Manoj Jarange Patil Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil Health Update: मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली; सलाईन सुरू

Manoj Jarange Patil Health Update: : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली असून अंतरावली सराटीमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Bharat Jadhav

मनोज जरांगे पाटील यांची तब्येत पुन्हा खालावली असून अंतरवाली सराटीत उपचार करण्यात येत आहेत. त्यांना आज चार वाजेच्या दरम्यान अस्वस्थ वाटू लागल्याने उपचार सुरू करण्यात आले आहे. मनोज जरांगे यांना अशक्तपणा आणि घबराट होत असल्याने त्यांना सलाईन लावण्यात आलीय.

हाती आलेल्या माहितीनुसार, आज चार वाजेच्या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी अस्वस्थ वाटू लागले. जरांगे यांना अशक्तपणा आणि घबराट होत असल्याने त्यांना सलाईन लावण्यात आलीय. जरांगेंना रक्त दाबाचा त्रास होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय.

जालन्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली आहे. मंगळवारी रात्री त्यांच्या पोटात प्रचंड वेदना जाणवत होत्या. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना उपचार घेण्याचा सल्ला दिलाय. मात्र, जरांगे यांनी उपचारास नकार दिला असून ते आमरण उपोषणावर ठाम आहेत. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, या मागणीसाठी परत आंदोलन करत होते.

भाजप नेते आणि मनोज जरांगे यांच्यात वाद

मनोज जरांगे पाटील आणि भाजप नेते प्रसाद लाड यांच्यात काही दिवसांपासून खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. जरांगे पाटील यांना देवेंद्र द्वेष झाल्याची टीका लाड यांनी केल्यानंतर जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत प्रसाद लाड यांना सडेतोड उत्तर दिलं होतं. त्यावेळी त्यांनी प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली होती. त्यानंतर मवाळ भूमिका घेत लाड यांनी जरांगे पाटील यांना राजकारणात येण्याची आणि आमदारकीची ऑफर दिली होती. त्यावरूनही जरांगे यांनी लाड हे मॅनेज करणारे आमदार असल्याची टीका केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: प्रेम, विश्वासघात आणि हत्या! पत्नी-प्रियकराने मिळून रचला नवऱ्याच्या खुनाचा कट; हाताच्या गोंदणावरून पोलिसांनी लावला छडा

Maharashtra News Live Update: चुलीवर भाकरी भाजत वंचित बहुजन विकास आघाडीचे आंदोलन

गणिताच्या शिक्षकाने मागितली 1 कोटी 40 लाखांची खंडणी; 300 CCTV तपासले, नेमके प्रकरण काय?

Best Lipstick shades: नवीन लिपस्टिक खरेदी करणार आहात? या ७ लिपस्टिक शेड्स प्रत्येक स्किन टोन परफेक्ट दिसतात

Sathankulam Custodial Death Case Verdict: ९ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा, हायकोर्टाचा फैसला; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT