Manoj Jarange Patil Antarwali Sarati News  Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange News: अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंचं जंगी स्वागत; मध्यरात्रीच मराठा समाजाचा जल्लोष, पाहा VIDEO

Antarwali Sarati News: मनोज जरांगे पाटील मध्यरात्रीच्या सुमारास जालन्यातील अंतरवाली सराटी गावात पोहचले. मुंबईतून मराठा आरक्षण घेऊनच परतल्यानंतर गावातील मराठा बांधवांनी जरांगेचं जंगी स्वागत केलं.

Satish Daud

Manoj Jarange Patil Antarwali Sarati News

राज्य सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर शनिवारी (२७ जानेवारी) नवी मुंबईतून मराठा आंदोलक माघारी परतले. मनोज जरांगे पाटील देखील मध्यरात्रीच्या सुमारास जालन्यातील अंतरवाली सराटी गावात पोहचले. मुंबईतून मराठा आरक्षण घेऊनच परतल्यानंतर गावातील मराठा बांधवांनी जरांगेचं जंगी स्वागत केलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी डीजेवर मनोज जरांगे पाटील यांची मिरवणूक काढण्यात आली. तसेच गुलाल उधळून पेढे देखील वाटण्यात आले. मध्यरात्रीपर्यंत अंतरवाली सराटीत मराठ्यांचा जल्लोष सुरू होता. यावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. (Latest Marathi News)

दरम्यान, मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मराठा समाजाची बैठक घेणार आहेत. या बैठकीला तब्बल १२३ गावातील मराठा बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील या बैठकीत काय भूमिका मांडणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.

आरक्षण मिळाले आता पुढे काय?

राज्य सरकारने मराठा समाजाच्या संपूर्ण मागण्या मान्य करत सुधारित अध्यादेश काढला. आता या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी सरकारकडून फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेण्यात येणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

मराठा समाजास आरक्षण मिळाले आता पुढे काय? याबाबत निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील आजच्या बैठकीत आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. दरम्यान, मराठ्यांचा सात बारा पक्का झाला, आता वळवळ करायची गरज नाही.आता सग्या सोयऱ्या शब्दाने सर्व मराठ्यांना आरक्षण मिळणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Silent Heart Attack: या 6 व्यक्तींना सायलेंट हार्ट अटॅकचा धोका जास्त असतो?

Maharashtra News Live Update: भिमाशंकरच्या दुरवस्थेवर सुप्रिया सुळेंची टीका; मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार

Manoj Jarange : मोठी बातमी! एकनाथ शिंदें आज परभणी दौऱ्यावर, मनोज जरांगेंनी दिला इशारा

Bonus 2026 : दसऱ्याआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट? ₹7,000 ऐवजी मिळणार ₹21,000

Chutneys for weight loss: काही केल्या पोटावरची चरबी जातच नाहीये? या 5 प्रकारच्या चटणी करतील तुमची मदत

SCROLL FOR NEXT