Sadabhau Khot on Sharad Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Maratha Reservation: शरद पवारांना मराठा आरक्षणाबाबत एवढं वाटत असेल तर त्यांनी उपोषणाला बसावं: सदाभाऊ खोत

Sadabhau Khot on Sharad Pawar: शरद पवारांना मराठा आरक्षणाबाबत एवढं वाटत असेल तर त्यांनी उपोषणाला बसावं: सदाभाऊ खोत

ओंकार कदम

Sadabhau Khot on Sharad Pawar:

''शरद पवारांना मराठा आरक्षणाबाबत एवढं वाटत असेल तर उद्यापासून आझाद मैदानावर उपोषण सुरु करा, असं रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.

ते म्हणाले की, ''जरांगे पाटलांची तब्बेत खराब आहे. त्यांना थोडी विश्रांती द्या.'' मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्रात राण पेटलेलं असताना सदाभाऊंनी थेट पवारांनाच आव्हान दिलं आहे.

पवारांनी मराठ्यांच्या आरक्षणासाठी आझाद मैदानावर उपोषणाला बसावं. आरक्षण प्रश्नावर आत्ता पवार खोटे अश्रू ढाळत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे . मराठा समाजाच्या प्रस्तापित नेत्यांनीच मराठा समाजाची माती केलीये, असंही सदाभाऊ खोत म्हणाले आहेत. (Latest Marathi News)

ते म्हणाले की, २००४ साली बापट आयोग कोणी स्थापण केली. बापट आयोगानं आरक्षण देता येणार नाही, असं सांगितलं. तरी हा आयोग का स्वीकारला आघाडी सरकारच्या काळात पवारांनी मराठ्यांच आरक्षण घालवलं, असा गंभीर आरोप सुद्धा सदाभाऊ खोत यांनी केलाय.

देवेंद्र फडणवी यांची जात ही ब्राह्मण आहे. म्हणून त्यांच्यावर खापर फोडण्याचा प्रयत्न विरोधक करतायेत, असा आरोपही खोत यांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तीसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक

Modi Cabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? १२ खाती अन् इच्छुकांची यादी मोठी

Fact Check: काळ्या बुरशीचा कांदा खाल, जीवानं जाल? बुरशीयुक्त कांद्यामुळे किडनी, लिव्हरला धोका?

देवेंद्र फडणवीसांना केंद्रात नवी जबाबदारी? दिल्लीत भाजपच्या गोटात हालचाली

क्रिती सेनन कपड्यांवरून ट्रोल; राहुल गांधींची सडेतोड प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT