Manoj Jarange Patil In Parali 
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: आरक्षण नाही, तर सुपडा साफ होणारच; जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

Bharat Jadhav

विनोद जिरे, साम प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजणार आहे. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारवर ताशोरे ओढले आहेत. परळी वैजनाथ येथे येथील घोंगडी बैठकीत बोलतांना जरांगे पाटील बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका केलीय.

फडणवीस तुम्हाला आणखीन सांगतो. तुम्ही आणखीन मराठ्यांना छेडण्याचा प्रयत्न सोडा, अन्यथा महाराष्ट्रात ब्या ला सुद्धा भाजप उरणार नाही. परळी वैजनाथ येथे येथील घोंगडी बैठकीत बोलतांना जरांगे पाटील बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केलीय.

आरक्षणाची किंमत आपण जाणून घ्या, राजकारणी येत राहतील, जात राहतील. आरक्षणापासून एकही मराठा समाजाचे घर वंचित राहील नाही पाहिजे. आपल्याला आरक्षण नाही दिलं तर सरकारला सत्ता मिळू द्यायची नाही, असं म्हणत जरांगे-पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याविरोधात ट्रॅप रचल्याचा आरोपही जरांगे पाटील यांनी केलाय. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याविरोधात बोलण्यासाठी आमदारांना सोडलंय. अनेक आमदार आपल्याविरोधात बोलत असल्याची टीकाही जरांगेंनी केलीय.

यावरून बोलतांना जरांगे म्हणाले, फडणवीसांनी कितीही आमदार माझ्यावर सोडले, पण आपण आरक्षणाचा मुद्दा सोडणार नसल्याचं जरांगे परळी वैजनाथ येथे म्हणाले. आपल्याला बोलणाऱ्या या आमदारांना टप्प्याटप्प्यांनी बघणार आहे. त्यांना सुट्टी नाही, जे विरोधात आले त्यांचा कार्यक्रम होणार, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. मग तो कुणीही असुद्या, त्याला सुट्टी नाही. माझा लोकसभेत हिसका पाहिलाय. विरोधात गेला की हिसका दाखवलाच, असा जरांगे म्हणाले.

..तरच सरकार टिकणार

मराठा समाजाला आरक्षण दिलं तरच सरकार टिकेल, असं जरांगे पाटील म्हणालेत. जर आरक्षण दिले तर तुम्हाला राजकारण लखलाब. नाही दिलं तर सुट्टी नाही. मग त्यांचे११३ आमदार पडणार. आरक्षण दिले तरच सरकार टिकू शकतं नाहीतर पडू शकतं. सरकारची झोप उडालीय. माझा जीव आरक्षणात आहे आणि सरकारचा सत्तेत असल्याचं जरांगे पाटील म्हणालेत. आपल्याला आरक्षण नाही दिल तर सरकारला सत्ता मिळू द्यायची नाही, असं आवाहन जरांगेंनी मराठा समाजाला केलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Canara Bank Job: कॅनरा बँकेत बंपर ओपनिंग, तब्बल ३००० पदांसाठी भरती; तुम्ही पात्र आहात का? जाणून घ्या

Tirupati Balaji : बालाजी मंदिरातील लाडूमध्ये तूपाऐवजी जनावरांची चरबी, धक्कादायक दावा

Indurikar Maharaj Kirtan: 'स्वार्थासाठी धर्माचे भांडवल करू नका, गरिबांच्या पोरांचा बळी घेऊ नका', इंदुरीकर महाराजांनी नेत्यांना फटकारले

Maharashtra Politics : अजितदादांचं ठरलं! ७० हून अधिक जागांवर दावा, विद्यमान आमदारांनाही मोठा दिलासा!

Shukraditya Rajyog: सूर्य-शुक्राच्या युती बनला शुक्रादित्य राजयोग; 'या' राशींच्या सर्व इच्छा होणार पूर्ण

SCROLL FOR NEXT