Manoj Jarange Patil Saam Tv
महाराष्ट्र

Manoj jarange Patil: सरकारला सळो-पळो करणाऱ्या जरांगे-पाटलांनी कोणत्या मुद्द्यावरून उपोषण घेतलं मागे; वाचा सविस्तर

Manoj Jarange Patil: जरांगे-पाटील यांनी सरकारला २ जानेवारीपर्यंतचा वेळ द्यावा अशी विनंती केली होती

Bharat Jadhav

Manoj jarange Patil:

सरकारच्या शिष्टमंडळाने अंतरवली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली. शिष्टमंडळाची ही यशस्वी झाली असून जरांगे-पाटील यांनी आपलं उपोषण घेतलं. जरांगे-पाटील यांनी सरकारला २ जानेवारीपर्यंतचा वेळ द्यावा, अशी विनंती केली होती, सरकारची ही विनंती जरांगे-पाटील यांनी मान्य केली. आता दिलेला वेळ हा शेवटचा आहे. त्यामुळे वेळ घ्या पण आता आरक्षण द्या, असं त्यांनी म्हटलं. तसेच आता पुढच्या लढाईसाठी तयार राहण्याचं आवाहन देखील मनोज जरांगे-पाटील यांनी यावेळी केलं.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आज दुपारी सरकारने स्थापित केलेल्या समितीच्या न्यायमूर्तींच्या शिष्टमंडळाने अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली. यावेळी कुणबी प्रमाणपत्रासाठी मराठवाड्यापुरतं नव्हे तर राज्यात काम करा, असं मनोज जरांगे पाटलांनी या शिष्टमंडळाला सांगितलं. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र का देऊ शकत नाही? असा सवालही केला. (Latest News)

कोणत्या मुद्द्यांवरून सोडलं उपोषण

  • राज्यातील सर्व मराठ्यांना सरकट कुणबी प्रमाणपत्र दिल्यास सरकारला २ जानेवारीपर्यंत वेळ देण्यास तयार .

  • मराठा आरक्षणाप्रश्नी अधिवेशन लागू केलं जाणार आहे.

  • मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या करायची नाही. दिवाळी गोड झाली पाहिजे.

  • रक्ताचे नाते असल्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या.

  • संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा आरक्षण द्या

  • साखळी उपोषण सुरू असेल

  • आमरण उपोषण स्थगित केलं जाणार

  • २ जानेवारीपर्यंत आरक्षणासाठी आपण मंडपात बसून राहील. घराचा उंबरठ्याला शिवणार नाही.

  • मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी एक पेक्षा अधिक संस्था नेमण्याची जरांगेंची मागणी.

  • सरकारच्या शिष्टमंडळाने दोन महिन्यात संपूर्ण राज्यात अभ्यास करावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सुप्रिया सुळे यांनी आंदोलन करणाऱ्या मुलींशी फोनवरून साधला संवाद

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत शिंदेंची मोठी घोषणा, मुख्यमंत्र्यांसमोरच स्पष्ट केली भूमिका

इंजिनिअरसह अख्ख्या कुटुंबाची गोदावरी नदीत उडी; 5 जणांच्या हत्येप्रकरणी कोचला अटक

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT