Manoj Jarange Patil Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आजपासून दोन दिवसांच्या संवाद बैठक दौऱ्यावर

Manoj Jarange Patil : दुपारी 3:00 वाजता मोहोळ, जि. सोलापूर या ठिकाणी संवाद बैठक होईल. तर सायंकाळी 5:00 वाजता शेटफळ जि. सोलापूर या ठिकाणी संवाद बैठक होणार आहे.

लक्ष्मण सोळुंके

Sanvad Baithak :

मनोज जरांगे हे आजपासून दोन दिवसांच्या संवाद बैठक दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी नऊ वाजता जरांगे पाटील अंतरवाली सराटी गावातून निघणारेत. भूम येथील विवाह सोहळ्याला उपस्थिती लावल्यानंतर त्यांचा दुपारी 1:30 वाजता भूम शहरात मराठा समाजासोबत त्यांची संवाद बैठक होणार आहे.

त्यानंतर सायंकाळी वांगी, करमाळा या ठिकाणी उदयसिह देशमुख यांच्या विवाह समारंभाला जरांगे भेट देणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 4 मार्च 2024 सोमवार दुपारी 12:00 वाजता, वैराळा जि. सोलापूर या ठिकाणी संवाद बैठक होणार आहे.

दुपारी 3:00 वाजता मोहोळ, जि. सोलापूर या ठिकाणी संवाद बैठक होईल. तर सायंकाळी 5:00 वाजता शेटफळ जि. सोलापूर या ठिकाणी संवाद बैठक होणार आहे. असा जरांगेंचा दोन दिवसीय दौरा असणार आहे.

दरम्यान, काल अहमदनगरमध्ये सकल मराठा समाजाच्यावतीने जिल्हाभरातील मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये कोपर्डी घटनेतील आरोपींवर हल्ला करणारा अमोल सुखदेव खुणे यांची देखील उपस्थिती होती. दरम्यान या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीसमोर शपथ घेण्यात आली.

यामध्ये जोपर्यंत सरकार मराठा समाजाची सगेसोयरेबाबतच्या मागणी बाबत कायदा पारित होऊन आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत कुठल्याही पक्षाच्या किंवा नेत्यांच्या सभेला जाणार नाही. तसेच कोणत्याही नेत्याला मतदान करणार नाही, असा ठराव या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Hospital: राज्यातील आरोग्यसेवा 'स्ट्रेचर'वर, शासकीय रुग्णालयांची दुरवस्था; रुग्णांचे हाल

IAS तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईचा धसका; तस्करांकडून गुटखा पकडण्यासाठी गेलेल्या पथकावर जीवघेणा हल्ला

School Reopen: मोठी बातमी! राज्यातील शाळांच्या वेळापत्रकामध्ये मोठा बदल, शिक्षण विभागाकडून अधिकृत तारीख जाहीर

Petrol Crisis: राज्यात पेट्रोलचा काळाबाजार! किराणा दुकानात पेट्रोलची सर्रास विक्री, 'साम'च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पर्दाफाश

PM किसान योजनेबाबत मोठी अपडेट; शेतकऱ्यांच्या खात्यात १८ जूनला २००० रुपये जमा होणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT