मुख्यमंत्री आज रात्री ऊशिरा दिल्लीत भाजप पक्ष श्रेष्टीच्या भेटीसाठी जाण्याची शक्यता सूत्रांनी दिली आहे. जागा वाटपासंदर्भात महत्वाची बैठक होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे १०० जागा लढवण्यावर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवारांना बाहेरून लढवल्यास जास्त फायदा होईल, त्यातच महायुतीचा फायदा याबाबत अमित शहा यांच्याशीही चर्चा सूरू असल्याची माहिती मिळत आहे.
रत्नागिरीतील महिलांना पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून मोबाईल
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नत्ती अभियाना अंतर्गत दिले गेले मोबाईल
बचत गटाच्या 2400 सीआरपी महीलांना दिले गेले मोबाईल
इशासन गतीमान करण्यासाठी , महीलांच काम जलदगतीनं होण्यासाठी देण्यात आले स्मार्ट मोबाईल
तुतारी चिन्हावर लढण्यास इच्छुकांच्या मुलाखती होणार आहे.पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालय, मार्केटयार्ड, गुलटेकडी येथे होणार मुलाखती शनिवार, रविवार आणि सोमवारी मुलाखती होणार आहेत.
खासदार बजरंग सोनावणे, अमर काळे आणि निलेश लंके यांच्यावर महत्वाची जबाबदारी आहे. मराठवाड्यातून विधानसभा लढण्यास इच्छुकांच्या खासदार बजरंग सोनावणे मुलाखत घेणार आहेत. विदर्भातील इच्छुक उमेदवारांची मुलाखत खासदार अमर काळे घेणार आहेत. उत्तर महाराष्ट्रातून निवडणूक लढू पाहणार्या उमेदवारांची मुलाखत खासदार निलेश लंके घेणार आहेत.
काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांनी घेतली शरद पवार यांची भेट
सांगलीत शरद पवार यांच्या भेटीला काँग्रेस नेत्या जयश्री वहिनी पोहचल्या.
जयश्री वहिनी पाटील काँग्रेसच्या सांगलीच्या इच्छुक उमेदवार
पार्टीचा विजय म्हणजे कार्यकर्त्यांची प्रगती हा मंत्र समजा आणि विजयाच्या ध्येयाने कामाला लागा
भाजपच्या केंद्रीय समितीने दिला नेते आणि पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला आहे.
धनुष्यबाण असो किंवा घड्याळ, भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे दोन्ही चिन्ह "कमळ" समजून विजयाचे लक्ष्य निश्चित करून काम करा, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून पदाधिकाऱ्यांना सूचना
भाजपच्या केंद्रीय समितीकडून महाराष्ट्रावर विशेष लक्ष
शारदीय नवरात्री निमित्ताने पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मातेला आज पारंपारिक दागिन्यांचा साज घालण्यात आला आहे. नवरात्री निमित्ताने विठ्ठल आणि रूक्मिणी मातेला नऊ दिवस विविध असे विविध पारंपरिक अलंकार परिधान करून विविध रूपात पूजा मांडली जाते.
मरीन ड्राईव्ह परिसरातून अपहरण झालेल्या चिमुकलीला राजस्थानमधून रेस्क्यू करण्यात आलं आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष १ ची कारवाई केली आहे. अपहरण करणाऱ्या महिलेला अटक केली. काही दिवसांपूर्वी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चिमुकलीचं अपहरण झालं होतं.
गेल्यावेळी एका साखर कारखान्याच्या कार्यक्रमात हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली असं माध्यमाने दाखवलं होतं. मात्र त्यानंतर ते माझ्या भेटीला आले त्यावेळी त्यांनी मला स्पष्ट सांगितलं आहे. या संदर्भात मी माहिती घेतो आणि त्यांच्याशी बोलतो, मला असं वाटतं की हर्षवर्धन पाटील पक्ष सोडून जाणार नाहीत. फडणवीस यांच्या विरोधात नाराजीचा विषय नाही त्यांच्या मतदारसंघाचा विषय थोडा अडचणीचा झालेला आहे, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली.
वानवडी अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणी पुणे पोलिसांनी आज आरोपीला कोर्टात हजर केलं. यावेळी आरोपी कोर्टासमोर ढसाढसा रडला.आरोपीचं तपासणी करायची असेल तर एक किंवा दोन दिवसांची पोलीस कोठडी पुरेशी होते. तसंच आरोपीला डायबिटीस आहे, कमी कोठडी द्यावी, अशी विनंती आरोपीच्या वकिलांनी कोर्टाकडे केली.
सोलापुरात सुरु असणारे कोळी समाजाचे उपोषण घेण्यात आले मागे घेण्यात आलं आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेण्याचं आश्वास दिलं. त्यामुळे मागच्या 10 दिवसांपासून सुरु असणारे आमरण उपोषण मागे घेण्यात आलं आहे.
आज नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पुढील 9 दिवस अंबाबाई देवीची वेगवेगळ्या रूपांमध्ये सालंकृत पूजा बांधण्यात येत असते. आज नवरात्रोत्सवाची पहिली माळ. पहिल्या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची महालक्ष्मी रूपात बैठी अलंकार पूजा बांधण्यात आली. देवीचं हे रूप पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे.
अंकिता पाटील ठाकरे भाजपचा राजीनामा देणार अशी चर्चा सुरू आहे. अशात अंकिता ठाकरे उद्या राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं समोर आलंय. अंकिता पाटील यांनी आज वडील हर्षवर्धन पाटील यांच्यासह शरद पवार यांची भेट घेतली. सध्या अंकिता पाटील ठाकरे या पुणे जिल्हा भाजपच्या युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष आहेत. राष्ट्रवादीची तुतारी हाती घेण्याचा निर्णय झाल्यावर अंकिता लवकरच या पदाचा राजीनामा देणार अशी चिन्ह आहेत.
मंत्री मंगल प्रभात लोढा यांचं मोठं विधान
संत गाडगे महाराजांनी गावा गावात जाऊन कचरा साफ केला
मुंबई आणि महाराष्ट्रामधील कचरा करणार साफ
रोहिंग्या आणि बांग्लादेशींचा महाराष्ट्र आणि मुंबईमधील कचरा साफ करणार
मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा निर्धार
पुणे अत्याचार प्रकरणातील स्कुल व्हॅन संतप्त नागरिकांनी फोडली आहे. धावत्या स्कुल व्हॅनमध्ये ६ वर्षीय चिमुकलीसह तिच्या मैत्रिणीवर धावत्या व्हॅनमध्ये लोैंगिक अत्याचार करण्यात आला होता.
बारामती शहरामध्ये घडलेल्या काही दुर्दैवी घटनांच्या पार्श्वभूमीवर शहर व तालुक्यात 'महिलांचा सन्मान, बालकांची सुरक्षा व युवकांचे प्रबोधन' या संकल्पनेवर 'शक्ती अभियान' राबविण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. बारामतीमध्ये हे अभियान यशस्वी ठरल्यास पुणे जिल्हा तसेच राज्यात राबविण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
वडगावशेरीतील शरद पवारांच्या सभेनंतर महायुतीत मोठा बॉम्ब?
शरद पवारांनी सुनील टिंगरे यांना फैलावर घेतल्यानंतर महायुतीतील नेत्यांची गुप्त बैठक
सुनील टिंगरे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस अजित पवारांची बैठक?
वडगावशेरीची जागा बदलण्यावरून चर्चा
पुन्हा एकदा मतदारसंघात नव्याने सर्व्हे सुरु
जगदीश मुळीक यांच्या तयारीत अचानक वाढ झाल्याने वडगाव शेरीत नाट्यमय घडामोडी
बदलापूरची घटना ताजी असतानाच पुणे शहरामध्ये सुद्धा दोन चिमुकलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे एक तर पुणे शहराची ओळख हे विद्येचे माहेरघर आहे आणि पुण्यातच अशी घटना घडली आहे यावरून असे दिसून येते आहे की या नराधमांना कायद्याचा धाक राहलेला नाही म्हणूनच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गट राज्याचे माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी करत आहे की तात्काळ हे केस फास्टट्रॅक कोर्टात चालवा आणि या आरोपीला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे.
पितृपक्ष संपताच शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाने कंबर कसली असून घटस्थापनेपासून प्रचाराला सुरुवात केली जाणार आहे. ठाकरे गटाच थीम साँगही तयार असून आज ते लाँच होणार आहे. दुपारी १ वाजता उद्धव ठाकरे शिवसेवा भवन येथे पत्रकार परिषद देखील घेणार आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते सपत्नीक घटस्थापना करण्यात आली. या घटस्थापनेने शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाली आहे. मंदिरातील गाभाऱ्यामध्ये जवस,ज्वारी गहू,हरभरा व कडधान्य टाकून घटस्थापना करण्यात आली. या विधीला जिल्हाधिकारी यांच्यासह मंदिर संस्थानचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील,तुळजाभवानी मंदिराचे महंत पुजारी आणि भाविकांच्या उपस्थितीत ही घटस्थापना करण्यात आली.
राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' ही योजना सुरू केली असून, नंदुरबार जिल्ह्यातून चार लाख पाच हजार पेक्षा अधिक महिला यात पात्र ठरल्या आहेत मात्र अजूनही अनेक महिलांचे अर्ज करणे सुरू आहे परंतु पोर्टल बंद असल्याने महिलांना मोठा सहन करावा लागत आहे.
आमच्या इथे (मविआ) सगळे सिस्टमॅटिक सुरू आहे, प्रत्येक जागेवर चर्चा सुरू आहे. निवडून यायचे या मेरिटवर जागा द्यायचा असा निर्णय झाला आहे. थोडा दिवस लागेल, एक दोन दिवस वेळ लागेल जागावाटप योग्य पद्धतीने केले जाईल. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी,परवा एकत्र येत आहोत, लवकरच जागावाटप जाहीर करू.नाना पटोले
राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत नंदुरबार नगरपालिकेने नाशिक विभागात अव्वल क्रमांक प्राप्त केला आहे. अभियानांतर्गत नंदुरबार पालिकेला दीड कोटी रुपयांचे बक्षीस शासनाने जाहीर झाले आहे.
घरातून शाळेत निघाल्याचे सांगून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याचा प्रकार सोमवार पेठेतील एका शाळेच्या परिसरात घडला. या प्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात सायबर चोरट्यांकडून दोन नागरिकांना 57 लाख रुपयांना गंडा
शिवाजीनगर आणि वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल
सायबर चोरट्यांकडून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार सुरूच असून दोन वेगवेगळ्या घटनात दोघांची 57 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
एका घटनेत पोलीस कारवाईची भीती आणि तर दुसऱ्या घटनेत ऑनलाईन टास्कच्या कमिशन देतो म्हणून फसवणूक करण्यात आली आहे.
अधिक तपास सायबर पोलिस करत आहेत.
नाशिक भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष योगेश बर्डे यांनी शिवसेना ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला आहे. खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राज्याच्या प्रमुख पदी पाहण्याची संधी मिळावी. ही प्रार्थना आई एकविरा देवीकडे करतो. शेतकरी सुखी व्हावा आणि सामाजिक सलोखा राहावा अशी प्रार्थना सुनील शेळके यांनी केली आहे. आज लोणावळयातील कार्ला एकविरा देवीचा अभिषेक आणि घटस्थापना करण्याचा मान मावळचे आमदार सुनील शेळके यांना मिळाला. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राज्याच्या प्रमुख पदी बसावे अस साकडं घातल्याचे त्यांनी सांगितले.
साडे तीन शक्ती पीठ पैकी एक पूर्ण पीठ असलेल्या आई तुळजाभवानी मंदिरात आज पासून नवरात्र उत्सवला सुरुवात होतेय. दुपारी 12 वाजता तुळजाभवानी मंदिरात घटस्थापना होईल.जिल्हाधिकारी सचिन ओम्बसे यांच्याहस्ते घटस्थापना होणार आहे. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. मंदिराच्या मुख्य राजे शहाजी महाद्वार समोर देवी विदेशी फुलांचा वापर करून आई तुळजाभवानी आणि मारुतीरायाची गरुड रथाची प्रतिमा साकारण्यात आली आहे
घरातून शाळेत निघाल्याचे सांगून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याचा प्रकार सोमवार पेठेतील एका शाळेच्या परिसरात घडला. या प्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार पेठेतील एका शाळेत या दोन मुली शिकतात. त्या दोघींचे वय १४ वर्षे असून, त्या मंगळवारी (ता. १) सकाळी शाळेत जातो, असे सांगून घरातून बाहेर पडल्या. परंतु त्या शाळेत पोचल्या नाहीत. त्या दोघींना शाळेच्या परिसरात प्राचार्यांनी पाहिले. त्यावेळी त्यांनी मुलींना शाळेत जाण्यास सांगितले. परंतु त्या शाळेत गेल्या नाहीत. त्यांचा दिवसभर शोध घेतला. परंतु त्या आढळून न आल्याने पालकांनी समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या दोन्ही मुलींना कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याचे पालकांनी फिर्यादीत म्हटले आहे.
बीडच्या नारायणगड येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आता गडाच्या परिसरातील मैदानात स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी शेकडो स्वयंसेवक या ठिकाणी योगदान देताहेत. दसरा आता काही दिवसांवरच आला असल्याने या तयारीला वेग आलाय. दरम्यान या दसरा मेळाव्यात जरांगे पाटील काय बोलतात ? आगामी राजकारणाविषयी काय संदेश देतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने बीड जिल्हा रुग्णालयात मुलींना जन्म देणाऱ्या मातांचा 9 दिवस सन्मान केला जाणार आहे. प्रत्येक मातेला साडी-चोळी देऊन स्वागत केले जाणार आहे. डॉ. अशोक थोरात यांनी जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा कारभार हाती घेताच पहिला उपक्रम हाती घेतलाय.
Pune News : पुण्यातील चतुःशृंगी मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. चतुःशृंगी देवीचे मंदिर २४ तास खुले राहणार आहे. मंदिरात पुजाऱ्यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. यावेळी अनगळ कुटुंबीय उपस्थित होते. मंदिराचे व्यवस्थापक देवेंद्र अनगळ यांच्या हस्ते सकाळी घटस्थापना आणि नवचंडी होम झाला.
अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांचे शहरातील प्रत्येक चौकात आणि प्रत्येक रस्त्यावर "विश्वास जुना संग्रामभैय्या पुन्हा" असा आशयाचे बॅनर झळकत आहेत...संग्रामभैय्या जगताप सोशल फाउंडेशनच्या वतीने शहरात येणाऱ्या प्रत्येक चौकातील मोठे होर्डिंग आतापासूनच बुक करण्यात आलेत.
Maharashtra politics News : विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं उत्तर महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.उत्तर महाराष्ट्रातील मनसे पदाधिकाऱ्यांना स्वतः राज ठाकरे राज मंत्र देणार आहेत. येत्या ५ आणि ६ ऑक्टोबरला राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर येणार आहेत. उत्तर महाराष्ट्रातील ४७ विधानसभा मतदारसंघांची चाचपणी करणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.