आघाडी म्हणून एकत्र आलो होतो.
अधिवेशन काळात सर्वजण एकत्र येत असतो.
राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड झाली.
तिन्ही पक्षातील सर्व नेते होते.
जे काही आखाती देशातील युद्ध सुरू आहेत त्या संदर्भात देखील माहिती आम्हाला दिली.
विधिमंडळात असलेले आपल्या पक्षातील आमदार काय काम करतात याची देखील माहिती घेतली.
सातारा प्रकरण आणि अशोक खरात प्रकरणात आमदारांची आणि नेत्यांची काय भूमिका असावी या संदर्भात मार्गदर्शन केले, असं भास्कर जाधव म्हणाले.
- आज आणखी महिला तक्रारदारांनी खरात विरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार दिल्यानं खरातवर अधिकाऱ्यांकडून प्रश्नांची सरबत्ती
- महिलांवरील लैंगिक अत्याचारासोबतच खरातचे आर्थिक व्यवहार, मालमत्ता आणि व्यावसायिक भागीदारांसंदर्भात चौकशी केल्याची माहिती
- उद्या खरातची पोलीस कोठडी संपत असल्याने त्याला न्यायालयात हजर केलं जाणार
- येवला प्रांताधिकारी कार्यालयात बच्चू कडू संतापले.
- वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यासह अधिकाऱ्यांना धरले धारेवर...
- देवरगाव येथील विजेच्या प्रश्नावर बच्चू कडू संतापले.
- बच्चू कडू पाठोपाठ प्रांताधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनीही कांदे फेकून मारले..
- प्रहार जनशक्ती पक्षाचा शेतकरी आक्रोश मोर्चा येवला प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला...
- हजारोच्या संख्येने शेतकरी आंदोलनात सहभागी.
- शेतकऱ्यांनी गळ्यात घातल्या कांद्याच्या माळा.
दुचाकीस्वार टेम्पो खाली दबल्याने जागीच ठार.
नांदेड भोकर महामार्गावरील बारड येथील घटना.
मुदखेड तालुक्यातील तिरकसवाडी येथील रविनाथ साबळे या तरुणाचा अपघातात मृत्यू.
मा. नगरसेवक वसंत मोरे यांच्यावर दाखल असलेल्या ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील अटक पूर्व जामीन अर्ज मा. पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने नाकारला असून, ॲड. आकाश साबळे सर, ॲड. कपिल शिवशरण यांनी जोरदार युक्तिवाद करत फिर्यादींच्या वतीने बाजू मांडली.
या वेळी फिर्यादी अविनाश लहाडे आणि वंचित बहुजन आघाडीचे ओंकार कांबळे, अभिजीत बनसोडे, युवा आघाडीचे अक्षय कांबळे, विपुल सोनवणे आणि अनेक पदाधिकारी, आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऑन ‘कमिशन’ शब्द - मी कार्यकर्त्यांना ३५ कोटींची कामे वाटप केल्याबाबत वक्तव्य केले होते. चुकून ‘कमिशन’ हा शब्द तोंडातून निघाला आणि त्याचा विपर्यास करण्यात आला. ठेकेदार नेहमी कामे करत असतात; कार्यकर्त्यांनीही कामे देण्याची मागणी केली, त्यामुळे त्यांनाही कामे देण्यात आली.
- दत्ताजी मेघे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी चंद्रशेखर बावनकुळे आशिष जयस्वाल यांनी दत्ताजी मेघे यांच्या पार्थिवाचे दर्शन करून वाहिली श्रद्धांजली
- पोलिसांकडून तीन फेऱ्यांच्या गोळीबारातून मानवंदना
ठाणे महानगरपालिकेचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा अंदाजित अर्थसंकल्प महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्याकडे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सादर केला. सुमारे 6,221 कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दुपारी कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात पत्रकार परिषद घेण्यात आली.
सुमारे साडेतीन तास चाललेल्या अर्थसंकल्पीय भाषणानंतर आयुक्त सौरभ राव यांनी माध्यमांशी संवाद साधत सांगितले की, हा अर्थसंकल्प मंजुरीसाठी महासभेत ठेवण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पात शहराच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर देण्यात आला आहे.
- नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात प्रकरणात गुन्ह्यांची संख्या वाढली
- आणखी 2 गुन्हे दाखल, एकूण 5 गुन्हे नोंद
- लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या तक्रारींमध्ये वाढ
- पोलिसांकडून पीडित महिलांसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर
- अधिक महिलांनी पुढे येऊन तक्रार करण्याचे आवाहन
- नव्या तक्रारींमुळे गुन्ह्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता
- SIT आणि पोलिसांकडून तपास अधिक तीव्र
पुण्यातील लोहगाव परिसरात उद्यान, हॉस्पिटल भाजी मंडई यासाठी आरक्षित जागेवर होणाऱ्या भारत मंडप कन्वेंशन सेंटरला पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली आहे. आज झालेल्या सर्वसाधारण सभेत मात्र काँग्रेसकडून भारत मंडपला विरोध करण्यात आला होता. या जागेवर हॉस्पिटल आणि उद्यानाची गरज आहे त्यामुळे पर्यायी जागा निवडावी असं काँग्रेसचं मत होतं. मात्र महानगरपालिकेत सर्वसाधारण सभेत मतदान घेऊन भारत मंडपमचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
पुण्यातील लोहगाव परिसरात 48 एकर जागा ही पुणेकरांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी म्हणजेच हॉस्पिटल, उद्यान, भाजी मंडई यासाठी आरक्षित ठेवण्यात आली होतं. मात्र आता त्या जागेवर भव्य भारत मंडपम होणार आहे. हा प्रस्ताव आता राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.
कांदा आणि मका उत्पादकांच्या विविध मागण्यांच्या प्रश्नी प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक...
येवला प्रांत कार्यालयावर जल आक्रोश मोर्चाचे आयोजन...
त्या अगोदर पुरणगाव ते येवला ट्रॅक्टर रॅली...
या ट्रॅक्टर रॅलीत प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू सहभागी...
मका आणि कांद्याच्या माळानी सजवलेले रॅलीतील ट्रॅक्टर
नांदेडच्या माहूरगडावर चैत्र नवरात्र उत्सव सुरू आहे.आज ललित पंचमी आहे. ललित पंचमीनिमित्त श्री रेणुका मातेला द्राक्षांची आरास करण्यात आली. माहूर गडावर श्री रेणुका मातेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
क्राइम ब्रँच पथकाने केली भोंदू अशोक खरातच्या ऑफिसची झाडाझडती
खरातच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील ओकस कार्यालयाची तपासणी
पीडित महिलांना सोबत घेऊन पोलिसांनी केली तपासणी..
याच कार्यालयातून भोंदू बाबा खरात करायचा जमिनींचे व्यवहार
याच कार्यालयात अनेक महिलांचे शोषण झाल्याचा संशय
निम्न पैनगंगा प्रकल्पाचा मुद्दा दिवसेंदिवस अधिक तापत चालला आहे. निम्न पैनगंगा धरणविरोधी संघर्ष समिती, राष्ट्रीय किसान मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, आणि इतर संघटनांच्या वतीने विविध मागण्यासाठी यवतमाळ शहरातील महात्मा फुले चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे बेकायदेशीरपणे निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील नागरिकांची दिशाभूल करून कामे सुरू आहे. ही कामे त्वरित थांबवण्यात यावी तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, बेकायदेशीर वर्क ऑर्डर रद्द करावी, एस.आय.ए रिपोर्ट व डी.पी.आर. तात्काळ रद्द करावा, यासह भूसंपादन,पूर्णवसन व पुनरस्थापना करावी,अशा विविध मागण्यांसाठी हा धडक मोर्चा काढण्यात आला होता.यावेळी मोठ्या संख्येने विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते.
अमली पदार्थ तस्करांच्या मुळावर घाव घालत धुळे स्थानिक गुन्हे शाखेने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे, शहराच्या पवन नगर आणि मोहाडी परिसरात टाकलेल्या छाप्यात तब्बल 1 कोटी 42 लाख 65 हजार रुपयांचा 570 किलोहून अधिक गांजा जप्त करण्यात आला आहे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या नेतृत्वात मध्यरात्री केलेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे ड्रग्ज माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, एका 24 वर्षीय तरुणाला बेड्या देखील ठोकण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र केसरीचा वाद हा सरकारने मिटवावा अन्यथा महाराष्ट्र केसरी हिंदकेसरी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहेत. महाराष्ट्रातील कुस्त्यांमधला वाद हा राजकीय वाद असल्याचं महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी सांगितलं. पदाचा मान कमी करण्याचं काम सुरू आहे. सरकार नेमके फायदे देणार कुणाला असा प्रश्न सरकार समोर उपस्थित झाला आहे त्यामुळे यामध्ये पैलवानांचे हाल होत आहेत.
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील जनतेसाठी महत्वपूर्ण ठरणारा मात्र काही वर्षा पासून रखडलेल्या मनमाड -इंदूर रेल्वे मार्गाच्या कामाला गती मिळण्यास सुरुवात झाली असून रेल्वे प्रशासनाने जमीन अधिग्रहण प्रक्रिया केली सुरु केली या अंतर्गत आज मनमाडच्या
गर्डरशॉप भागात रेल्वे लाईन जवळ असलेल्या वसाहतीच्या घरांच्या भूमीची मोजमाप करण्यात आली.जमीन मोजमाप करण्यासाठी स्थानिक नागरिकांचा विरोध होता,संपूर्ण जमीन खरेदी करावी अशी मागणी या अगोदर दोन वेळा नागरिकांनी केली होती त्यामुळे लोकांनी मोजमाप करू दिले नव्हते मात्र आज त्यांच्या विरोधाला न जुमानता कडक पोलिस बंदोबस्तात भूमी अभीलेखा विभागाने जमीन मोजमाप सुरु केले.309.43 किमी लांबीच्या या रेल्वे मार्गामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील जनते सोबत व्यापाऱ्यांना मोठा फायदा होणारं आहे
महापालिकेतर्फे विद्यापीठाजवळील आनंदऋषीजी चौकात मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती केली मार्च) शिवाजीनगरच्या काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे,अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.त्यामुळे उद्याच हे काम पूर्ण केले जाणार आहे.
बुधवारी या परिसरात नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा सुरळीत होईल, त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे पत्रकात म्हटले आहे.
पाणीपुरवठा बंद राहणारा भाग : सेनापती बापट रस्ता दोन्ही बाजू, आशानगर, गोखलेनगर, बहिरटवाडी, भोसलेनगर, केसरकर वाडी, औंध बाणेर, मॉडर्न कॉलेज व लगतचा परिसर, मॉडेल कॉलनी, चिखलवाडी, बोपोडी.
व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे सर्वाधिक फटका उपाहारगृह आणि नाष्टा सेंटरला बसलाय. पुण्यातील अनेक बड्या नाष्टा सेंटर आणि उपाहारगृहांनी जास्त गॅस लागणारे पदार्थ पूर्णपणे बंद केलेत. डोसा, वडा, खिचडी हे पदार्थ तयार करण्यासाठी सर्वाधिक गॅसचा वापर होतोय. त्यामुळे हे पदार्थ मेनू मधून काढून टाकले आहेत. आता पर्यायी पदार्थ म्हणून भेळ आणि शेवपुरी यांना प्राधान्य देण्यात आलेय.
रुग्णवाहिकेतून अवैध दारूची तस्करी करणाऱ्यां आरोपींचे आष्टी पोलिसांनी आवळल्या मुसक्या
चक्क रुग्णवाहिकेतून करीत होते दारूची तस्करी
रुग्णवाहिकेसह 12 लाख 28 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त
गॅसटंचाईवर पहिल्यांदा पीएम मोदी संसदेत आपले मत मांडत आहेत.
युद्धामुळे सामान्य जीवनावर परिणाम
युद्धजन्य परिस्थितीवर एकत्रित यावे लागणार
आखाती देशांमधून भारतामध्ये इंधन येते
३ आठवड्यांपेक्षा जास्त दिवस युद्ध सुरु, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.
भोंदूबाबा अशोक खरातच्या विरोधात काँग्रेसच्या कडून अज सोलापुरात काँग्रेस भवन समोर निदर्शने आंदोलन करण्यात आले.भोंदूबाबा अशोक खरात विरोधात महिला काँग्रेसच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.महिला अबला असतात,घरगृहस्थी चांगली राहावी यासाठी त्या अशा बाबांकडे जातात,भोंदुबाबा मात्र अशा महिलांची फसवणूक करतात,त्यांची पिळवणूक करतात,त्यामुळे अशा भोंदूबाबाना कडक शिक्षा झालीच पाहिजे.फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवावा आणि ताबडतोब फाशी द्यावी अशी मागणी महिलांनी केली आहे.
मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत होते याला पर्याय म्हणून ‘मिसिंग लिंक’ महत्वकांक्षी रोडचे काम सुरू केले आहे. हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, या महत्त्वाच्या मार्गावर सध्या रंगरंगोटी आणि सुशोभीकरणाची काम युद्ध पातळीवर सुरू आहे. विशेषतः टनलच्या प्रवेशद्वारांना ऐतिहासिक आणि आकर्षक स्वरूप देण्यावर भर दिला जात आहे. मावळ तालुक्याच्या समृद्ध वारशाचा सन्मान राखत, गड-किल्ल्यांच्या शैलीतील रचना आणि लेण्यांप्रमाणे शिल्पकलेची उभारणी येथे केली जात आहे.
पंढरपुरात सरगम चौक ते भोसले चौका दरम्यान मंजूर असलेल्या उड्डाण पुलाचे काम सुरू करावे या मागणीसाठी भाजपच्या वतीने प्रांताधिकारी कार्यासमोर आंदोलन करण्यात आले. वाखरी ते पंढरपूर या पालखी मार्गाचे काम सुरू आहे. या अंतर्गत रेल्वे लाईन वरून उड्डाण पूल करण्यात येणार आहे. या पुलाचे काम तातडीने सुरू करून शहरातील वाहतूक कोंडी कमी करावी अशी मागणी भाजप नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी केली आहे. यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे यांना लेखी निवेदन ही देण्यात आले.
भोंदू बाबा अशोक खरात यांच्या फसवणूक प्रकरणात महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर व इतर नेत्यांवर कठोर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी अमरावती शहर महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष जयश्री वानखडे यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन करण्यात आले.
शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील तापी नदीवरील नवापुलावर आज दोन मोटारकारची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोन प्रवासी गंभीर जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग
खरातचा पीए रमेश हिंगे फरार, SIT कडून शोधमोहीम सुरू
हिंगे हा खरातचा अत्यंत निकटवर्तीय असल्याची माहिती
आर्थिक व्यवहार आणि संपर्क व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका असल्याची शक्यता
खरातच्या नेटवर्कमधील महत्त्वाचा दुवा म्हणून हिंगेकडे संशय
अनेक व्यवहार आणि भेटीगाठींची माहिती हिंगेकडे असण्याची शक्यता
SIT कडून विविध ठिकाणी छापेमारी, शोध सुरू
हिंगे सापडल्यास तपासाला मोठी दिशा मिळण्याची शक्यता
आधीच अनेक गुन्ह्यांमध्ये अटकेत असलेल्या खरातच्या अडचणी वाढल्या
छत्रपती संभाजीनगरात सोलर पॅनल ठेवलेल्या गोडाऊनला भीषण आग
शहरालगत असलेल्या वरूड काझी रोडवरील घटना, मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली.
