अक्षय शिंदे, जालना, साम टीव्ही प्रतिनिधी
Manoj Jarange Press Conference LIVE : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज सकाळी 11 वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहे. आज जरांगे पाटील नियोजित सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करणार असल्याची माहिती समोर येत आहे. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मी माझी उपोषणाची तारीख जाहीर करील अशा प्रकारची घोषणा जरांगे पाटील यांनी काही दिवसापूर्वी केली होती. त्यामुळे आता महायुती सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी पार पाडल्यानंतर आज सकाळी 11 वाजता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील महत्त्वाची पत्रकार परिषद घेऊन पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करणार आहे.
आज पुढील आंदोलनाची दिशा ठरणार Manoj Jarange Patil To Hold Press Conference Today
मागील 16 महिन्यापासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणासाठी त्यांनी आमरण उपोषण आंदोलन देखील केले आहे मात्र त्यांची मागणी मान्य झालेली नाही. आता पुन्हा एकदा महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर मनोज जरंगे पाटील मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाले असून आज ते पत्रकार परिषद घेऊन नियोजित त्यांच्या सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करणार आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षणाची पुढील दिशा देखील ते आज जाहीर करतील....
सामूहिक आमरण उपोषण आंतरवाली सराटीत होणार
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज सामूहिक आमरण उपोषणाची घोषणा करणार आहे. दरम्यान सामूहिक आमरण उपोषण अंतरवाली सराटीतच होईल अशी घोषणा जरांगे पाटील यांनी यापूर्वीच केली आहे . फडणवीस यांचं सरकार सत्तेत आल्यानंतर मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेणार? याकडे राज्याचे लक्ष लागलेय.
मनोज जरांगे यांच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष
निवडणुकीच्या निकालानंतर आणि महायुतीच्या सरकार स्थापनेनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील भूमिका जाहीर करणार आहे. त्यामुळे राज्यातील मराठा समाजासह सर्वच राजकीय पक्षाचे लक्ष आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतात याकडे लागल आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.