Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: मुंबईहून सुरतकडे निघालेल्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज मंगळवार, दिनांक १० फेब्रुवारी २०२६, रोहित पवार यांची पत्रकार परिषद, जिल्हा परिषद पंचायत समितीचा निकाल, हवामान अपडेट्स, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

मुंबईहून सुरतकडे निघालेल्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड

पालघर - मुंबईहून सुरतकडे निघालेल्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर पालघरच्या केळवे रोड परिसरात हेलिकॉप्टरचा इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली.

पुण्यात भीषण अपघात, टेम्पोची अनेक वाहनांना धडक

पुण्यातील तळजाई माता वसाहत विनकर सभागृह जवळ अपघात

टेम्पो चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने मोठा अपघात

Pune : पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी

पुणे नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

चाकण ते मोशी पर्यत ७ किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा

नित्याच्याच वाहतुककोंडीमुळे कामगारांसह प्रवाशी त्रस्त

वाहतुककोंडीतुन मार्ग काढताना प्रवाशांचा होतोय संताप

Mumbra Fire : मुंब्रा बायपासजवळ डोंगराला लागली आग

मुंब्रा बायपास येथे डोंगर भागात काही वेळापूर्वी आग लागण्याची घटना....घडलेली आहे.

आग लागण्याचे कारण अस्पष्ट....

अग्निशमन दलाच्या वतीने आगीवर नियंत्रणात आणण्याचे काम सुरू...आता तरी वाहतुक वर कुठलाही परिणाम झालेला नाहिये.

Dombivli : डोंबिवलीमध्ये पाईपलाईन फुटली, हजारो लिटर पाणी वाया

डोंबिवली खंबाळपाड्यात पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया

डोंबिवली मॉडेल कॉलेज, खंबाळपाडा परिसरात पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी रस्त्यावर

परिसरातील संपूर्ण रस्ता झाला जलमय;

पुणे पोलिसांचे मेगा ड्राईव्ह! "ट्रिपल सीट" चालवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

पुणे शहरातील विविध प्रमुख रस्ते, चौक व वाहतूक दाटीच्या ठिकाणी कारवाई करण्यात आली. पुणे शहर वाहतूक विभागातील 30 वाहतूक विभाग तसेच 44 पोलीस स्टेशन येथील अधिकारी व अंमलदार यांच्याकडून कारवाई.

 नवापूर हायवेवर अपघाताचा थरार, ट्रक आणि कारची समोरासमोर धडक 

नवापूर जवळील देवळफळी ब्रिजवर ट्रक आणि कारची समोरासमोर भीषण धडक.... सोनगड येथील व्यापारी पती पत्नी अपघातात गंभीर जखमी. गंभीर दुखापत झाल्याने जखमींना तातडीने सुरतच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले.

वंचित बहुजन आघाडीची चंद्रपूर शहर कार्यकारिणी बरखास्त

वंचित बहुजन आघाडीचे चंद्रपूर शहराध्यक्ष स्नेहल रामटेके यांच्या अध्यक्षतेखालील चंद्रपूर शहर कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे.

कोल्हापुरातील गगनबावडा येथे इथेनॉलच्या  टँकरला आग

कोल्हापूरच्या गगनबावडा तालुक्यातील मनदूर येथील घटना. इथेनॉल घेऊन जाणारा टँकरचा टायर फुटल्याने जागेवरच टँकर पलटी झाला. त्यानंतर पेट घेताल. आग विझवण्याचं काम सुरू आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूची वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आलीय.

 समृद्धी महामार्गावर कारला भीषण आग, प्रवाशी थोडक्यात बचावले

मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर शहापूर तालुक्यातील खुटघर टोल प्लाझा जवळ आज दुपारच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात कार जळून खाक झाली आहे तर प्रवाशी थोडक्यात बचावले मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गावर मुंबईहून नागपूरच्या दिशेने जाणारी फोर्ड फिगो कारला अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण कार जळून खाक झाली.

भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसेंना उच्च न्यायालयाचा दिलासा  

भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी हा दिलास देण्यात आला आहे. यामुळे सत्र न्यायालयात १३ तारखेला होणारी आरोप निश्चिती टळली. 24 तारखेपर्यंत स्थगिती असून पुढील सुनावणी 24 तारखेला होणार आहे.

काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण भाजपमध्ये जाणार?समाज माध्यमावर चर्चा रंगल्या    

-नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण भाजपात जाणार असल्याच्या पोस्ट समाज माध्यमावर फिरत आहेत. त्यामूळे जिल्ह्यात चर्चेला उधाण आल.मी काँगेसचा सच्चा पाईक असुन काँगेस सोबत एकनिष्ठ राहणार अशी प्रतिक्रिया खासदार रविंद चव्हाण यांनी दिली. जनतेत संभ्रम निर्माण करण्यासाठी समाज माध्यमावर अफवा पसरवल्या जात आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताची उच्चस्तरीय चौकशीची मागणी

आमदार अमोल मिटकरी प्रदेश प्रवक्त्या रूपाली ठोंबरे पाटील राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस दत्ता चव्हाण ,रवींद्र पाटील, सुभाष गायकवाड ,महेश जाधव , सायली दळवी

केंद्रीय मंत्री रामदास आठवले शरद पवारांची भेट घेण्यासाठी पोहोचले

शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, त्यांचा खोकला देखील कमी झाला असल्याची माहिती....

काल दुपारी शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेय...

शक्तिपीठ महामार्गाला लातूरच्या मोरवड मध्ये शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी केला तीव्र विरोध.

लातूर जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून सातत्याने विरोध होताना दिसतो आहे, आज लातूरच्या रेनापुर तालुक्यातील मोरवड येथे महामार्गाच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला, यावेळी एका तरुण शेतकऱ्याने झाडावर चढत आत्महत्याचा प्रयत्न केला, यावेळी अधिकाऱ्यांनी पोलिसांचा मोठा फौज फाटा लावण्याने शेतकरी चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान सुपीक आणि बागायती जमिनीतून जाणारा हा शक्तिपीठ महामार्ग कायमस्वरूपी रद्द करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते आहे,

यवतमाळात वाहनांच्या बॅटरी चोरीप्रकरणी तिघांना अटक

चारचाकी वाहनांच्या बॅटरी चोरीप्रकरणी यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली असून या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तब्बल दोन लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपींनी यवतमाळ शहरासह ग्रामीण भागात बॅटरी चोरी केल्याची कबुली दिली आहे. या कारवाईमुळे चार वेगवेगळ्या गुन्ह्यांचा उलगडा झाला असून पुढील तपास सुरू आहे.

पुण्यात भाजप नगरसेवकाचा आदर्श निर्णय, महापालिकेचे मानधन स्वीकारण्यास नकार

पुणे महानगरपालिकेच्या च्या निवडणुकीत प्रभाग २५ मधून नवनिर्वाचित झालेले भाजपाचे नगरसेवक राघवेंद्र मानकर यांनी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. त्यांनी नगरसेवक म्हणून मिळणारे मासिक मानधन आणि इतर सर्व प्रकारचे भत्ते स्वीकारण्यास नकार दिला आहे. मानकर यांनी ही मानधनाची रक्कम ‘महापौर निधी’ला वर्ग करण्याबाबतचे पत्र प्रशासनाला दिले आहे. शहरातील गरजू रुग्णांच्या वैद्यकीय मदतीसाठी ही रक्कम खर्च करण्याचे आवाहन त्यांनी केलं. प्रभागातील नागरिकांनी टाकलेल्या विश्वासाचे मानधन घेणे त्यांना योग्य वाटत नाही. नागरिकांच्या कररूपी पैशातून येणारे मानधन त्यांच्या सेवेसाठी खर्च व्हावे असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

चंद्रपूर महापालिकेवर भाजपचा झेंडा संगीता खांडेकर महापौर, प्रशांत दानव उपमहापौर

चंद्रपूर महानगरपालिकेवर भाजपने आपला झेंडा फडकवण्यात यश मिळवले आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या महापौर निवडणुकीत भाजपने केवळ एका मताने विजय प्राप्त केला. भाजपच्या संगीता खांडेकर महापौर, तर ठाकरे सेनेचे प्रशांत दानव हे उपमहापौर झाले. या दोघांनाही 32 मते मिळाली. उपमहापौर निवडणुकीत काँग्रेस आघाडीचे उमेदवार पप्पू देशमुख यांनाही 32 मते पडल्याने उपमहापौर पदासाठी ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. यात दानव भाग्यवान ठरले.

पत्नीच्या विजयी मिरवणुकीत माजी आमदार भाजप नेते संग्राम थोपटे थिरकले

पत्नी स्वरूपा थोपटे ह्या विजयी झाल्यानंतर काढण्यात आलेल्या विजयी मिरवणुकीत संग्राम थोपटे यांचा भन्नाट डान्स

संग्राम थोपटे यांचा डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल

संग्राम थोपटे यांच्या पत्नी स्वरूपा थोपटे ह्या भोरमधील जिल्हा परिषदेच्या उत्रौली-कारी गटातून राष्ट्रवादीचे उमेदवार रणजित शिवतरे यांच्या विरोधात निवडून आल्या.. त्यानंतर भोरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष करत विजयी मिरवणूक काढण्यात आली..

या विजयी मिरवणुकीत....पत्नी विजयी झाल्याच्या आनंदात संग्राम थोपटे बेभान होऊन नाचताना पहायला मिळाले....

नंदुरबार शहरातील अतिक्रमण हटवा अन्यथा कारवाई होणार आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा इशारा

नंदुरबार शहरात दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत आहे त्यामुळे पालिकेच्या वतीने नोटीसा देण्यात आले असून यासाठी अतिक्रमण धारकांनी स्वखर्चाने अतिक्रमण काढून घ्यावा अन्यथा पालिकेला कारवाई करावी लागणार शिवसेना शिंदे गटाच्या आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या अतिक्रमणधारकांना इशारा दिलेला आहे नंदुरबार शहर झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वाहतुकीची देखील समस्या उद्भवत असल्याने शहरातील अनेक ठिकाणी अतिक्रमण होत आहे. विशेषता दुकानदारांकडून अधिक अतिक्रमण केलं जात आहे दुकानापेक्षा त्यांच्या माल रस्त्यावर ठेवत असता, यामुळे रधारीला मोठी अडचण निर्माण होत आहे तर शहरातील धुळे, चौफुली नवापूर, चौफुली जगतापवाडी चौफुली, करण चौफुली आणि सीबी पेट्रोल पंप परिसरात अतिक्रमण वाढलं आहे. हे अतिक्रमण काढण्यासाठी पालिकेच्या वतीने नोटीसा देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे तातडीने अतिक्रमण काढून घेण्यात यावा असे आवाहन अंदर चंद्रकांत रघुवंशी यांनी केलं आहे तर ही मोहीम अशीच सुरू राहावी असे देखील अपेक्षा रघुवंशी यांनी व्यक्त केलीये.

बीड तालुक्यातील चौसाळा येथील आर्ट्स अँड सायन्स या परीक्षा केंद्रावर परीक्षा केंद्रावर कॉपीचा सुळसुळाट

आजपासून 12 वीची परीक्षा सुरू झालेली आहे. बीड तालुक्यातील चौसाळा येथील आर्ट्स अँड सायन्स या परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात कॉप्यांचा सुळसुळाट असल्याचे दिसून येत आहे. ड्रोन ने टिपलेल्या या दृश्यांमध्ये परीक्षा केंद्राच्या बाहेरून मोठ्या प्रमाणात काही तरुण आतमध्ये कॉपी देत असल्याचे दिसत आहे.

नांदेड महापालिकेच्या महापौर, उपमहापौरपदी भाजपाचे उमेदवार बहुमताने विजयी

नांदेड महापालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या कविता मुळे.उपमहापौरपदी दीपकसिंह रावत यांची निवड जाहीर झाली. भाजपाच्या महापौर , उपमहापौर पदाच्या उमेदवारांना प्रत्येकी 50 मत मिळाली.भाजपाने एकुण 81 पैकी 45 जागा जिंकल्या आहेत. निवडणुकीनंतर शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी भाजपा पाठींबा दिला.शिवाय एका अपक्ष नगरसेविकेने देखील महापौर, उपमहापौर निवडणूकीत भाजपाला मतदान केले. एमआयएमच्या उमेदवाराना 14 मत मिळाली तर काँग्रेस - वंचित आघाडीला 15 मत मिळाली. राष्ट्रवादीचे दोन सदस्य तटस्थ राहिले.एकूण 35 मतधिक्याने भाजपाचे महापौर उपमहापौर पदाचे उमेदवार विजयी घोषित करण्यात आले.

12 वी परीक्षेदरम्यान पहिल्याच दिवशी प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर

ज पासून राज्यभरात 12 वीची परीक्षा सुरू झाली आहे, हिंगोलीत पहिल्या दिवशी शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुढे आला आहे, बारावी परीक्षा दरम्यान कॉपी टाळण्यासाठी गेल्या पंधरा दिवसापासून तयारी करणाऱ्या हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या सूचनांना शिक्षण विभागाने केराची टोपली दाखवली आहे कारण कॉफी सेंटर म्हणून ओळख असलेल्या आणि संवेदनशील परीक्षा केंद्र असलेल्या परीक्षा सेंटर वरील सीसीटीव्ही केंद्रांचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहण्यासाठी उभारण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने स्वतःच्या मोबाईलवर सर्व फुटेज पाहण्याची वेळ शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांवर आली आहे दरम्यान मोबाईलवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहताना कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे हिंगोली जिल्ह्यात 15,241 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेसाठी पात्र झाले आहेत मात्र याच परीक्षा दरम्यान हा सगळा सावळा गोंधळ पाहायला मिळाला आहे

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची तब्येत एकदम व्यवस्थित

  • आता तब्येत एकदम व्यवस्थित आहे

  • काल खोकला होता म्हणून हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं

  • आता त्यांना आरामासाठी दवाखान्यात ठेवण्यात आले आहे.

  • शरद पवार पूर्णतः नॉर्मल आहे काळजीचा कारण नाही.

  • कार्यकर्त्यांशी बोलल्याशिवाय त्यांना रहावत नाही आणि बोललं की त्रास होतो.

  • विठ्ठलशेठ मनियार यांनी दिली माहिती

चंद्रपूरच्या विकासासाठी शिवसेनेसोबत युती केली- सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूरच्या विकासासाठी शिवसेनेसोबत युती केली. चंद्रपूरच्या विकासाचा आराखडा मी तयार करून असून विकसित चंद्रपूरसाठी आम्ही काम करणार, अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

हिंगोलीमध्ये १२ वीच्या परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही स्ट्रॉंग रूममध्ये तांत्रिक अडचणी

बारावीच्या परीक्षा सुरू असलेल्या परीक्षा केंद्रावर लक्ष ठेवण्यासाठी स्थापन केलेल्या सीसीटीव्ही स्ट्रॉंग रूममध्ये तांत्रिक अडचणी

सीसीटीव्ही सुरू मात्र स्ट्राँग रूम मधील लाईव्ह स्ट्रिमिंग दिसेना

15 हजार 241 विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू

नंदुरबार शहरातील 79 टक्के दिव्यांगत्वावर मात करत तुषार देतोय बारावीची परीक्षा

नियतीने शरीराची साथ नाकारली, पण ध्येयाची ओढ त्याला स्वस्थ बसू देईना. नंदुरबार येथील डी. आर. हायस्कूलचा विद्यार्थी तुषार बन्सीलाल पिंपळे याने आपल्या 79 टक्के दिव्यांगत्वावर जिद्दीने मात करत बारावीची परीक्षा देत आहे. ​ज्या वयात मुले खेळण्या बागडण्यात दंग असतात, तिथे तुषारने आपल्या शारीरिक मर्यादांशी लढा दिला. आज बारावीच्या पहिल्या पेपरला सामोरे जाताना तुषारचा आत्मविश्वास एखाद्या निरोगी विद्यार्थ्यापेक्षाही अधिक होता.जिद्द असेल तर आकाशही ठेंगणे असते, हेच तुषारने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. त्याच्या या धाडसाचे जिल्हाभरातून कौतुक होत असून, प्रतिकूल परिस्थितीवर रडत न बसता लढणाऱ्या प्रत्येकासाठी तुषार आज एक आदर्श बनला आहे.

चंद्रपुरात भाजपचा महापौर!

चंद्रपुरात भाजपचा महापौर

संगीता खांडेकर एका मताने आल्या निवडून

32 मते घेत झाल्या विजयी

लातूर शहराला मिळाले नवे कारभारी!

लातूर शहराला मिळाले नवे कारभारी

काँग्रेसच्या जयश्री सोनकांबळे महापौरपदी

अवैध व्यावसायिकांशी संबंध,स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांवर कार्यवाही

हिंगोली जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पाच पोलिस कर्मचाऱ्यांचे अवैध व्यावसायिक आणि वाळूमाफियांशी संबंध असल्याच्या कारणावरून पोलीस अधीक्षकांनी कान टोचले आहेत, या पोलीस कर्मचाऱ्यांची स्थानिक गुन्हे शाखेतून उचल बांगडी करत पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांनी कार्यवाही केली आहे दरम्यान पोलीस दलात कर्मचाऱ्यांनी शिस्तीचे पालन करावे अशा सूचना देखील पोलीस अधीक्षकांनी दिल्या आहेत.

कोकण बोर्डाच्या बारावीच्या परीक्षांना सुरुवात

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून कोकण बोर्डाच्या बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. कोकण विभागीय मंडळा अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 23 परीक्षा केंद्रांवर 8 हजार 292 विद्यार्थी, तर रत्नागिरी जिल्ह्यातील 38 केंद्रांवर 15 हजार 710 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. दोन्ही जिल्हे मिळून यंदा एकूण 24 हजार 2 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला सामोरे जात आहेत. यंदाच्या परीक्षेचे खास वैशिष्ट्य म्हणजे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच परीक्षा घेतली जात आहे. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी आणि पारदर्शकता राखण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना शांत आणि तणावमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे चित्र आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली शरद पवारांना तब्येतीची विचारना

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली तब्येतीची विचा ना

आज सकाळी आला पंतप्रधानांचा पवारांना फोन

पवारांच्या तब्येतीत सुधारणा आज संध्याकाळी किंवा उद्या डिस्चार्ज दिला जाणार.

सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला उपमुख्यमंत्री पदाचा पदभार

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, पार्थ अजित पवार,  सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदानंद सरवणकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

संभाजीनगर : महापौर, उपमहापौर निवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना तटस्थ राहणार

छत्रपती संभाजी नगर महापालिकेवर भाजपचा महापौर आज विराजमान होणार आहे. थोड्याच वेळात निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. निवडणुकीची केवळ औपचारिकता बाकी आहे. कारण भाजप आणि शिवसेना एकत्रित 70 नगरसेवकांचे पाठबळ भाजप आणि शिवसेनेकडे आहे. या निवडणुकीत महापौर म्हणून समीर राजूरकर, आणि उपमहापौर म्हणून राजेंद्र जंजाळ हे विजयी होणार आहेत.

राज्यभरात आजपासून बारावीची परीक्षा सुरू

पुण्यातील सदाशिव पेठेतील भावे हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना औक्षण करून विद्यार्थ्यांचे स्वागत करत दिल्या परीक्षेच्या शुभेच्छा

वाघोलीतील बकोरी रोड परिसरात विद्यार्थ्यांच्या दोन गटांत हाणामारी,व्हिडिओ व्हायरल

वाघोली येथील बकोरी रोड परिसरात असलेल्या शाळा व कॉलेज परिसरात विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये पुन्हा एकदा हाणामारीची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.व्हायरल व्हिडिओमध्ये एका हॉटेलजवळ एका तरुणाने दुसऱ्या तरुणाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना स्पष्टपणे दिसत आहे.या प्रकारामुळे काही काळ परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

कुडाळ-मालवण तालुक्यात शिंदे गटाला ५० हजार, भाजप पक्षाला ११ हजार

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत जो निकाल लागला तो आम्ही स्वीकारला आहे. कुडाळ-मालवणमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे २ जिल्हापरिषद सदस्य आणि ५ पंचायत समिती सदस्य निवडून आले आहेत. कुडाळ-मालवण तालुक्यात शिंदेगट आणि भाजप पक्षाची युती असूनही शिंदे गटाच्या उमेदवारांना एकूण ५० हजार ३३५ मते आणि भाजपच्या उमेदवारांना ११ हजार ४५४ अशी एकूण ६१ हजार ७८९ मते शिंदे-भाजप महायुतीला मिळाली. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकटा लढून देखील आम्हाला ४९ हजार १३० मते मिळाली असल्याचे सांगत विरोधीपक्ष म्हणून आम्ही विकासकामांना सहकार्य करू आणि चुकीच करत असाल तर सक्षम विरोधीपक्षाची भुमिका बजावू असा इशारा वैभव नाईक यांनी महायुतीला दिला आहे

Maharashtra Live News Update: शरद पवार यांच्या तब्येतीत सुधारणा

शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होता तो बऱ्यापैकी कमी झालाय…

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवार यांना विश्रांतीची गरज

सध्यातरी शरद पवारांना कुणीही भेटू नये अशी सूचना

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवार यांना डिस्चार्ज कधी देयचा याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे

पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया_50 ते 60 फूट उंच पाण्याचे फवारे

राहुरी तालुक्यातील धामोरी स्टेशन परिसरात वांबोरी चारी योजनेची पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले असून आसपासच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.. पाईपलाईन फुटल्याने 50 ते 60 फूट उंच पाण्याचे फवारे उडत होते.. फुटलेल्या ठिकाणी मोठा ओढा असून, या ओढ्यातून पाणी थेट देव नदीच्या दिशेने वाहून गेले.. पाईपलाईन फुटण्याचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही मात्र पाण्याच्या अतिप्रवाहामुळे योजनेचा पाईप फुटल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.. एक तासाने पाणी बंद करण्यात आले, मात्र तोपर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेले होते..

रोहित पवार यांची पत्रकार परिषद

बारामतीतील विमान अपघातात झालेल्या अजितदादांच्या दुर्दैवी निधनाबाबत महाराष्ट्रासह माझ्याही मनात अनेक शंका आहेत. यासंदर्भात आज (मंगळवार, दि. १० फेब्रुवारी) सायंकाळी ४ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाचे आणि डोळे उघडणारे मुद्दे तपशीलवार मांडणार आहे.

जालन्यात 156 पोलिस शिपाई पदासाठी उद्यापासून भरती प्रक्रियेला होणार सुरुवात

जालन्यात पोलिस दलातील 156 रिक्त पोलिस शिपाई पदासाठी उद्यापासून भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. पोलीस शिपाई भरतीसाठी प्रशासन सज्ज झाला आहे. 156 जागांसाठी तब्बल 9 हजार 745 जणांचे अर्ज आले आहेत. दरम्यान भरती प्रक्रिया पारदर्शक करण्याच्या उद्देशाने मैदानाची चाचणी इन कॅमेरा घेतली जाणार असून तब्बल 250 पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त राहणार आहेत. मैदानी चाचणी पोलिस मैदान येथे होणार असून मैदानी चाचणी पारदर्शक होण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. शिवाय ड्रोनव्दारे मैदानी चाचणी व्हिडीओ रेकाॅर्डिंग केले जाणार आहे. दरम्यान पोलिस भरती प्रक्रिये दरम्यान कोणताही गैर प्रकार होणार नाही. त्यामुळे जर कोणी पैसे घेऊन उमेदवारांची दिशाभूल करत असेल तर या संदर्भात तत्काळ पोलिसांकडे तक्रार करावी अस आवाहन जालन्याचे अप्पर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी यांनी केलं आहे.

धाराशिवमध्ये शिंदेच्या शिवसेनेची मोर्चेबांधणी,अजित पिंगळे यांची प्रभारी जिल्हाप्रमुखपदी निवड

आगामी काळातील निवडणूका आणि पक्षविस्ताराच्या पाश्र्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीने संघटनात्मक फेरबदल करण्यास सुरुवात केली आहे.कळंब मधील शिवसेना नेते अजित पिंगळे यांची धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघासाठी प्रभारी जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहेत.शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून याबाबतचे अधिकृत नियुक्ती पत्र जारी करण्यात आले आहे.संघटनात्मक पातळीवर हे बदल केले जातात अशी माहीती शिवसेनेचे संपर्कप्रमुख माजी आमदार राजन साळवी यांनी दिलीय.

सांगली महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युती

सांगली महापालिका मध्ये आता भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सत्ता स्थापन होणार आहे.. आज भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युतीचा आज महापौर व उपमहापौर उमेदवारांच्या निवड पार पडणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून याबाबतची घोषणा करण्यात आली होती. तसेच महापौर आणि उपमहापौर पदाच्या नावांची देखील चंद्रकांत पाटलांकडून घोषणा करण्यात आली आहे. भाजपाकडुन महापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी यांचं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून गजानन मगदूम यांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे उपस्थितीमध्ये नावांची घोषणा करण्यात आली होती.

भाजप पदग्रहण सोहळ्यात काँग्रेस आमदार विकास ठाकरेचा फोटो, महापौर-उपमहापौर बॅकड्रॉपवर विकास ठाकरे झळकले

- भाजप पदग्रहण सोहळ्यात काँग्रेस आमदार विकास ठाकरेचा फोटो, महापौर-उपमहापौर बॅकड्रॉपवर विकास ठाकरे झळकले

- मोदी-शहा यांच्या रांगेत ठाकरे यांचा फोटो, भाजपच्या आमदारांसोबत काँग्रेस नेत्याचे छायाचित्र

- दोन्ही पक्षांत चर्चांना उधाण, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

- भाजपचे स्पष्टीकरण आमदार म्हणून निमंत्रण होते, मग इतर पक्षांच्या अध्यक्षांचे फोटो का नाहीत?

- मित्रपक्षांच्या शहराध्यक्षांचा फोटो गायब, विकास ठाकरेंच्या लोकप्रियतेचा राजकीय अर्थ?

- महापालिकेच्या कार्यक्रमात राजकीय चर्चेला उधाण...

म्हाडाच्या 4186 सदनिकांची आज सोडत....

पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाच्या पुणे विभागाची आचारसंहितेमध्ये अडकलेली सोडत आज जाहीर होणार आहे पुणे विभागातील पुणे पिंपरी चिंचवड सोलापूर कोल्हापूर आणि सांगली येथील 4186 सदनिकांचा यामध्ये समावेश आहे.

म्हाडाचे सभापती माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थित पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात ही सोडत दुपारी बारा वाजता होणार आहे.

चंद्रपूरचा महापौर आज ठरणार,  अकरा वाजेपासून प्रक्रियेला सुरुवात

चंद्रपूर महानगरपालिकेचा महापौर आज ठरणार आहे. महापौर पदासाठी आज दुपारी 11 वाजता महापालिकेत निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने महापौर कोण होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेस, भाजप, ठाकरे शिवसेना यांनी या पदावर दावा केला असून, अंकांची जुळवाजुळव करण्यात सर्वच पक्षांची दमछाक होत आहे. महापालिकेत काँग्रेस 27 जागांसह सर्वात मोठा पक्ष आहे. पाठोपाठ 23 जागांसह भाजप असून, ठाकरे सेनेचे वंचितसह आठ सदस्य आहेत. सत्तेचे गणित ठाकरे सेनेच्या हाती असल्याने महापौर पद आम्हाला द्या, अशी ठाम भूमिका ठाकरे सेनेने घेत इतरांना पाठिंबा देण्यास नकार दिला. पण तरीही या सेनेची चर्चा काँग्रेस आणि भाजपसोबत शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होती. यावर आता कोणता तोडगा निघतो, हे सभागृहात स्पष्ट होणार आहे. त्यामुळे चंद्रपूरच्या महापौर पदाचे चित्र अजूनही धूसर आहे.

रायगड जिल्हा परिषदेत शिंदेसेना सत्तेत बसणार - गोगावले

रायगड जिल्हा परिषदेत शिंदेसेना सत्तेत बसणार असल्याचा युक्तीवाद मंत्री भरत गोगावले यांनी केला आहे. दक्षिण रायगडमध्ये भाजपसोबत युती नसली तरी उत्तर रायगडमध्ये आम्ही भाजपसोबत युतीत निवडणुका लढवल्या आहेत आणि तेथेच भाजपाच्या अधिक जागा निवडून आल्याच सांगत शिंदेसेना सत्तेत बसणार असल्याचा युक्तीवाद गोगावले यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा येणार नवी मुंबईत

‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’ यांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त दि. 28 फेब्रुवारी व 01 मार्च 2026 रोजी खारघर, नवी मुंबई येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाची आरम्भता की ‘अरदास’ संत समाजचे प्रधान संत ज्ञानी हरनाम सिंघ जी, मुखी दमदमी टकसाल यांच्या हस्ते ओवे मैदान, सेक्टर 29, खारघर, नवी मुंबई येथे करण्यात आली.

ग्रामपंचायतींवरील ‘प्रशासक राज’ला उच्च न्यायालयाचा नागपूर खंडपीठाची स्थगिती

- ग्रामपंचायतींवरील ‘प्रशासक राज’ला उच्च न्यायालयाचा नागपूर खंडपीठाची स्थगिती,ग्रामविकास विभाग आणि राज्य निवडणूक आयोगाला नोटीस

- कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंच्यातवर प्रशासक नेमच्याचा राज्य शासनाच्या निर्णयावर नागपूर खंडपीठाचा ब्रेक,

- जानेवारी ते डिसेंबर २०२६ दरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा प्रश्न, निवडणूक न घेता प्रशासक नेमण्याच्या आदेशाला आव्हान

- २३ जानेवारीच्या शासन परिपत्रकावर न्यायालयाची कारवाई, लोकशाही रचनेवर परिणाम होत असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा

- कार्यकाळ संपताच निवडणूक होणे आवश्यक, प्रशासक नेमत वर्षभर निवडणुका टाळण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप

- कोरोना काळाचा दाखला सध्याच्या परिस्थितीत ग्राह्य नाही, ग्रामविकास विभाग आणि राज्य निवडणूक आयोगाला नोटीस

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू 25 फेब्रुवारी रोजी नागपूरच्या दौऱ्यावर

- राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू 25 फेब्रुवारी रोजी नागपूरच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती आहे..

- नागपुरात राष्ट्रपती "ब्रह्माकुमारीज" या संस्थेच्या वतीने आयोजित "एकात्मता आणि विश्वासातून महाराष्ट्राचा सुवर्णकाळ" या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत..

- हा कार्यक्रम 25 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता नागपूर जवळच्या जामठा येथील "विश्वशांती सरोवर" परिसरात आयोजित करण्यात येणार आहे...

- बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे सुद्धा राष्ट्रपती यांचा संभाव्य दौरा आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : महाराष्ट्र ATS कडून मुंबईत तीन ठिकाणी छापे

Iran-Israel War: खामेनेईंवर हल्ला करण्यासाठी वापरलेलं सर्वात शक्तिशाली मिसाईल कोणतं? वैशिष्ट्य काय

Nautral Skin Care Tips: नितळ आणि चमकदार त्वचेसाठी घरीच करा सोपा उपाय

Daily wear Simple Mangalsutra Design: साडी ते ड्रेससाठी परफेक्ट, रोजच्या वापरासाठी ट्राय करा 'हे' ट्रेंडी मंगळसूत्र

Natural acne remedy: फक्त ५ रूपयात होणार पिंपल्सपासून सुटका; घरच्या घरी वापरा ही सोपी ट्रिक

SCROLL FOR NEXT