महाराष्ट्र

Maratha Andolan: '...तर मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचणार', जरांगे पाटील यांनी सरकारला दिली 4 दिवसांची मुदत

मनोज जरांगेंनी शिष्ट मंडळाला ४ दिवसांची मुदत दिल्याची माहिती समोर आली आहे.

Ruchika Jadhav

Manoj Jarange News:

मनोज जरांगे गेल्या आठ दिवसांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण करतायत. हे उपोषण मागे घेण्यासाठी सरकारमार्फत प्रयत्न सुरू आहेत. आजही शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीला आलं होतं. यावेळी झालेल्या चर्चेत मनोज जरांगेंनी सरकारला ४ दिवसांची मुदत दिल्याची माहिती समोर आली आहे.

"सरकारला समितीचा अहवाल घ्यायचाय. मात्र मी आंदोलन मागे घेतलेलं नाही. समाजाच्या वतीने मी त्यांना मोकळ्यापणाने ४ दिवसांचा वेळ दिलाय. ४ दिवसांत ते आरक्षणाचा जीआर घेऊन येतील. तेव्हा त्यांचं स्वागत करू. ४ दिवस वाट बघावी लागेल, असं जरांगे पाटील यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले.

शिष्ठमंडळाने जरांगेची भेट घेत बैठकीसाठी मुंबईला सोबत येण्याची विनंती केली. मात्र, "गरज नसतांना तुम्ही वेळ मागताय. त्यापेक्षा मी असा मेलेलो बरा. मी समाजाला शब्द दिलाय आरक्षणाची ही शेवटची लढाई लढतोय.", असंही जरांगे यावेळी म्हणाले.

मराठा समाज गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणाची लढाई लढत आहे. आतापर्यंत अनेक मुक मोर्चे देखील काढण्यात आलेत. अशात शुक्रवारी देखील जालन्यात आंदोलन सुरू होते. यावेळी पोलिसांकडून त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला.

या घटनेमुळे मराठा आंदोलन आनखी पेटल्याचं दिसलं. अशात यात जरांगे देखील मराठा आरक्षणाच्या मागणिसाठी उपोषणावर बसले आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी आज आलेल्या शिष्ठमंडळाला जरांगे यांनी ४ दिवसांची मुदत दिली असून उपोषण कायम ठेवलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : मोठी संधी मिळेल; 5 राशींच्या व्यक्तींचे भाग्य उजळणार, वाचा बुधवारचे राशीभविष्य

बिहारमध्ये मोठी दुर्घटना! गंगा नदीत २० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

महायुतीत समन्वयाचा 'दुष्काळ', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाराज?

Fact Check: ऑनलाईन शॉपिंग महागणार? ऑनलाईन शॉपिंगवर 5% GST?

नवी मुंबई महापालिकेत मतदार राहतात, वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर 27 मतदारांची नोंद

SCROLL FOR NEXT