Maratha, OBC Reservation Update Saam Digital
महाराष्ट्र

Chagan Bhujbal On Jarange: यांना लाख आणि कोटीतला फरक कळत नाही, छगन भुजबळांचा मनोज जरांगेंना खोचक टोला

Maratha, OBC Reservation Update: ज्या जरांगेंना कोटी आणि लाखातला फरक कळत नाही ते ओबीसी आरक्षणाला आव्हान देण्याचं विधान करत आहेत असा खोचक टोला लगावत, जरांगेंनी मंडल आयोगाला एकदा आव्हान द्यावचं, असं खुलं आव्हान मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलं आहे.

Sandeep Gawade

Chagan Bhujbal On Jarange

मराठा समाजाला बँकडोअर एन्ट्री मिळत आहे, त्यामुळे ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असून ओबीसी समाजावर अन्याय होत आहे. सध्या सुरू असलेल्या झुंडशाहीसमोर सरकारला नमतं घ्यावं लागतं. त्यामुळे आम्हाला कोर्टात कैफियत मांडण्याशीवाय आणि जनतेत जाऊन जागृती करण्याशीवाय पर्याय नाही. मात्र ज्या जरांगेंना कोटी आणि लाखातला फरक कळत नाही ते ओबीसी आरक्षणाला आव्हान देण्याचं विधान करत आहेत असा खोचक टोला लगावत, जरांगेंनी मंडल आयोगाला एकदा आव्हान द्यावचं, असं खुलं आव्हान मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलं आहे.

मनोज जरांगे यांच्या इतका ज्ञानी जगात कोणीही नाही. त्यामुळेच ते मंडल आयोगाला आव्हान देण्याची भाषा करत आहेत. त्यांनी एकदा मंडल आयोगाला आव्हान द्यावचं. आयोगावर कारवाई करून संपवून दाखवावं. जरांगें मुंबईत ३ कोटी मराठा बाधंव आणणार होते. मात्र सगळ्या देशानं पाहिलं किती आले होते ते. यांना लाख आणि कोटीतला फरक करळ नाही ते मंडल आयोगाविरोधात विधान करत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सध्या राज्यात उन्माद झुंडशाही सुरू आहे. तीन वाजेपर्यंत डीजे लावून धिंगाणा घातला जात आहे. मला शिव्या देतायेत, फोटो फाडतायेत. अशि भयंकर परिस्थिती संध्या राज्यात सुरू असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आम्ही मराठा आरक्षणाविरोधात नाही मराठा बांधवांना सरकारने स्वतंत्र आरक्षण द्यावं. मात्र ओबीसीमध्ये समाविष्ट करून ओबीसी समाजावर अन्याय का करताय असा सवालही त्यांनी सरकारला केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thick Curd: पावसाळ्यात घरच्या घरी घट्ट दही कसं लावावं?

Maharashtra News Live Update: भूकंपाच्या धक्क्याने नांदेड हादरलं, मध्यरात्री एक वाजून 37 मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का

Pune Rain: पुण्यात पावसाचा कहर! ओढ्याला आलेल्या पूरात शेतकरी वाहून गेला, शेतामध्ये गेले असता भयंकर घडलं

Maval landslide: दरडीनंतर गाव रिकामं करण्याचा निर्णय महागात पडला, दुसरीकडे राहायला गेले अन् घरातलं सर्वकाही गेलं

Gold Rate Today : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; चांदी १०,००० रुपयांनी घसरली; वाचा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT