gunaratna sadavarte saam tv
महाराष्ट्र

Maratha Kranti Morcha: 'गुणरत्न सदावर्तेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा'

पुण्यापाठाेपाठ गुणरत्न सदावर्तें यांच्या विराेधात सांगलीत तक्रार दाखल.

विजय पाटील

सांगली : मराठा समाजाविषयी (maratha community) आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत आज (शुक्रवार) वकील गुणरत्न सदावर्ते (gunaratna sadavarte) यांच्या विराेधात मराठा क्रांती मोर्चाच्या (maratha kranti morcha) राज्य समन्वयकांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात (miraj city police station) तक्रार दाखल केली आहे. आमच्या तक्रारीत तथ्य असून पाेलीसांनी सदावर्तेंवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी समन्यवकांनी पाेलीसांना केली आहे अन्यथा येथेच ठिय्या मांडू असा इशारा देखील दिला आहे. (gunaratna sadavarte latest news)

मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विलास देसाई म्हणाले सदावर्ते यांच्या विधानाने मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांनी जातीय वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी आमची प्रमुख मागणी आहे.

पाेलीसांनी त्यांच्यावर समाजद्रोह आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी अपेक्षा आणि मागणी मराठा समाजाची असल्याचे देसाईंनी नमूद केले. जाेपर्यंत गुन्हा दाखल हाेत नाही ताेपर्यंत आम्ही पाेलीस ठाण्याच्या आवारात बसून राहू अशी भुमिका देसाईंनी स्पष्ट केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nose Blackheads Removal Tips: नाकावरचे ओपन पोअर्स कसे घालवायचे? घरगुती 4 सोपे उपाय करा

Women Health Care: महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची; स्त्रीरोग तज्ज्ञांनी सांगितलं 'हे' सल्ले

Mumbai Crime : समलैंगिक प्रेमाचा धक्कादायक शेवट! घरी जाण्यास नकार दिला, पार्टनरने छातीत चाकू खुपसला अन्...

Crime: कोचकडून हॉकी खेळाडूवर बलात्कार, स्टेडिअमच्या बाथरूमध्ये नेलं अन्...; पीडित मुलगी गरोदर

X युजर्स सावधान! हे नियम पाळा नाहीतर तुमचंही अकाउंट होईल Delete

SCROLL FOR NEXT