Sharad Pawar on Maratha Reservation Protest Saam Tv
महाराष्ट्र

Maratha Aarakshan: जालन्यातील घटनेवर शरद पवारांना वेगळाच संशय, सांगितलं मुंबई कनेक्शन..

Sharad Pawar on Maratha Reservation Protest: जालन्यातील घटनेवर शरद पवारांना वेगळाच संशय, सांगितलं मुंबई कनेक्शन...

अभिजीत सोनावणे

Sharad Pawar on Maratha Reservation Protest:

''चर्चा सुरू असताना एकदम मोठा पोलीस फोर्स बोलावला गेला. मुंबईवरून सूचना आल्या आणि पोलिसांचा दृष्टिकोन बदलला'', असं म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वेगळाच संशय व्यक्त केला आहे.

पवार म्हणाले की, ''पोलिसांनी एकदम लाठी हल्ला सुरू केला. हवेत गोळीबार केला, छोटे छारे गोळीबार केला. काही जखमी लोकांच्या अंगावरील चारे ऑपरेशन करून काढले. निषापाप नागरिकांना कशी वागणूक दिली, याचा हा अनुभव आहे.''

या घटनेवर बोलताना शरद पवार म्हणाले की, झालेला प्रकार अतिशय गंभीर आहे. संकटात असलेल्या लोकांना धीर दिला नाही, तर हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्रात पसरण्याची भिती होती. त्यामुळे आम्ही रात्री इकडे यायचं ठरवलं. ते म्हणाले, बाळाचा वापर करताना महिला, लहान मुले बघितली गेली नाही. हवा तसा बळाचा वापर केला गेला.  (Latest Marathi News)

'लोक बसलेले असताना त्यांच्यावर पोलिसांनी लाठी हल्ला केला'

शरद पवार म्हणाले की, ''मोबाईल चित्रीकरणात स्पष्ट दिसतंय की, लोक बसलेले असताना पोलीस दलाचे प्रतिनिधी येतात आणि काही वेळाने लाठी हल्ला करतात. पोलिसांवर हल्ला झाला असं दिसत नाही. पोलिसांनी हल्ला केला असं दिसतंय. मी पोलिसांना दोष देत नाही, ते त्यांचं काम करतायत. मात्र याची न्यायालयीन चौकशी व्हावी.

शरद पवार पुढे म्हणाले की, ''जखमी लोक आणि आंदोलकांना भेटलो. ते सांगत होते मुंबईहून फोन आला आणि पोलिसांचा दृष्टिकोन बदलला. मात्र कोणाचा फोन आला, याची माझ्याकडे माहिती नाही. पण तिथे काही लोक गृहमंत्र्यांच्या नावाने घोषणा देत होते.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NAM vs SA: OMG! इंटरनेशनॅल क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर; शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात नामिबियाने दक्षिण आफ्रिकेला हरवलं

Maharashtra Live News Update : अजित पवार यांच्याकडून PDDC बँकेची पाहणी

Dharashiv : शेती वाहुन गेली, पिक मातीमोल झाल; जिवापाड जपलेली जनावर विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ

भाजपकडून शिंदे अन् अजित पवार गटाला धक्का, मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत बड्या नेत्यांची एन्ट्री

Punha Shivaji Raje Bhosale: महाराष्ट्रातले शेतकरी रोज आत्महत्या...; 'पुन्हा शिवाजीराजे भोसले'मध्ये उलगडणार बळीराजाची व्यथा

SCROLL FOR NEXT