Jalna Chaos Saam Tv
महाराष्ट्र

Jalna News: गावकरी अन् पोलीस आमने-सामने; दानवेंची कार अडवल्यानंतर मध्यरात्री जालन्यात तुफान राडा, व्हिडिओ व्हायरल

Jalna Chaos : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार नारायण कुचे यांना माघारी पाठवणाऱ्या मराठा आंदोलकांना पोलीस ताब्यात घेत होते. त्यावेळी संतप्त गावकऱ्यांनी पोलिसांच्या कारला घेराव घातला. मध्यरात्री घडलेल्या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(लक्ष्मण साळुखे, जालना )

Jalna Chaos Maratha Protestors Stopped Police Car :

जालन्यातील मराठा समाजाचे आंदोलन केंद्रीय मंत्री दानवे आणि पोलीस यंत्रणेवर संतप्त झालेत. केंद्रीय मंत्री दानवेंची कार अडवणाऱ्यांना पोलीस ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी बुटेगावातील ग्रामस्थ संतप्त झाले असून त्यांनी पोलिसांच्या वाहनाला अडवत आंदोलकांना सोडण्याची मागणी केली. ग्रामस्थांचं उग्र रुप पाहून पोलिसांना खाली हात माघारी फिरावे लागले.(Latest News)

विकासकामांच्या उदघाट्नाला जाणाऱ्या केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार नारायण कुचे यांना मराठा समाज बांधवांनी वाटेतच अडवलं. गावकऱ्यांनी वाटेत अडवल्यानंतर उद्घाटन न करता मंत्री महोद्यांना माघारी फिरावं लागलं. मंत्र्यांची कार अडवल्यामुळे पोलीस यंत्रणा कामाला लागली आणि मध्यरात्री बुटेगावात जात कार अडवणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू लागली. जेव्हा ही गोष्ट गावातील इतर गावकऱ्यांना समजली तेव्हा गावातील लोकांनी पोलिसांच्या कारला घेरत आंदोलक तरुणांना सोडण्यास लावलं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान रात्री एकच्या सुमारास गावातील मराठा समजाकडून पोलिसांच्या या कारवाईला जोरदार घोषणाबाजी करत विरोध दर्शवला. आम्ही आमदार किंवा मंत्र्याच्या दारात गेलो नाही तर ते आमच्या दारात आले. अगोदर त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत संपूर्ण गावाने पोलिसांच्या वाहनासमोर आडवे येत तरुणाची पोलिसांच्या ताब्यातून सुटका केली. गावाकऱ्यांचा वाढता विरोध पाहता पोलिसांनी आंदोलक तरुणांना गावातच सोडून रिकाम्या हाती पोलीस स्टेशनमध्ये परतले. मध्यरात्री घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ही बाब समोर आलीय.

नेमकी काय घडली होती घटना

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार नारायण कुचे हे बदनापूर तालुक्यातील बुटेगाव येथील विकासकामांच्या उदघाट्नाला गेले होते. त्यावेळी गावकऱ्यांनी त्यांना विरोध केला. आमच्या दारात यायचं नाही म्हणून नागरिकांनी दोन्ही नेत्यांना माघारी पाठवलं. ही घटना एका दिवसापूर्वी सात वाजल्याच्या सुमारास घडली होती. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार नारायण कुचे विविध विकासकामांच्या भूमी पूजनासाठी बुटेगावात गेले होते. त्यावेळी त्यांना गावातील मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : दिवाळी चांगली जाईल, मनातील इच्छा पूर्ण होणार; 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार

Viral Video of Namaz at Shaniwarwada: 'ते' एक ट्विट आणि शनिवारवाड्यातील नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल; ऐन दिवाळीत पुण्यातील वातावरण का तापले?

Aditi Rao Hydri: अदिती राव हैदरीचा नवा डेनिम कॉर्सेट आणि बबल स्कर्ट लूक पाहिलात का?

दिवाळीत धमाका! शिंदेंचा थेट फडणवीसांना धक्का, भाजपच्या एकनिष्ठ नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

Maharashtra Politics: राज ठाकरे-उद्धव ठाकरेंचा पराभव निश्चित, निवडणुकीआधीच भाजप नेत्याची भविष्यवाणी

SCROLL FOR NEXT