विश्वभूषण लिमये, साम प्रतिनिधी
हिंदुत्ववावर आक्रमण करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आज प्राचीन मंदिरांना जी इजा पोहचवली आहे, ती औरंग्या आणि त्याच्या पिल्लावळांनी केलं आहे. पाकिस्तान जिंदाबाद घोषणा देणाऱ्यांना लाथा घालण्याची गरज आहे. पाकिस्तानातं जेवढे अतिरेकी नाहीत तेवढे गद्दार भारतात आहेत, असं वादग्रस्त विधान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलंय.
गोपीचंद पडळकर हे अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गीत झालेल्या 'हिंदू विराट सभेत बोलत होते. या कार्यक्रमाला भाजप नेते निलेश राणे देखील उपस्थित होते. पडळकर यांनी केलेल्या आक्रमक भाषणामुळे वाद होण्याची शक्यता आहे. यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. सर्व धर्म समभाव ही अफूची गोळी आहे.
मुसलमान हे काँग्रेसला पण मानत नाहीत. इंग्रजांपेक्षा हे वाईट लोक आहेत हे काँग्रेसला कळलं पाहिजे. पाकिस्तानातं जेवढे अतिरेकी नाहीत तेवढे गद्दार भारतात आहेत. मालेगावमध्ये त्यांनी काँग्रेसला सोडून आपला उमेदवार निवडून आणला हे काँग्रेसला पण कळलं पाहिजे. मात्र ते मतांसाठी दाढी कुरवाळत बसले आहेत.
हम दो हमारे दो आणि हम दो हमारे एक वर मीं बोलू शकत नाही. पण मुसलमाना वाटतं की, हम दो हमारे दहा आणि आपलं सरकार आलं पाहिजे. तर आपण 'हम दो हमारा एक' म्हणून सरकारी नोकरी होईल, असं विचार करतो. पण मुस्लीम तसा विचार करत नाहीतं. मुस्लीम जन नियंत्रण कायदा आला पाहिजे. धर्मांतर नियंत्रण कायदा देवा भाऊंच्या नेतृत्वात येतोय. सॅमसंग,कयान,मयाण क्रिश ही हिंदूंची नाव असू शकत नाहीत, असं पडळकर म्हणाले.
महाराष्ट्रात लँड जिहाद हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.असली दादागिरी महाराष्ट्रात खपवून घेतली जाणार नाही. धनगर समाज आरक्षण, ओबीसी आरक्षणमध्ये मी पुढ असतो आणि कायम राहणार मात्र जेव्हा हिंदूंचा विषय असेल तेव्हा मी हिंदू धनगर असणार. जेव्हा धर्माचा विषय येईल त्यावेळी आम्ही जातीचा विषय बाजूला सारू.
हिंदूंना मदत करण्यासाठी मी २४ तास मोकळा गडी आहे. माझं लग्न नाही, शाळा नाही, बँका नाही, सोसायटी नाही, कारखाना नाही मीं मोकळा गडी आहे, असं पडळकर यावेळी म्हणालेत. भारतात १० कोटी घुसखोर या देशात राहतात पहिल्यांदा या घुसखोरांना हाकलले पाहिजे. जर हॉटेलवरचा मॅनेजर एक रात्री राहण्यासाठी आधार कार्ड मागितलं जातं. तर या देशात राहण्यासाठी कागद लागत नाही का?
हिंदू विराट सभेत बोलतांना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाजप नेते निलेश राणे यांचे कौतुक केलं. नितेश राणे डॉन गडी आहे, तो ढिला फिरत नाही. वाघाच्या पोटी वाघाचं जन्माला येतो, बकरी किंवा हरीण जन्मायला येत नाही. नारायण राणे 80 वर्षांचे असले तरी डॉन आहेत, त्यांचा मुलगा डॉनचं असणार असंही गोपीचंद पडळकर म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.