Jarange Warn Drunkards Saam Digital
महाराष्ट्र

Jarange Warn Drunkards: 'तुम्ही मला पिणाऱ्यांच्या याद्या आणून द्या, आरक्षण मिळालं की त्यांची खैर नाही...', जरांगेंनी वळवला दारूवाल्यांकडे मोर्चा

Jarange Warn Drunkards News: आरक्षणाचा विषय संपला की दारूवाल्यांच्याच मागे लागतो असं म्हणत, तुम्ही मला पिणाऱ्यांच्या याद्या आणून द्या. मी त्यांचा कार्यक्रमच करतो, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Sandeep Gawade

Jarange Warn Drunkards

आरक्षणाचा विषय संपला की दारूवाल्यांच्याच मागे लागतो असं म्हणत, तुम्ही मला पिणाऱ्यांच्या याद्या आणून द्या. मी त्यांचा कार्यक्रमच करतो, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. गोदाकाठच्या 123 गावांच्या गाठी भेटी दौऱ्यानिमित्त ते आज घनसावंगी तालुक्यातील भोगगाव येथे आले होते, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. मराठा आरक्षणासाठी मागच्या काही महिन्यांपासून आंदोलन छेडलं आहे. आता दारुवाल्यांनाच दम भरला आहे.

यावेळी बोलतांना जरांगे म्हणालेत की, रात्रीचे ९ वाजले की मी माझा हात कोणाच्या हातात देत नाही,मला भीतीच वाटते आता. मी त्यांच्या हातात हात दिला तर ते माझा हात सोडतच नाही.मी इकडे ओढतो, तर ते तिकडे ओढतात. आरक्षणाचा विषय संपल्यावर मनोज जरांगे पाटील माद्यपिंना सरळ करण्याची मोहीम हाती घेणार असून तुम्ही मला याद्या आणून द्या, मी त्यांचा कार्यक्रमच करतो असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्यायच्या वेळेला त्यांच्या जवळ जाऊन मांडीच घालून बसतो. तो बाटली कसा उघडतो तेच बघतो मी असं जरांगे म्हटलेत. आता मला दारू पिणाऱ्या टोळीच्याच मागे लगावे लागेल,असे म्हणत जरांगे पाटलांनी आता दुसरी मोहीम हाती घेतली आहे.जरांगेनच्या या निर्धाराने तळीरामांत मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

SCROLL FOR NEXT