Pandharpur, Maratha Kranti Morcha saam tv
महाराष्ट्र

Jalna Maratha Reservation Protest: जालन्याच्या घटनेचे राज्यभरात पडसाद; काही जिल्ह्यात उद्या बंदची हाक

Jalna Maratha Reservation: घटनेच्या निषेधार्थ उद्या नाशिक, बीड आणि नंदुरबारमध्ये मराठा क्रांती मोर्चाकडून बंद पुकारण्यात आला आहे.

Vishal Gangurde

Jalna Maratha Reservation Protest:

जालन्यातील अंतरवली येथे पोलिसांकडून मराठा आरक्षण आंदोलकांवर लाठीमार झाल्यानंतर आंदोलन चिघळल्याची माहिती हाती आली आहे. या घटनेत आंदोलनकर्ते जखमी झाले आहेत. तसेच ८ पोलिसही जखमी झाल्याची माहिती आहे. लाठीचार्जनंतर जालन्यात जाळपोळीचीही घटना घडली. या घटनेचे आता राज्यभरात पडसाद उमटताना दिसत आहे. या घटनेच्या निषेधार्थ उद्या नाशिक, बीड आणि नंदुरबारमध्ये मराठा क्रांती मोर्चाकडून बंद पुकारण्यात आला आहे. (Latest Marathi News)

जालन्यातील मराठा आरक्षण आंदोनल पेटलं आहे. पोलिसांनी आंदोलकांवर मारहाण केल्यानंतर जालन्यातील अंतरवलीमध्ये आंदोलकांनी बस पेटवल्याची माहिती आहे. आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवरही दगडफेक केल्याचीही माहिती आहे.

त्यानंतर आज आंदोलकांनी पोलिसांवर आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, जालन्यातील लाठीचार्जच्या घटनेच्या निषेधार्थ उद्या मराठी क्रांती मोर्चाकडून नाशिक, बीड, नंदुरबार, पंढरपूर येथे निर्दशने येणार आहेत. (Jalna Protest Update)

नाशिकमध्ये उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. मराठा क्रांती मोर्चाचे नाशिकचे समन्वयक आणि स्वराज्य पक्षाचे राज्य संपर्कप्रमुख करण गायकर यांनी माहिती दिली आहे. तसेच मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उद्या बीड बंदची हाक दिली आहे. (Maratha Reservation Protest )

नंदूरबार जिल्ह्यात बंदची हाक

मराठा आरक्षण आणि आज जालना येथे मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन चिरडल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाने नंदूरबार जिल्हा बंदची हाक दिली आहे. उद्या मराठा क्रांती मोर्चातर्फे राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात येणार असल्याची हाक मराठा क्रांती मोर्चाचे नंदूरबार जिल्हाध्यक्ष नितीन जगताप यांनी दिली आहे.

दरम्यान, जालन्यातील घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. मुख्यमंंत्री शिंदे म्हणाले, 'जालना जिल्ह्यातील अंतरवली येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून या घटनेची माहिती घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत, जनतेने शांतता राखावी'. (Jalna Police News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos : गोल्डन साडी अन् मोकळे केस, प्राजक्ताच्या मनमोहक रूपाने केलाय कहर

Raj Thackeray : एक उल्लेख राहून गेला; राज ठाकरेंकडून सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगीरी व्यक्त, कारण काय?

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडीया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

SCROLL FOR NEXT