमी साठा, तर २१३.२० मीटर जल पातळी आहे. गेल्या वर्षी ४ फेब्रुवारीला धरणात ३५६.८० दलघमी साठा, २१३.४८० मीटर जल पातळी होती. तुलनेत यंदा ९ टक्के साठा कमी आहे. यामुळे उन्हाळ्यात पाणीवापर संस्था, ११० गावे, प्रकल्प, औद्योगिक वसाहतींना पाणीपुरवठ्याचा ताळमेळ साधावा लागेल. अन्यथा पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागेल.
जळगावच्या एरंडोल तालुक्यातील पद्मालय येथील जंगलात महिलेला जाळून तिची निघृण हत्या केल्याच्या घटनेचा पोलिसांकडून अवघ्या 48 तासाच्या आत पर्दाफाश
जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आलेली मयत तृतीयपंथीय असल्याचे समोर आलेले असून तरुणासोबत असलेल्या प्रेम संबंधातून तिची निघृण हत्या झाल्याची माहिती समोर..
आकांक्षा उर्फ अजय गेंद्रे असे मयत 26 वर्षीय तृतीयपंथीयाचे नाव असून स्वप्निल पाटील असे 21 वर्षीय अटकेतील आरोपीचे नाव आहे...
घटनेच्या दिवशी दोघांनी सोबत मद्यप्राशन केलं जंगलात गेल्यावर डोक्यात बियरची बाटली मारून बेशुद्ध केलं, आणि त्यानंतर तरुणाने तिची जाळून हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे
-कल्याण डोंबिवलीत दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर कल्याण व डोंबिवली शहरातील वाहतूक कोंडी हा गंभीर प्रश्न बनला आहे. याच पार्श्वभूमीवर 10 फेब्रुवारी ते 18 मार्च या परीक्षा कालावधीत कल्याण डोंबिवली परिसरातील मेट्रो व रस्त्यांची सुरू असलेली कामे तात्पुरती बंद ठेवावीत, अशी ठोस मागणी डोंबिवलीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेकडून करण्यात आली आहे.मनसे विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळाने एमएमआरडीए, महानगर आयुक्त तसेच वाहतूक पोलिसांना यासंदर्भात निवेदन दिले आहे. या निवेदनात शिळफाटा रस्ता, कल्याण शहरातील मेट्रो मार्ग तसेच कल्याण–मुरबाड मार्गावरील काँक्रीट रस्त्यांची कामे परीक्षा कालावधीत थांबवावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.गेल्या दोन वर्षांपासून कल्याण-डोंबिवली परिसरात दिवस रात्र वाहतूक कोंडी पाहायला मिळते. शिळफाटा रस्त्यावर मेट्रोची कामे सुरू असून काटई गावाजवळ निळजे उड्डाण पुलाचे कामही रेल्वेकडून सुरू आहे. हा संपूर्ण परिसर कायमच वाहनांच्या कोंडीने ग्रासलेला असतो.
अजित पवारांच्या निधनानंतर काल पवार कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेण्यासाठी राज्यातील विविध ठिकाणाहून लोक बारामती मध्ये येत होते. त्यांच्या भावना स्वीकारण्यासाठी स्वतः शरद पवार सुद्धा उपस्थित होते. बारामती मधील सहयोग सोसायटी मध्ये पूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं होतं. मात्र यावेळी आजोबा शरद पवार आणि नातू पार्थ पवार यांच्यातील एक संवादाचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकाना प्रश्न पडला असणार आहे की या दोघांत कुठली चर्चा झाली. तसेच काही फोटोंमध्ये आमदार रोहित पवार सुद्धा उपस्थित आहेत. त्या तिघांमध्ये सुद्धा काही चर्चा, बातचीत करतानाचे फोटो समोर आले आहेत. या फोटोंची जोरदार चर्चा सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतं...