आगीत लाखों रुपये किमतीचे सोलर पॅनल जळून खाक
अग्निशामक दलाचे जवाननी आग विझविली
सुमारे एका तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज
रायगड जिल्हा परिषदेच्या सभापती पदाची आज निवड
महायुतीच्या वादावर अखेर तोडगा निघाला
भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची शिष्ठाई कामी आली
भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेने घेतले सभापती पद वाटून
अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर शिंदे शिवसेना मध्ये होती नाराजी
बांधकाम सभापती भाजपकडे अर्थ विभाग, शिक्षण विभाग आणि महिला बालकल्याण विभाग शिवसेनेच्या वाट्याला तर राष्ट्रवादीकडे समाजकल्याण आणि कृषी सभापती पद जाणार असल्याची सुत्रांची माहिती
जिल्हा परिषद निवडणूकी पासून शिंदेसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात रायगडमध्ये शाब्दीक वाद रंगला होता
रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद भाजपला तर उपध्यक्ष पद राष्ट्रवादीला मिळाले मात्र सर्वाधिक जागा मिळवून देखील शिवसेना सत्ते बाहेर होती
भोंदू अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग
काल गुन्हा दाखल झाल्यानंतर खरातचा ताबा होता गुन्हे शाखेकडे
नाशिक गुन्हे शाखेकडून सखोल चौकशी झाली त्यानंतर SIT कडे ताबा
आज पुन्हा SIT समोर अशोक खरातची चौकशी होणार
विविध गुन्ह्यांच्या अनुषंगाने प्रश्नांची सरबत्ती होण्याची शक्यता
आर्थिक व्यवहार, लैंगिक शोषण आणि नेटवर्कबाबत चौकशी
महत्त्वाचे पुरावे आणि नव्या धाग्यांवरून तपासाची दिशा ठरणार
मुंबई गोवा महा मार्गावर आंबा काजू बागायतदारांचे चक्काजाम आंदोलन
मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक विस्कळीत
राजू शेट्टी व वैभव नाईक यांचा महामार्गावर ठीय्या
सरकारच्या दडपणशाहीला घाबरणार नाही आम्ही न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरलोय
आता आरपारची लढाई नुकसान भरपाई मिळवणारच बागायतदारांचा निर्धार
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यांनी बोलवली महत्वाची बैठक
मनसे नेते आणि सरचिटणीसांची राज ठाकरेंनी बोलावली बैठक
दादर येथील मनसे पक्ष कार्यालयात होणार बैठक
पक्ष संघटनाविषयी होणार चर्चा
मुंबई गोवा महामार्गावर थोड्याच वेळात आंबा काजू बागायतदार करणार आंदोलन
मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता
सरकारने आम्हाला दडपणशाही केली तरी आम्ही घाबरणार नाही आम्ही न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरलोय
आता आरपारची लढाई नुकसान भरपाई मिळवणारच बागायतदारांचा निर्धार
भोंदू अशोक खरात प्रकरणात एसआयटी मार्फत रूपाली चाकणकरांची चौकशी होण्याची शक्यता
शिर्डीत खरातचा ॲाफिस बॅाय नीरज जाधववर दाखल गुन्ह्यांत फिर्यादी महिलेची चौकशी करू नका म्हणून रूपाली चाकणकरांनी टाकला होता दबाव ..
संबंधित महिलेचा महिला आयोगाकडे अर्ज मागवून घेऊन पोलिसांना कारवाई करण्याची दिली होती धमकी
सिलेंडर तुटवड्यामुळे रॉकेल पुरवठा सुरू करण्याचे धोरण,बंद झालेले रॉकेल पुन्हा सुरू होणार
युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या सिलेंडर तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात प्रशासनाकडून ग्रामीण भागात रॉकेल पुरवठा करण्याचा निर्णय
नवीन धोरणानुसार ग्रामीण भागात 45 दिवस घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध होणार नाही त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी रॉकेल पुरवठा करण्याचा निर्णय
जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य असलेल्या सुमारे 7 लाख 24 हजार कुटुंबांना होणार रॉकेल पुरवठा
जिल्हा पुरवठा विभागाकडून पात्र लाभार्थ्यांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू
आज जिल्हा प्रशासन आणि राज्य पुरवठा विभाग यांच्यात कॉन्फरन्सद्वारे अंतिम धोरण निश्चित होणार
अमरावती जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये मिळून १९ मार्चपर्यंत ५३.९५% पाणीसाठा उपलब्ध आहे.
गेल्या वर्षी याच दिवशी पाणीसाठा ५१.८४% होता, त्यामुळे यंदा साठ्यात थोडी वाढ झाली आहे.
मध्यम प्रकल्पांची स्थिती चिंताजनक असून साठा ५१.०२% वरून घसरून ५०.८३% झाला आहे.
जिल्ह्यातील ४८ लघु प्रकल्पांमध्ये सरासरी ५५.५३% पाणीसाठा उपलब्ध असून काही प्रमाणात दिलासा आहे.
७ मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी ५०.८३% साठा, त्यात चंद्रभागा प्रकल्प ८६.९४% आणि पूर्णा प्रकल्प ७५.८९% साठ्यासह आघाडीवर आहेत.
बोर्डी नाला प्रकल्पात केवळ ८.०९% पाणी शिल्लक असल्याने संभाव्य पाणीटंचाईचे संकेत दिसत आहेत.
अप्पर वर्धा धरणात ५४.७३% पाणीसाठा (३०८.७३ दशलक्ष घनमीटर) पाणीपातळी ३३९.२३ मीटर नोंदविण्यात आली आहे..
रत्नागिरी- आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम मच्छिमारांच्या सवलतीच्या डिझेलवर
मच्छिमारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या डिझेलच्या दरात २३ रुपये इतकी विक्रमी वाढ
मच्छिमारांसाठी दिल्या जाणाऱ्या डिझेलची किंमत ९२ रुपयांवरून गेली ११५ वर
एका मासेमारी नौकेला सर्व साधारण ३५०० लिटरचे डिझेल
वाढत्या दरामुळे मच्छिमारांच्या खिशाला महिन्याला अतिरिक्त १ लाखांचा बोजा
कंझ्युमर कॅटेगरी अंतर्गत डिझेल दरवाढ लागू, रेल्वे विमान सेवेसोबत मच्छिमारांचा समावेश
एका बोटीला एका फेरीसाठी लागले २ ते ३ हजार लिटर डिझेल
सिंधुदुर्ग-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा आणि काजू बागायतदारांचे रास्ता रोको आंदोलन
मुंबई गोवा महामार्गावर कणकवली नांदगाव येथे होणार आंदोलन
जोपर्यंत नुकसान भरपाई बाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत रस्त्यावरून हटणार नाही
मुंबई गोवा महामार्गावर चक्काजाम आंदोलन शेतकरी करतील
पुणे -
भारत मंडपम च्या प्रस्तावाला शिवसेनेचा विरोध
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार पत्रव्यवहार प्रमोद नाना भानगिरे -
लोहगाव सर्वे क्र. 236 व 238 येथील नागरिकांसाठी आरक्षित मंडई, रुग्णालय, उद्यान, क्रीडांगण, पार्किंग व पाणीपुरवठा यांसारख्या अत्यावश्यक सुविधांची जागा रद्द करून “भारत मंडपम” कन्व्हेन्शन सेंटरचा प्रस्ताव मांडणे हे पूर्णतः नियोजनशून्य, तांत्रिकदृष्ट्या अपूर्ण व नागरिकविरोधी आहे.
अशी टीका शिवसेनेने केली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पत्रव्यवहार केला जाणार आहे.
तसेच हा प्रस्ताव मान्य केला तर आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी दिला आहे.
नाशिकमध्ये एकाच रात्रीत 2 ठिकाणी घरफोडी
नाशिकच्या चांदवड शहरातील गजबजल्या लक्ष्मीनगर भागात रात्रीच्या सुमारास 2 ठिकाणी घरफोडी केल्याची घटना उघडीस आली आहे
घरी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यानी खिडकीचे गज कापून घरातील दिड तोळे सोने, काही रक्कम चोरून नेल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे
दरम्यान चांदवड पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.
नाशिक -
- नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट
- शिवनिका संस्थानच्या ट्रस्टींचीही चौकशी होणार असल्याची सूत्रांची माहिती
- संस्थानचे अध्यक्षपद भोंदू अशोक खरातकडे होते
- काही वर्षांपूर्वी जुन्या ट्रस्टींनी साथ सोडल्यानंतर नव्या विश्वस्तांची केली होती नियुक्ती
धाराशिव -
धाराशिव जिल्ह्यात रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका
तुतीचा पाला भिजल्याने 75 टक्के नुकसान,पंचनामे करण्याची रेशीम उत्पादक शेतकऱ्याची मागणी
Anchor:धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यामध्ये रेशीम उद्योग शेतकऱ्यांना अवकाळी चा फटका बसला आहे. अतिवृष्टी झालेल्या भूम परंडा तालुक्यात पारंपारिक उत्पादन सोडून शेतकरी रेशीम उद्योगाकडे वळाला आहे मात्र जिल्ह्यात मागील चार दिवस पडलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे या उत्पादनालाही त्याचा फटका बसला आहे.नुकसान झालेल्या रेशीम उद्योगाचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
धाराशिव -
श्री तुळजाभवानीला देवीला ‘वारा घालण्याच्या’ पारंपरिक सेवेची सुरुवात
तुळजाभवानी मंदिरात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर देवीस उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून ‘पंख्याने वारा घालण्याची’पारंपरिक सेवा सुरू करण्यात आली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही ही सेवा चैत्र महिन्यापासून दुपारी 1 ते 4 या वेळेत हाताने पंखा हलवून सेवा करण्यात येते.
देवीला लिंबू सरबत, फळे व पेढ्यांचा नैवेद्य अर्पण करून मखमली पंख्याचा वापर ही मानाची सेवा पारंपरिकरित्या तुळजापूरातील पलंगे कुटुंबाकडे असून,अनेक पिढ्यांपासून ती अखंड सुरू आहे.
मृग नक्षत्रातील पावसाळा सुरू होईपर्यंत ही सेवा चालणार आहे.
पुणे -
एसटी महामंडळाचा भोगळ कारभार
प्रवास्यांना मनस्ताप, दोन वेळा तिकीट घेण्याची वेळ
अलिबागवरून पुण्याला निघालेल्या एसटी बसमधील प्रकार
मशीनमधील QR कोडवर पैसे ऑनलाईन सेंड करून देखील तिकीट मिळेना
कंडक्टर घेत आहेत स्वतःच्या अकाउंटवर पैसे
अनेक प्रवास्यांना काढावे लागले दोन वेळा तिकीट
कोल्हापूर -
- शस्त्र तस्करी प्रकरणात मध्यप्रदेशात छापा, कारागिरीला अटक
- मध्य प्रदेशातील खरगुण जिल्ह्यात गावठी पिस्तुले बनवणाऱ्या कारागिराला कोल्हापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
- सरनाम बरनाला असे या कारागिराचे नाव असून संशयताकडून दोन लाख रुपये किमतीची चार पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत.
- स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने काही दिवसांपूर्वी मनीष नागोरी या शस्त्र तस्कराला अटक केली होती त्याच्या चौकशीत तो मध्य प्रदेशातून पिस्तुले आणत असल्याची माहिती समोर आली होती.
- पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी दोन पदके मध्य प्रदेशात रवाना केली होती.
नाशिक -
- हर्षवर्धन सदगीरने दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीचा मान नाशिकला मिळवून दिला आहे.
- नाशिकच्या भगूरच्या बलकवडे व्यायामशाळेत त्याने कुस्तीचे धडे गिरवले होते
- दरम्यान कालच्या त्याच्या या विजयानंतर भगूरच्या बलकवडे व्यायामशाळेबाहेर कुस्तीप्रेमींकडून ढोलताशाच्या तालावर नृत्य करत, फटाके फोडत जल्लोष साजरा करण्यात आला.
- पहिला महाराष्ट्र केसरीचा किताब 2020 मध्ये पटकवल्यानंतर 6 वर्षातच दुसरा मान त्याने मिळवलाय..
कोल्हापूर -
गॅस सिलेंडरनंतर आता कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलसाठी गर्दी
कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये अनेक पंपावर पेट्रोल आणि डिझेल मिळेना
पेट्रोल- डिझेल संपणार असल्याच्या भीतीने नागरिकांच्या पेट्रोल पंपावर रांगा
भुदरगड आणि कागल तालुक्यात नागरिकांच्या रात्री उशिरापर्यंत पेट्रोलसाठी गर्दी
नागपूर -
- वंचित बहुजन आघाडी-काँग्रेसच्या मोर्चाला पोलिसांची परवानगी नकार
- वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मोर्च्यावर ठाम...
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा
- संविधान चौकात सभा घेऊन निवेदन द्या, पोलिसांच म्हणणं,
- संघ मुख्यालय अतिसंवेदनशील, सुरक्षा कारणास्तव पोलिसानी परवानगी नाकारली
हर्षवर्धन सदगीर दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी
सरकार विरोधात नाराजी व्यक्त करत घेतली कुस्ती स्पर्धेतून निवृत्ती
मुंबई -
- मुलुंडमध्ये नशेच्या आहारी जाऊन तीन जणांवरती वार
- मुलुंड साई प्रेस आणि मुलुंड कॉलनी येथे ही घटना घडली
- अजित पवार गटातून नगरसेवक साठी उभे असलेले सज्जू मलिक यांचे भाऊ युसुफ मलिक याचा मुलगा सुलतान ने केले वार
- नशेच्या आहारी जाऊन करण्यात आले वार
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.