Maratha reservation issue and demand for transparency in Kunbi registrations 
महाराष्ट्र

Maratha Reservation: ५८ लाख नोंदी महाराष्ट्राच्या की मराठवाड्याच्या? मराठा संघटनांचा सरकारला थेट सवाल!

Maratha Reservation Row: ५८ लाख कुणबी नोंदी महाराष्ट्राच्या की मराठवाड्याच्या? या नोंदींचा कालावधी आणि भौगोलिक व्याप्ती जाहीर करण्याची मराठा संघटनांची मागणी आहे. या नोंदी अलीकडच्या आहेत की १९६७ सालच्या, याबाबत सरकारने स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी केली जातेय.

Bharat Jadhav

  • ५८ लाख कुणबी नोंदींच्या आकड्यावरून मराठा संघटनांनी सरकारला सवाल केला.

  • या नोंदी महाराष्ट्रातील आहेत की मराठवाड्यातील, याबाबत स्पष्टीकरण मागितले.

  • नोंदी अलीकडच्या आहेत की १९६७ सालच्या, हे जाहीर करण्याची मागणी.

राज्य सरकार आणि मराठा समाज असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी नोंदीवरून मराठा समाज संघटनेनं सरकारला जाब विचारलाय. मराठा समाज मंथन बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी सरकारला ५८ लाख कुणबी नोंदींबाबत थेट सवाल केला.

या नोंदी नेमक्या महाराष्ट्रातील आहेत की केवळ मराठवाड्यातील? तसेच या नोंदी अलीकडच्या आहेत की १९६७ सालच्या? याबाबत सरकारने स्पष्ट माहिती जाहीर करावी, अशी मागणी रमेश केरे पाटील यांनी केली. नोंदी बाबत जाब विचारण्यासाठी मराठा समाजाकडून राज्यभरात जनजागृती यात्रा काढली जाणार आहे.

विखे-पाटील यांनी फसवणूक केली

रमेश केरे पाटील यांनी मंत्री विखे पाटील यांच्यावर मराठा समाजाची दिशाभूल केल्याचा आरोप केला. मराठा समाजाची लवकरात लवकर बैठक बोलावून या प्रश्नांवर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. ५८ लाख नोंदींच्या आकड्याबाबत संभ्रम असल्याचे सांगत या नोंदींचा नेमका कालावधी आणि भौगोलिक व्याप्ती स्पष्ट करण्याची मागणी केरे पाटील यांनी केली. ज्या ५८ लाख नोंदी आहेत त्या मराठवाड्याच्या आहेत की महाराष्ट्राच्या आहेत त्या जाहीर कराव्यात. अशी मागणी रमेश केरे पाटील यांनी केलीय.

मराठा समाजाला खोटं आरक्षण मिळालं

दरम्यान नानासाहेब जावळे पाटील यांनीही सरकारवर जोरदार टीका केली. मराठा समाजाला वेळोवेळी आश्वासने देऊन फसवले जात असल्याचा आणि समाजाचा केवळ मतांसाठी वापर होत असल्याचा आरोप त्यांनी केला. वेगवेगळे आयोग स्थापन करून समाजाची दिशाभूल केली जात असल्याचेही ते म्हणाले. डिसेंबरपासून आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन आम्ही महाराष्ट्रात जनजागृती यात्रा काढणार आहोत. या यात्रेद्वारे हे सरकार समाजाला कस फसवत हे आम्ही समाजासमोर मांडणार आहोत. पहिला टप्पा हा मराठवाड्यात सुरु करणार आहोत.-

तोडा फोडा आणि राज्य करा हे सरकारचं धोरण

मराठा चळवळीत काम करणाऱ्या लोकांना बदनाम करण्याचं काम सरकारकडून केलं जात आहे. सरकार तोडा फोडा आणि राज्य करा आणि इतर समाजा संदर्भात भांडण लावून मराठा समाजात भांडण लावणे हे सरकारचे नाटके चालू आहेत हे माकड चाळे बंद करावेत. जरांगे पाटलांची भूमिका असेल किंवा आमची भूमिका असेल सगळेजण समाजासाठी काम करत असल्याचं जावळे पाटील म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs NZ : श्रेयस, इशान किशन-अक्षर पटेल नाही... हे दोघे टीम इंडियाच्या विजयाचे खरे हिरो, गावसकरांनी थेट नावं सांगितली

Maharashtra News Live Update: राजस्थानमधून आलेल्या २० हजार मेंढ्या अन् १०० उंटांना महाराष्ट्राच्या सीमेवर रोखले

Sonali Kulkarni Latest Photos: गुलाबी साडीमध्ये 'अप्सरा' अवतरली, सोनालीचे फोटो पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल

Crime: बदलापूर हादरले! मध्यरात्री रस्त्यात अडवून तरुणाची हत्या, कोयत्याने सपासप वार करत संपवलं

जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला करणारा मुख्य आरोपीला अटक; TMC नेत्याची पोलिसांनी काढली धिंड

SCROLL FOR NEXT