Maratha reservation  saam tv
महाराष्ट्र

Jarange Patil: 'एकतर मी जाईन, नाहीतर सरकार...'; मराठा आरक्षणासाठी जरागेंचा निर्णायक एल्गार, 29 ऑगस्टला जरांगेंचं अखेरचं आंदोलन

Jarange Patil: आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला थेट इशारा दिलाय. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी जरांगेंनी आरपारच्या लढाईचे संकेत दिलेत. संवाद बैठकीत जरागेंनी कोणती मोठी घोषणा केलीये? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून

Rohit Kadam

Jarange Patil: मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची संवाद बैठक घेतली. 29 ऑगस्टला मराठा आंदोलनाला तीन वर्ष पूर्ण होत असल्यानं जरांगे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आक्रमक झालेत. 29 ऑगस्टला राज्यभरात शेवटचं निर्णायक आंदोलन करण्याची घोषणा मनोज जरांगेंनी केलीये. इतकंच नव्हे तर एकतर मी तरी जाईन, नाही तर सरकार तरी जाईल, असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी सरकारला दिलाय...

मराठा समाजाच्या मागण्यांवरून मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यांवर कडाडून टीका केलीये. मात्र, मराठा समाजातील ज्यांनी जात प्रमाणपत्र मागितलं, त्यांना ते देण्यात आल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय. तर मनोज जरांगे यांनी मराठा समाजासाठी केलेल्या प्रमुख मागण्या नेमक्या काय आहेत, तेही पाहुयात...

जरांगेंच्या प्रमुख मागण्या

राज्यात सापडलेल्या 58 लाख नोंदींचे प्रमाणपत्र द्या हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठवाड्यातील सगळे प्रमाणपत्र घ्या . सातारा, कोल्हापूर, पुणे, औंध, मुंबई या पाचही संस्थानच्या गॅझेटियरची अमंलबजावणी GRसहीत हवी. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे. ओबीसींच्या सोई-सुविधा मराठा समाजाला लागू करा. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळातील व्याज परतावा द्यावा. सारथीच्या योजना पुन्हा सुरू करा. मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करा . SEBCचे, ESBC आणि SWSमधून निवड झालेल्यांना नियुक्त्या द्या. मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबीयांना नोकरी आणि आर्थिक मदत द्या

58 लाख कुणबी प्रमाणपत्र हा जरांगेंच्या मागण्यांमधली कळीचा मुद्दा आहे. तर प्रत्येक अर्जदाराला प्रमाणपत्र दिलं जात असल्याचं मुख्यमंत्र्यांचं म्हणणंय. या दाव्या प्रतिदाव्यांमुळे तिढा वाढणार असून जरांगे आणि सरकारमधला संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वीच सरकार काही तोडगा काढणार की नेहमीप्रमाणे जरांगेंवर आंदोलनाची वेळ येणार याबाबत उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलचा क्रिकेट टीमला अलविदा, पोस्ट पाहून चाहते संभ्रमात

Maharashtra Politics: राज्य दुष्काळाच्या उंबरठ्यावर असताना सरकार अधिकाऱ्यांवर मेहरबान; आलिशान वाहनांमुळे राजकारण तापलं

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! १ तोळा इतक्या रुपयांनी स्वस्त; वाचा 24k -22k अन् 18k चे आजचे ताजे दर

Maharashtra News Live Update : पवना बंद जलवाहिनीविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश

ST Bus Rule Change :एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! 1 ऑक्टोबरपासून हा नियम बदलणार; महिला-ज्येष्ठ नागरिकांनी नक्की जाणून घ्या

SCROLL FOR NEXT