Dharashiv saam tv
महाराष्ट्र

Maratha Aarakshan Andolan : तब्बल तीन तासांपासून कळंब- ढोकी महामार्गाची वाहतूक खाेळंबली, मराठा आंदाेलकांनी रस्त्यावर पेटवले टायर

एकही वाहन पुढे जाऊ देणार नसल्याची भूमिका आंदाेलकांनी घेतली आहे.

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे

Dharashiv News : मराठा आरक्षणासाठी राज्यातील मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. धाराशिव जिल्ह्यात देखील मराठा समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. आज (शनिवार) आंदाेलकांनी कळंब - ढोकी महामार्गावर (kalamb dhoki highway) रास्ता रोको केला. यावेळी आंदाेलकांनी रस्त्याच्या मधाेमध टायर पेटवून ठेवले. यामुळे महामार्गावर माेठ्या प्रमाणात वाहतुकीची काेंडी निर्माण झाली आहे. (Maharashtra News)

गेल्या तीन तासांपासून या महामार्गावर मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. यावेळी आंदाेलकांनी राज्यातील ज्येष्ठ नेत्यांपासून सरकारमधील नेत्यांच्या विराेधात घाेषणाबाजी केली. एकही वाहन पुढे जाऊ देणार नसल्याची भूमिका आंदाेलकांनी घेतली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

साम टीव्हीशी बाेलताना आंदाेलकांनी सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकर मार्गी लावावा अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा सरकारला दिला आहे. सत्तास्थापनेसाठी तुम्ही पहाटेचा शपथविधी कराल, तुम्हांला पाहिजेल तसे वागाल आणि मराठ्यांच्या मागण्या म्हटले की दुर्लक्ष कराल हे चालणार नाही असा इशारा आंदाेलकांनी सरकारला दिला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजापुरात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT