Maratha Reservation
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्याची मागणी मराठा समाजाने लावून धरली आहे. यासाठी मनोज जरांगे पाटील राज्यभर सभा असून सरकारला ४० दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. मात्र एकीकडे आरक्षणासाठी आंदोलने, सभा सुरू असताना मराठा समाजातील तरुणांच्या आत्महत्या सुरूच आहेत. रविवारी नांदेडमध्ये आणखी एका तरुणाने आत्महत्या केली असून सकल मराठा समाजाने मागण्या मान्य होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे.
मयताच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून 50 लाखाची मदत , मयत युवकाच्या बहिणीला शासकीय नोकरी , कुटुंबाला घरकुल, या मागण्या मान्य होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका सकल मराठा समाजाकडून घेण्यात आली आहे. त्यामुळे सरकार काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले असून मराठा आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
नांदेडच्या हदगाव तालुक्यातील वडगाव येथील ही घटना आहे. येथील 24 वर्षीय शुभम पवार या तरुणाने विषप्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने चिट्टी लिहली असून या चिट्टीत, मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे. एक मराठा लाख मराठा , मराठा आरक्षणासाठी मी माझ्या जीवाचे बलिदान देत आहे. माझे बलिदान वाया जाऊ नये असा आशय त्या चिट्टीत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.