Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये महापौर पद भाजपकडेच राहण्याची शक्यता

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज बुधवार, दिनांक २१ जानेवारी २०२६, जिल्हा परिषद पंचायत समिती आरक्षण, शिवसेना कुणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, २९ महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

जलील यांच्यावर हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत एमआयएमच्या प्रचार रॅलीत माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला करण्याच्या प्रयत्न झाला होता. या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी कलीम छोटू कुरेशी याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गोरवाडे यांनी फेटाळला. तर सहआरोपी हबीब छोटू कुरेशीला न्यायालयाने जामीन मंजूर केला.

Ratnagiri: रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

पाचव्या दिवशी उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी पाऊस

जिल्हा परिषदेसाठी ७१ आणि पंचायत समितीसाठी १२४ अर्ज

अर्ज भरण्यासाठी विविध पक्षांकडून शक्ती प्रदर्शन

उद्धव ठाकरे सेनेकडून पुन्हा एकदा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष थेराडे निवडणूक रिंगणात 

संगमेश्वर तालुक्यातील कडवई जिल्हा परिषद गटाकडून भरला उमेदवारी अर्ज

Nashik: नाशिकमध्ये महापौर पद भाजपकडेच राहण्याची शक्यता

मुंबई महापालिकेतील सत्ता स्थापनेसाठी भाजप–शिवसेना (शिंदे गट) वाटाघाटी तेजीत

मुंबईत भाजपला पाठिंब्याच्या बदल्यात नाशिकमध्ये सेनेला सत्तेत वाटा मिळण्याची शक्यता

नाशिकमध्ये भाजप स्वबळावर सत्तेचा दावा, मात्र तरीही तडजोडीचे संकेत

मुंबईत भाजप–शिवसेना युती, नाशिकमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना–राष्ट्रवादी लढत

मुंबई महापौरपदावरून तणाव, शिवसेनेची अडीच वर्षांची मागणी

मात्र भाजप पाच वर्षे महापौरपद स्वतःकडे ठेवण्यावर ठाम

मुंबई महापौरपद भाजपकडे राहिल्यास नाशिकमध्ये सेनेला पदांची तडजोड शक्य

नाशिकमध्ये महापौरपद भाजपकडेच राहण्याची शक्यता

उपमहापौर, स्थायी समिती सदस्य, प्रभाग समित्या आणि विषय समित्यांची पदे सेनेला मिळण्याची शक्यता

Malegoan: मालेगाव महापालिका सभागृहात आठ स्वीकृत सदस्यांची भर पडणार

नाशिकच्या मालेगाव महापालिकेत यंदा स्वीकृत सदस्यांची संख्या वाढणार आहे,शासनाच्या बदलेलेल्या धोरणा नुसार हा बदल होणार आहे.या पुर्वी मालेगाव महापालिकेत पाच स्वीकृत सदस्य निवडले जात होते मात्र नविन नियमानुसार त्यात तीन सदस्यांची भर पडणार असल्याने इच्छूकांच्या आशा बळावल्या असून,इस्लाम पार्टी चे चार,शिवसेना व एम आय एम चे प्रत्येकी दोन सदस्यांची वर्णी लागणार आहे.महापौर नियुक्ती नंतर ही निवड होणार आहे.