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील चिखला माईन परिसरात वाघाने पुन्हा एकदा आपले क्रूर रूप दाखवले असून,येथील दहशतीने ग्रामस्थांची झोप उडवली आहे. अवघ्या आठवडाभरापूर्वी दोन गायींची शिकार केल्यानंतर,रात्री वाघाने प्रभू बजरंग गोशाळेत शिरून एका गर्भवती गायीचा बळी घेतला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, वनविभागाच्या निष्क्रीयतेबद्दल संतापाची लाट उसळली आहे.चिखला माईन येथील प्रभू बजरंग गोशाळेत रात्री नेहमीप्रमाणे सर्व जनावरे बांधलेली होती.दबा धरून बसलेल्या वाघाने गोशाळेत थेट घुसखोरी केली.गोशाळेतील एका गर्भवती गायीवर हल्ला चढवत तिला जागीच ठार केले. वाघाच्या डरकाळीने आणि जनावरांच्या ओरडण्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे, याच गोशाळेत आठवडाभरापूर्वीच वाघाने दोन गायींचा फडशा पाडला होता. एकामागून एक होणाऱ्या या हल्ल्यांमुळे रक्ताची होळी खेळणाऱ्या या वाघाचा बंदोबस्त करण्यात वनविभाग अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.सततच्या हल्ल्यांमुळे चिखला माईनसह परिसरातील गावांमध्ये दहशतीचे सावट पसरले आहे.
स्वच्छ नागपूर सुंदर नागपूरचे बिरुद मिरवणाऱ्या नागपूर मध्ये प्रत्यक्षात अस्वच्छता
नागपूर मधील अस्वच्छतेची न्यायालयाने घेतली गंभीर दखल, याचिका दाखल करण्याचे नागपूर खंडपीठाने दिले आदेश
शहरातील अस्वच्छतेवर न्यायालयाने व्यक्त केली नाराजी
न्यायमूर्ती अनिल किलोर, राज वाकोडे यांच्या समक्ष यावर सुनावणी झाली असून जनहित याचिका हाताळण्यासाठी एडवोकेट यशोवर्धन सांबरे यांची नियुक्ती केली आहे
दोन आठवड्याचा अवधी यासाठी न्यायालयाने दिला असून शहराला कचरामुक्त करण्याचे महापालिकेकडून केले जाणारे दावे ठिकठिकाणी तयार झालेल्या कचऱ्याचे ढीग, रस्त्यांवरील अतिक्रमण या सर्व गोष्टींचा यात समावेश केला जाणार आहे
नागपूर मनपा शहराच्या स्वच्छतेसाठी महिन्याला आठ कोटी रुपयांपेक्षा अधिक तर वर्षाला 100 कोटी रुपयांच्या घरात खर्च करत असताना शहर स्वच्छ का होत नाही असा सवाल न्यायालयाने व्यक्त केला
बारामती तालुक्यातील एकूण ६ जिल्हा परिषद गट व १२ पंचायत समिती गणाकरिता मतदान
जिल्हा परिषदेसाठी ३१ तर पंचायत समितीकरिता ४३ उमेदवार रिंगणात
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीकरिता मतदार संख्या पुरुष १ लाख ३५ हजार ७३, महिला १ लाख २९ हजार ५६०, इतर ९ असे एकूण २ लाख ६४ हजार ६४२
जिल्हा परिषद गटामध्ये सुपा ३, गुणवडी ३, पणदरे ९, वडगाव निंबाळकर ५, निंबूत ६ आणि नीरावागज ५ असे एकूण ३१ उमेदवार
सुपा २, काऱ्हाटी २ , शिर्सुफळ ३, गुणवडी ४, पणदरे ६, मुढाळे ३, मोरगाव ३, वडगाव निंबाळकर ७, निंबुत ७, कांबळेश्वर २, नीरावागज २, डोर्लेवाडी २ असे एकूण ४३ उमेदवार निवडणूक रिंगणात
नाशिकच्या येवला शहरात रात्रीच्या सुमारास एसटी बसचा अपघात झाल्याची घटना घ़ली आहे.पुणे येथून धुळे येथे जात असलेल्या बसचे ब्रेक फेल झाल्याने फत्तेबुरूज नाक्याजवळ अचानक बसचे ब्रेक फेल झाल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकाना जवळ घुसल्याने यात दोन नागरीक जखमी झाले,अपघाताचा मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरीक धावून आले त्यांनी तातडीने जखमींना शासकीय रुग्णालयात दाखले केले तर सुदैवाने बस मधिल कोणाला ही ईजा झाली नाही,दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलिस व परिवहन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले,जखमी झालेल्यांची प्रकृती स्थिर असून,प्राथमिक माहिती नुसार बसच्या ब्रेक मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
यवतमाळच्या पांढरकवडा येथील एकात्मिक आदिवासी विभाग प्रकल्पांतर्गत चालवल्या जाणाऱ्या शहरातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहमध्ये जेवणाच्या पुरवठ्यात मोठा घोटाळा झाल्याची चर्चा असताना लाखो रुपयांच्या कंत्राटानंतरही विद्यार्थ्यांना निष्कृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याने उपासमारीची वेळ आली आहे.यासदर्भात भाजपचे आमदार राजू तोडसाम यांनी वसतिगृहाला भेट दिली यावेळी विद्यार्थ्यांनी आमदार तोडसाम यांना वसतिगृहमधील समस्याचा पाढा वाचून दाखविला. विद्यार्थ्यांनी सांगितले, की मिळणारे जेवण अतिशय निष्कृष्ट दर्जाचे आहे. अंडी, नॉनव्हेज,वरण-भात आणि केळी डाळ सुद्धा निष्कृट दर्जाची आहे.वसतिगृहमध्ये अनेक गोष्टींचा अभाव असल्याचा आरोप देखील यावेळी विद्यार्थ्यांनी केला.आमदारांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करत स्वतः जेवणाचा स्वाद घेतला जेवणाचा दर्जा घसरलेला असल्याचे आमदार राजू तोडसाम यांनी सांगितले. त्वरित अशा कंट्रकवर कारवाई करा अशी मागणी विद्यार्थ्याकडून यावेळी करण्यात आली.
ज्येष्ठ काँग्रेस नेते माजी सहकार मंत्री स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर यांच्या नातवावर बिबट्याचा हल्ला
बिबट्याच्या हल्ल्यात अधिराज पाटील यांच्या पायाला दुखापत
अधिराज पाटील यांचे वडील उदयसिंह पाटील उंडाळकर येळगाव जिल्हा परिषद गटातून लढवत आहेत निवडणूक
उदयसिंह पाटील उंडाळकर हे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते
साताऱ्याच्या कराड तालुक्यातील उंडाळे शेवाळवाडी मार्गावर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली घटना
अधिराज पाटील यांच्यासोबत असणारे दुचाकी चालक धनाजी पाटील हेही बचावले थोडक्यात
उंडाळे गावातील घटनेनंतर स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू
अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरात काल रात्री एका लग्नाच्या मिरणवूकीत नंग्या तलवार फिरवल्याचा प्रकार समोर आलाय. मात्र, या लग्न मिरवणुकीत तरुणांना नंग्या तलवारीसह नाचनं चांगलंच अंगाशी आलंये. कारण, डीजेवर तालावर काही तरुण या ठिकाणी नंग्या तलवारी फिरवत होते, याचं वेळी बाजूला उभ्या असलेल्या एका लहान मुलाच्या डोक्याला ही तलवार लागलीये.. यात मुलाच्या डोक्याला मोठा मार लागलाये. तर त्याच्या डोक्याला 5 टाके लागले आहे. मुलावर बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतंये. या प्रकरणी बाळापूर शहर पोलिस पुढील तपास करतायेत..दरम्यान, एखाद्या कार्यक्रमात म्यानातून तलावर उपसली तरी प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई होतंये.. मात्र, काल बाळापूरात या लग्न मिरवणुकीत अशाप्रकारे तलवारी फिरविल्याव जात असेल तर त्यावेळी पोलिसांकडून अक्षम्यपणे दुर्लक्ष झालं होत कां? असा सवाल उपस्थित होतोय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.