Maratha Protest Mumbai Saam Digital
महाराष्ट्र

Maratha Protest Mumbai: जरांगेचा मोर्चा मुंबईच्या दिशेने, वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांना या वेळेत घातली बंदी; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Heavy Vehicle Ban In Mumbai: जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने येत असताना मुंबई पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. पुढील २४ तासासाठी ट्रँक्टर आणि शेती उपयोगी सर्व वाहनांना मुंबईत प्रवेश बंदी घालण्यात आली आहे.

Sandeep Gawade

Maratha Protest Mumbai

जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने येत असताना मुंबई पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. पुढील २४ तासासाठी ट्रँक्टर आणि शेती उपयोगी सर्व वाहनांना मुंबईत प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. तसेच मुंबई शहरात बाहेरून ये-जा करणाऱ्या प्रवासी वाहतूक, खासगी बसेस तसेच अत्यावश्यक वाहने वगळून सर्व प्रकारची अवजड वाहने पे अॅण्ड पार्क किंवा स्वत:च्या खासगी जागेत पार्क करावीत, असा आदेश जारी करण्यात आला आहे.

अवजड वाहनांना मुंबईत सकाळी ७ ते रात्री १२ पर्यंत निर्बध असणार आहेत.अवजड वाहनांना रात्री १ ते सकाळी ७ च्या आत दक्षिण मुंबईत प्रवेश करता येणार आहे. ट्रक, ट्रेलर, मल्टी एक्सल वाहन व प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या आंतरराज्य आणि आंतरजिल्हा खाजगी बसेसना मुंबई शहरात सकाळी ०८.०० ते सकाळी ११.३० वा. पर्यंत दक्षिण वाहिनीवर व सायंकाळी १७.०० ते २१.०० वा पर्यत उत्तर वाहिनीवर प्रवेश करण्यास मनाई असणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मात्र सर्व अवजड वाहनांना रात्री १२ नंतर सकाळी ७ पर्यत दक्षिण मुंबईतील या मार्गांवर प्रवेश राहिल.

(१) पी. डिमोलो रोडवरील मैलेट जंक्शन पर्यत फक्त बी.पी.टी. मार्गाद्वारे, (वडाळा वाहतूक विभाग)

(२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील दादर टी.टी. जक्शंन पर्यत, (माटुंगा वाहतूक विभाग)

(३) आर.ए.के. मार्गावरील टिळक रोड विस्तारीत चौक पर्यत (भोईवाडा वाहतूक विभाग)

(४) जी.डी. आंबेकर मार्गावरील राममंदिर चौकपर्यत.

(५) पश्चिम द्रुतगती मार्गावरून माहिम जक्शन पर्यत (माहिम वाहतूक विभाग)

(६) सेनापती बापट मार्गावरील सर्व्हिस रोडवरील माटुंगा रोड रेल्वे स्टेशन पर्यत, (दादर वाहतूक विभाग)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

Fact Check: देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक? CJP समर्थकांकडून हायड्रोजन ट्रेन टार्गेट?

SCROLL FOR NEXT