Maratha Reservation 
महाराष्ट्र

Raj Thackarey Video: मराठा आरक्षणाची गोष्ट होणारच नाही; आंदोलकांच्या चर्चेत राज ठाकरेंचं मोठं विधान

Maratha Reservation: मराठा आरक्षणासंदर्भात आपण जरांगे यांच्याशी भेटून चर्चा करणार आहोत. सध्या फक्त माथी फिरवण्याचे कामे चालू आहेत, असं राज ठाकरे मराठा आंदोलकांच्या चर्चेत म्हणालेत.

Bharat Jadhav

ठिय्या आंदोलन करणाऱ्या धाराशिवमधील मराठा आंदोलकांसोबत राज ठाकरेंची चर्चा संपलीय. या चर्चेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात पुन्हा एकदा मोठं विधान केलं. मराठा आरक्षणाची गोष्ट होणारच नाही आणि ज्या गोष्टी होत नाहीत त्यांनी वस्तूपणे सांगतो, असं विधान केलंय. सोलापूर दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर मोठं विधान केलं होतं. त्यानंतर राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मोठं विधान केलंय. महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नसल्याचं विधान केल्यानंतर मराठा आंदोलक संतप्त झालेत.

दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज ते धाराशिवमध्ये आहेत. यावेळी त्यांना मराठा आंदोलकाच्या रोषाला सामोरे जावे लागले. राज ठाकरे ज्या पुष्पक हॉटेलमध्ये होते, त्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केले. मराठा आंदोलकांना मराठा राज ठाकरेंची भेट घ्यायची होती, परंतु त्यांची भेट नाकरण्यात आली. त्यानंतर मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केलं.

हॉटेलमध्ये गोंधळ वाढल्यानंतर राज ठाकरेंनी मराठा आंदोलकांना उद्या चर्चेसाठी बोलवलं होतं. पण आंदोलकांना आजच भेट घ्यायची होती, त्यामुळे चर्चेला बोलवल्यानंतही ते आंदोलनावर ठाम होते. त्यानंतर राज ठाकरे यांनी मराठा आंदोलकांना चर्चेसाठी बोलवलं. या चर्चदरम्यान राज ठाकरे यांनी पुन्हा मोठं विधान केलंय.

आपण आता मनोज जरांगेसोबत चर्चा करणार असल्याचं राज ठाकरे यावेळी म्हणाले. परंतु मराठा आरक्षणाची गोष्ट होणारच नाही. तुमची फक्त माती भडकवण्याचं काम सध्या सुरू असल्याचा आरोप देखील राज ठाकरे यांनी केलाय. या चर्चेत बोलतांना राज ठाकरेंनी पुन्हा एकदा शरद पवार यांना टार्गेट केलंय. शरद पवारांना हे सगळं माहित आहे,तरीही शरद पवार केंद्राकडे का बोलत नाहीत. छगन भुजबळ यांनी मराठा समाजावर बोलायचं आणि बाकी मराठ्यांनी ओबीसीवर बोलायचं एवढेच सुरू असल्याचं राज ठाकरे म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने एकाच चित्रपटात साकारल्या तब्बल १६५ भूमिका, सिनेमा तुम्ही पाहिलाय का?

High cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; हे 5 सुपरफुड्स रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली चरबी करतील कमी

SCROLL FOR NEXT