Manoj Jarange Patil Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: २५ ऑक्टोंबरपासून आमरण उपोषण; गावागावात कँडल मार्च... जरांगे पाटलांची मोठी घोषणा

Maratha Reservation: 2४ तारखेला न्याय न मिळाल्यास २५ ऑक्टोंबरपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

डॉ. माधव सावरगावे

Maratha Reservation News:

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली २४ ऑक्टोबरची डेडलाईन संपायला अवघे दोन दिवस उरले आहेत.  त्याआधीच मनोज जरांगे पाटील आपल्या लढ्याची नवी दिशा निश्चित केली असून २४ तारखेला न्याय न मिळाल्यास २५ ऑक्टोंबरपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

काय म्हणाले जरांगे पाटील?

"सरकारने ३० दिवस मागितले होते, आम्ही ४० दिवस दिले. आता २४ ऑक्टोंबरला न्याय न मिळाल्यास २५ ऑक्टोंबरपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार आहे. असे मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले. तसेच २५ ऑक्टोंबरपासून गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करणार असून प्रत्येक नाक्यावर साखळी उपोषण करु..." असे जरांगे पाटील म्हणाले.

"२५ तारखेपासून राज्यातील प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात मराठा समाज एकत्र येऊन कँडल मार्च काढणार असून सर्व गावांमध्ये साखळी उपोषण, आंदोलने करु असेही जरांगे पाटील यावेळी म्हणाले. दोन टप्पे पाडल्याशिवाय न्याय मिळणार नाही. सुरुवातीला हे सरकारला सोपं वाटत असेल पण ते झेपणार नाही," असा इशारा जरांगे पाटलांनी यावेळी दिला.

"मराठा समाज आजही शांत आहे. मराठा समाजाच्या भावनेशी खेळू नका. सरकारला हात जोडून विनंती आहे, आता सहन करण्याची क्षमता राहिली नाही. त्यामुळे पुढील दोन दिवसात निर्णय घ्यावा. सरकारनेही वेळकाढूपणा करु नये, मराठ्यांनाही सगळं कळतंय. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT