Pandharpur, Maratha Kranti Morcha saam tv
महाराष्ट्र

Maratha Kranti Morcha : हे थांबलेच पाहिजे ! मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, राज्य सरकाराकडे मागणी

पंढरपुरात माध्यमांशी बाेलताना मराठा समाजातील नेत्यांनी केली मागणी.

भारत नागणे

Maratha Kranti Morcha : महाराष्ट्रात सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj), छत्रपती संभाजी महाराज (chhatrapati sambhaji maharaj) यांच्यासह अनेक महापुरुषांविषयी वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत, अशी वक्तव्ये करणा-यांवर सरकारने राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विनोद पाटील यांनी केली आहे.

विनोद पाटील हे रात्री पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी महापुरुषांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींवर राज्य सरकारने तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली. या संदर्भात राज्य सरकारने विधिमंडळात तसा कायदा करावा यासाठी मराठा क्रांती मोर्चाने (maratha kranti morcha) राज्य सरकारला लेखी निवेदन दिले आहे. (Maharashtra News)

सत्ताधारी आणि विरोधक स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी महापुरुषांना बदनाम करत असल्याचा आरोप विनोद पाटील यांनी केला आहे. पंढरपुरातील (pandharpur) पहिल्या मराठा भवन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी विनोद पाटील आले होते. यावेळी त्यांनी ही मागणी सरकारकडे केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana: क्रूरतेची परिसीमा! मुंडकं छाटलं अन् प्रायव्हेट पार्ट कापला; शेतीच्या वादातून ६० वर्षीय व्यक्तीची हत्या

Sushil Kedia: राज ठाकरेंना नडला, मनसैनिकांनी फोडला, केडियाच्या ऑफिसरवर नारळ मारले, PHOTO पाहा

Maharashtra politics : १९ वर्षांनंतर राज-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले दूर का गेले ते...

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : राज-उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यासाठी दाखल

SCROLL FOR NEXT