Maratha-OBC  Google
महाराष्ट्र

OBC-मराठा समाजाला लढवणार निवडणुका जिंकणार? ओबीसी आंदोलनावरुन जरांगे संतप्त

Maratha-OBC : राज्यात पुन्हा एकदा मराठा-ओबीसी संघर्ष पेटला आहे. जालन्यातील अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरु असतानाच ओबीसी आंदोलकही आक्रमक झाले आहेत. मराठा आंदोलकांना अडवल्यामुळे वडीगोद्रीत तणाव निर्माण झाला होता. पाहूया एक रिपोर्ट.

Girish Nikam

मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सहाव्यांदा उपोषणाचं हत्यार उपसलंय. सरकार जरांगेंच्या मागण्यांना कसा प्रतिसाद देणार याकडे सगळ्याचं लक्ष असतानाच ओबीसी आंदोलकही आक्रमक झालेत. त्यांनी जरांगेंच्या मागण्यांना विरोध करत अंतरवाली सराटीजवळ वडीगोद्रीत ठिय्या दिलाय .

ओबीसी नेते लक्ष्मण हाके तिथं उपोषणाला बसले आहेत. वडीगोद्री येथून मराठा आंदोलकांच्या गाड्या जात होत्या, त्यावेळी आमच्या गाड्या का अडवून ठेवल्या आहेत? असा सवाल ओबीसी आंदोलकांचा होता. त्यावरुन शुक्रवारी संध्याकाळपासून संघर्ष उडाला आहे. दोन्ही बाजुचे आंदोलक आमनेसामने आल्यानं शनिवारीही घोषणाबाजी झाली. अंतरवाली सराटीकडे जाणारा मार्ग अडवल्यानं तणाव निर्माण झाला.

वडीग्रोद्री फाट्याजवळ सोलापूर-धुळे महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. ओबीसी आंदोलनावरुन जरांगे संतप्त झालेत. तर जशास तसं उत्तर दिलं जाईल, असं म्हणत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधलाय. गृहमंत्री देवेद्र फडणवीस यांनी दोन्ही समाजात तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचं आवाहन केलंय.

दुसरीकडे जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ धाराशिव आणि बीडमध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला. दुकानांसह बहुतांश शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. या संघर्षस्थितीत महायुती सरकारच्या हालचालीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दरम्यान मराठा-ओबीसींना झुंजवत ठेवत राजकीय पोळी भाजून घेण्याचाही प्रयत्न होत आहे. मात्र राज्यातल्या सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची सर्व समाजांनी काळजी घेण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

Brushing Tips: ब्रश करण्याची योग्य वेळ कोणती?

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Street Style Pani Puri : ठेल्यावर मिळते तसे परफेक्ट पाणीपुरीचे पाणी, 'हा' एका पदार्थ रेसिपी बनवेल चटकदार

SCROLL FOR NEXT