मराठा समाजासाठी आंदोलन करतोय म्हणून मला बदनाम केलं जातंय. माझे बनावट व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत. पण मी देवेंद्र फडणवीसांना इतकंच सांगतो. भलेही तुम्ही मला बदनाम करा, पण कट रचून मराठा समाजापासून मला तोडण्याचा प्रयत्न केलात, तर तुमचा ४८ पैकी एकही खासदार लोकसभेत निवडून येऊ देणार नाही, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी बीड जिल्ह्यातील वडवणी येथे गुरुवारी (ता. १४) मराठा समाजाची संवाद बैठक घेतली. या बैठकीला हजारो मराठा बांधव उपस्थित होते. बैठकीत बोलताना मनोज जरांगे यांनी आरक्षणावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांसह राज्य सरकारवर टीकेचा भडीमार केला.
"भाजपचे लोक माझ्याविषयी बनावट व्हिडीओ तयार करत असून ते सोशल मीडियावर व्हायरल करीत आहेत. मी मराठा समाजापासून लांब गेलो पाहिजे असा कट रचण्यात आला आहे. पण, प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे की मनोज जरांगे पाटलांनी घाबरु नये". (Latest Marathi News)
"मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) जाहीर सांगतो, की तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही कार्यकर्त्यांच्या माध्यमांतून करणार आहात. पण मला जे करायचं ते मी करणारच आहे. तुम्ही कुठलेही व्हिडीओ आणा, कसलेही रेकॉर्डिंग आणा मी आरक्षण घेणार म्हणजे घेणारच. वेळ पडली तर समाजासाठी वेगळं आंदोलन करेन", असा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे.
"आपल्या विरोधात मराठा समाजाचा इमानदार पोरगा लढतोय, याचं तुम्ही कौतुक करायला पाहिजे होतं. तर तुम्हाला खरे राजकारणी म्हटलं गेलं असतं. पण देवेंद्र फडणवीसांची वृत्ती नीच आहे. मी तुम्हाला वडवणीतून आव्हान देतो आहे. तुम्ही मला भलेही बदनाम करा. पण समाजापासून तोडण्याचा प्रयत्न केलात, तर तुमचा ४८ पैकी एकही खासदार निवडून येऊ देणार नाही", असा इशाराच जरांगेंनी फडणवीसांना दिलाय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.