Manoj Jarange  Saam tv
महाराष्ट्र

Manoj Jarange : हत्येचं षडयंत्र कुणी रचलं? मनोज जरांगेंनी केला गंभीर आरोप

Manoj Jarange Latest news : मनोज जरांगे यांच्या हत्येचं षडयंत्र रचल्याचे समोर आलं आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आलीये. यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Vishal Gangurde

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा हत्या करण्याचा कट

पोलिसांनी आतापर्यंत दोघांना अटक, पुढील तपास सुरू

मनोज जरांगे यांचा हत्येचा कट रचणाऱ्यांना इशारा

मनोज जरांगे यांचे राजकीय नेत्यांविरोधात गंभीर आरोप

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या हत्येच्या कट प्रकरणात पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला आहे. पोलिसांनी आतापर्यंत दोघांना अटक केली आहे. मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट कुणी रचला, याचा शोध पोलिसांकडून केला जात आहे. आता प्रकरणात जरांगेंनी गंभीर आरोप केला आहे. एका नीच वृत्तीने हा कट रचल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय.

पोलिसांच्या कारवाईनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. मनोज जरांगे म्हणाले, 'या प्रकरणात काय गंभीर खुलासे झाले, मला माहीत नाही. तो तपास आणि चौकशीचा भाग आहे. जालना जिल्ह्याचे आमचे एसपी साहेब यात लक्ष घालून आहे. ते खोलापर्यंत जाणार आहे'.

'मला धमकी देणारा जन्माला येऊ शकत नाही. पण हे सत्य आहे की, खूप मोठा षड्यंत्र रचलं गेलं. एका नीच वृत्तीने हा कट रचलाय. तू जरी नेता असशील, तर चुकीच्या ठिकाणी हात टाकला आहे. घटना खूप गंभीर आहे, करणारा पेक्षा करून घेणारा करून घेणाऱ्यांनी खूप चुकीचं पाऊल उचललं आहे. खूप चुकीच्या ठिकाणी हात घातला आहे, असे ते म्हणाले.

'माझं समाजाला आवाहन आहे की, तुम्ही शांत राहावं. कट करणाऱ्या नेत्याला एक लक्षात ठेव म्हणावं, तू येथून पाठीमागे काय केले, कुणाला कळालं नाही. तुझ्या आयुष्यातली पहिली वेळ असेल की, तू करायचा अगोदर तुझ्या आठवणीला आम्ही भेदलं आहे. याचा अर्थ तू समजून घे, आमचेही हात खूप लांब आहे. आम्ही कच्चे नाही, असेही ते पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DC vs RR: दिल्लीच्या विजयानं प्लेऑफमधील चुरस वाढली; स्टार्क आणि राहुल ठरले विजयाचे शिल्पकार

Maharashtra News Live Update: परभणीत उन्हाचा कहर, तापमानाने गाठला 45.2 अंशांचा उच्चांक

Junnar ST Bus Accident: गुंजाळवाडीजवळ शेगाव-कल्याण एसटीचा भीषण अपघात; दोन ते तीनवेळा उलटली बस, दोघांचा मृत्यू, १७ जखमी

चित्रपटसृष्टी हादरली! प्रसिद्ध दिग्दर्शकाची आत्महत्या; नदीमध्ये सापडला मृतदेह

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! सिमेंट मिक्सरने दोघांना चिरडलं, वडिलांच्या डोळ्यासमोर ८ वर्षीय अहानाने सोडले प्राण

SCROLL FOR NEXT