आमदार राहुल आवडे यांची कन्या निवडणुकीच्या रिंगणात

इचलकरंजी, वस्त्रनगरीच्या राजकारणात नेहमीच दबदबा असलेल्या आवाडे घराण्यातील चौथी पिढी आता राजकारणात पदार्पण करीत आहे. आमदार राहुल आवाडे यांची कन्या सानिका आवाडे या कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. आज त्या हातकणंगले तहसील कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ज्येष्ठ नेते माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे या तीन पिढ्यांनंतर आता सानिका आवाडे या राजकीय क्षेत्रात सक्रीय होत आहेत. नुकत्याच झालेल्या इचलकरंजी महापालिका निवडणुकीत अनेक प्रभागांत सानिका आवाडे यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती. सानिका आवाडे आता त्या कोरोची जिल्हा परिषद् मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर ए आपले नशीब आजमावणार आहेत. विशेष म्हणजे गेल्या जिल्हा परिषदेच्या सभागृहात सानिका यांचे वडील व विद्यमान आमदार राहुल आवाडे यांनी रेंदाळ जिल्हा परिषदेतून प्रतिनिधित्व केले होते. वडिलांप्रमाणेच सानिका यांनीही महापालिकेऐवजी जिल्हा परिषदेमध्ये नेतृत्व करण्यास प्राधान्य दिले आहे. त्यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आवाडे परिवारतील चौथी पिढी आता राजकारणात प्रवेश करीत. महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीने आमदार खासदार यांच्या मुलांना निवडणूक न लढवण्याच्या सूचना करून घराणेशाहीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला होता. आता जिल्हा परिषदेमध्ये अनेक नेते आमदार खासदारांच्या कुटुंबीयांनी अर्ज दाखल केलेले आहेत त्यामुळे आता भाजप कोणता निर्णय घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिलेला आहे.

Ratnagiri: माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष थेराडे पुन्हा एकदा निवडणुकीचा रिंगणात

कडवई जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष थेराडे शिवसेना उबाठाकडून पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.. जोरदार शक्तिप्रदर्शन करत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कडवई जिल्हा परिषद गट हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, आता जरी दोन गट पडले असले तरी ज्यांनी आमच्या पक्षाचं वाटोळं केलं त्यांच्याबद्दल शिवसैनिकांच्या मनात चीड आहे, आणि शिवसैनिक त्यांना या निवडणुकीत धडा शिकवतील. तसेच या ठिकणी शिवसेना आणि मनसे युती आहे.. त्यामुळे आपला पुन्हा एकदा विजय होईल असा विश्वास संतोष थेराडे यांनी व्यक्त केला..

भुसावळ येथे वांजोळा चौफुलीवर अपघात; कंटेनर डिव्हायडरला धडकला

भुसावळ येथे मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वांजोळा चौफुलीवर बोलेरो वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात भरधाव कंटेनर डिव्हायडरला धडकला असून सुदैवाने या अपघातात बोलेरो मधील सहा ते सात प्रवासी थोडक्यात बचावले आहे. वांजोळा चौफुलीवर सातत्याने अपघात होऊनही राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून या अपघाताची माहिती मिळताच नगराध्यक्षा गायत्री भंगाळे तसेच माजी आमदार संतोष चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Pandharpur: पंढरपुरात विठ्ठल मंदिरात लगीन घाई; विठ्ठल मंदिरावर विद्युत रोषणाई

पंढरपुरात उद्या विठ्ठल रूक्मिणीचा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. मंदिरात आज पासूनच लगीन घाई सुरू झाली आहे. विवाहाच्या निमित्ताने विठ्ठल रूक्मिणी मंदिरावर आकर्षक विद्युत दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. विद्युत दिव्यांच्या रोषणाईने मंदिर व‌ परिसर उजळून निघाला आहे.

ही रोषणाई देवाचे मंदिर,शिखर, पश्चिमद्वार,संत नामदेव पायरी,संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप,तुकाराम भवन आदी ठिकाणी करण्यात आली आहे.

Nagpur: भारत-न्यूझीलंड टी-२० सामना आज नागपूरच्या जामठा मैदानावर होणार

नागपूरच्या जामठा मैदानावर भारत-न्यूझीलंड टी-२० सामना होणार

सामना मैदानावर, पण पोलिसांची खरी कसोटी रस्त्यावर पवाहतूक व्यवस्थापन करताना पाहायला मिळणार आहे....

१०० अधिकारी आणि ५०० हून अधिक पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्त असणार...

ड्रोन आणि AI आधारित निरीक्षण प्रणालीचा वापर.

जामठा मैदानाच्या ६० एकर परिघात वाहनतळ व्यवस्था.

वर्धा मार्ग, समृद्धी महामार्ग, छत्तीसगड मध्यप्रदेश अमरावती मार्गांमुळे कोंडीची शक्यता.

जड वाहतुकीसाठी विविध वळण मार्ग निश्चित, वाहतूक शाखा सतर्क.

छत्रपती चौक ते डोंगरगाव टोल नाका मार्ग सामना आधी आणि नंतर प्रत्येकी २ तास जड वाहतुकीस बंद.

कोणत्याही परिस्थितीत वाहतूक कोंडी टाळण्याचे पोलिसांचे नियोजन, मात्र यशस्वी होणार की मनस्ताप देणार याकडे लक्ष..

Pune: महापालिका निवडणुकीत आचारसंहिता भंगाच्या ८५ तक्रारी ११ जणांवर गुन्हे दाखल

महापालिका निवडणुकीत आचारसंहिता भंगाच्या ८५ तक्रारी ११ जणांवर गुन्हे दाखल

तर कारवाईत ८६ लाखाच्या रोकड सह बारा लाखाची दारू आणि २७ लाखाचे अंमली पदार्थ जप्त

आचारसंहिता काळात ८५ तक्रारी दाखल झाल्या होत्या त्यात ११ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

85 तक्रारीची चौकशी करण्यात आली असून तथ्य आढळला 11 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

Nashik: बदलत्या वातावरणाचा गहू पिकावर परिणाम; करपा मावा रोगाचा प्रार्दुभाव

नाशिक जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणावर शेतक-यांनी गव्हाची पेरणी केली आहे,गेल्या काही दिवसां पासून मनमाड परिसरात सध्या ढगाळ वातावरण राहत असून या बदलत्या वातावरणाचा परिणाम गहू पिकावर होत असून,त्यामुळे त्यावर करपा,मावा रोगाचा प्रार्दुभाव दिसून लागल्याने शेतक-यांना रोगाला अटकाव करण्यासाठी महागडी औषधे फवारणी करावी लागत असल्याच चित्र पहावयास मिळत आहे.

Pune School Holiday: पुण्यातील अनेक शाळांना आज सुट्टी

पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६ निमित्ताने आज अनेक शाळांना सुट्टी जाहीर

पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड हद्दीतील सर्व शाळांना आज २१ जानेवारी रोजी सुट्टी जाहीर-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश जारी

पपुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६ आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या अनुषंगाने आयोजित दुसऱ्या टप्प्याच्या दिवशी पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड हद्दीतील सर्व प्रकारच्या सरकारी आणी खाजगी शाळांना आज बुधवार सुट्टी जाहीर करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डूडी यांनी जारी केले आहेत.

Yavatmal: यवतमाळमध्ये शाळेचा मार्ग सुरक्षित करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी उतरले रस्त्यावर

यवतमाळच्या पांढराकवडा येथील राष्ट्रीय महामार्गावर विद्यार्थ्यांच्या जीवित्याला धोका निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांनी शाळेचा मार्ग सुरक्षित करण्याच्या मागणीसाठी चक्क गावातील रस्त्यावर उतरून उडानपुला जवळ तीव्र आंदोलन केले.आम्हाला अंडरपास बोगदा द्या अन्यथा हे उड्डाणपूल नकोच अशी एकच ठाम मागणी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी केली.

राज्यातील २९ महापालिकांवर नगरसेवकांच्या मानधनामुळे वार्षिक ४० कोटींचा भार

राज्यातील २९ महापालिकांवर नगरसेवकांच्या मानधनामुळे वार्षिक ४० कोटींचा भार.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत २,८६९ नगरसेवक निवडून आले.

सर्व नगरसेवकांच्या मानधनासाठी दरमहा ३ कोटी ३४ लाखांहून अधिक खर्च.

सर्वसाधारण सभांच्या भत्त्यामुळे वार्षिक १ कोटी ३७ लाखांचा अतिरिक्त खर्च.

चार वर्षांनंतर महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्षांसाठी वाहन खरेदी.

नव्या वाहनांसाठी एकूण १५ कोटी ६६ लाखांचा भार महापालिकांवर.

२९ महापौरांच्या वाहनांसाठी ८ कोटी ७० लाख खर्च अपेक्षित.

उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांच्या ५८ वाहनांसाठी ६ कोटी ९६ लाख खर्च.

वाहनांच्या इंधन खर्चासह चालकांचे वेतनही महापालिकेवर.

प्रत्येक नगरसेवकासाठी मोबाईल सिम आणि मोबाईल बिलांचाही खर्च.

चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर महापालिकांत लोकप्रतिनिधींची सत्ता सुरू.

मुंबईसह राज्यातील महापालिकांची तिजोरी सुरुवातीलाच ताणाखाली.

जिल्हा परिषद,पंचायत समितीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

जिल्हा परिषद,पंचायत समितीसाठी ५०९ उमेदवारांकडून अर्ज दाखल,अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे

जिल्हा परिषद साठी १ हजार ८७२ तर पंचायत समिती साठी २ हजार ७७५ अर्जाची विक्री

जिल्हा परिषदेसाठी २०४ उमेदवारांकडून आतापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल

खेड तालुक्यातून ३४ भोर ३१ इंदापूर ३० दौंड २३ हवेली १७ बारामती १५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत

सर्वात कमी पाच उमेदवारी अर्ज जुन्नर तालुक्यातून दाखल झाले आहेत

पंचायत समिती साठी ३०५ उमेदवार अर्ज दाखल झाले आहेत यात खेड तालुक्यातून ५४ बारामती ४९ भोर एकोणचाळीस मुळशी अडतीस शिरूर २१ दोन पुरंदर तालुक्यातील १५ अर्ज दाखल झालेत.

सर्वात कमी ९ अर्ज जुन्नर दाखल झाल्या आहेत..

आज शेवटच्या दिवशी प्रमुख पक्षासह अपक्ष ही अर्ज दाखल करणार...

Maharashtra Live News Update: शिंदेसेना भाजपमध्ये विलीन होईल, शिंदेसेनेतील अनेकजण उद्धव ठाकरेंकडे स्वगृही परत जातील, असीम सरोदे यांचा दावा

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह यावर सुनावणीची तारीख उद्या सुप्रीम कोर्टात आहे पण 37 नंबरचे मॅटर सुनावणीसाठी बोर्डावर येणे कठीण आहे. पण निर्णय लागेल तो उद्धव ठाकरे यांच्या बाजूनेच असं झालं तर शिंदेसेना भाजपमध्ये विलीन होईल, शिंदेसेनेतील अनेकजण उद्धव ठाकरेंकडे स्वगृही परत जातील असा दावा वकील आणि कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी केला आहे. शिंदेसेनेतील अनेकजण उद्धव ठाकरेंकडे स्वगृही परत जातील व मूळ शिवसेना अधिक ताकदवान होईल असं ही ते म्हणाले.

राज्य शासनाच्या योजनेसाठी बैलगाडीतून आली अप्सरा...

राज्य शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2025 - 26 या महत्त्वाकांक्षी योजनेच्या प्रसिद्धीसाठी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान सोनालीने जिल्ह्यातील जयनगर, बामखेडा आणि श्रीरामपूर या ग्रामपंचायतींना भेटी देऊन तेथील विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली.

डोंबिवली मानपाड्यात जागा मालकाकडून रस्ता बंद; ११५ कुटुंबीयांचे हाल

डोंबिवली मानपाडा परिसरातील माऊली आरंभ इमारतीसमोर जागा मालकाने अचानक रस्ता बंद केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या सुमारे ११५ कुटुंबीयांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून दैनंदिन वाहतूक ठप्प झाली आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, हा रस्ता अनेक वर्षांपासून वापरात असून शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्णवाहिका तसेच अत्यावश्यक सेवांसाठी हा एकमेव मार्ग आहे. मात्र जागा मालकाने कोणतीही पूर्वसूचना न देता रस्ता बंद केल्यामुळे नागरिकांची गैरसोय वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Long And Short Haircuts: लांब आणि छोट्या केसांसाठी हे आहेत 5 ट्रेडिंग हेअरकट्स, एकदा नक्की ट्राय करा

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट! २०२६ मध्ये पगारवाढ नाहीच; कधी येणार एरियर?

Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनासाठी साधा आणि सुंदर लूक कसा करावा? जाणून घ्या आयडिया

India Tourism : भव्य किल्ला अन् मजबूत भिंती; भारतातील 'हे' ठिकाण ऐतिहासिक पराक्रमाचे प्रतीक

Atlee Kumar : "We Are Pregnant..."; अ‍ॅटली दुसऱ्यांदा बाबा होणार; बायकोसोबत फोटो शेअर करून दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT