Manoj Jarange refuses government security even after a life-threatening plot is exposed. Saam tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: आखण्यात आला होता जिवे मारण्याचा कट, तरीही मनोज जरांगेंनी नाकारलं पोलीस संरक्षण; काय आहे कारण?

Manoj Jarange Patil Allegations On Government: मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी सरकारने दिलेले पोलिस संरक्षण नाकारलंय. त्यांच्या हत्येचा कट आखण्याप्रकरणी बीडमध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. जरांगे यांनी सुरक्षा कवच का नाकारले ते जाणून घेऊ.

Bharat Jadhav

  • मनोज जरांगे यांच्यावरच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळला

  • जरांगे यांनी पोलीस संरक्षण नाकारलंय.

  • हत्येच्या कटात धनंजय मुंडे सहभागी असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केलाय.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट उधळून लावण्यात आला होता. हत्येचा कट आखण्याप्रकरणी बीडमधून दोन जणांना अटक करण्यात आलीय. तर मनोज जरांगे पाटील यांनी हत्येचा कट आखण्यात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचा सहभाग असल्याचा आरोप केला होता. जरांगेंच्या जीवाला धोका असल्यानं त्यांना सरकारकडून संरक्षण देण्यात येत आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी संरक्षण घेण्यास नकार दिलाय. विशेष म्हणजे जरांगे यांनी अर्ज देऊन पोलीस संरक्षण काढून घेण्यास सांगितलंय.

"माझ्या घातपाताचा कट रचणाऱ्या मुख्य सूत्रधारालाच सरकार चौकशीपासून आणि अटकेपासून वाचवत असेन, तर मला अशा सरकारचे पोलीस संरक्षण नको! अशा अत्यंत कठोर शब्दांत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी संरक्षण घेण्यास नकार दिलाय. त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधलाय. जरांगे यांनी बुधवारी दि. १९ नोव्हेंबर रोजी जालना पोलीस अधीक्षकांकडे अर्ज देत आपले पोलीस संरक्षण तात्काळ काढण्याची मागणी केली.

पोलीस अधीक्षकांना दिलेल्या अर्जात मनोज जरांगे पाटील यांनी अत्यंत गंभीर आरोप केलाय. "माझ्या घातपाताचा कट रचणारा धनंजय मुंडेच आहे. या कटाच्या मुख्य सूत्रधाराला सरकार चौकशीपासून आणि अटकेपासून वाचवत आहे." "मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री धनंजय मुंडे यांना पूर्ण ताकतीने वाचवण्याचा प्रयत्न करताहेत.

त्यामुळे मला दिलेलं पोलीस संरक्षण नको, ते तात्काळ काढावं." असं जरांगे यांनी आपल्या अर्जात म्हटलंय. दरम्यान जरांगे पाटील यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्यावर आपला घातपात करण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपांवर जरांगे अजूनही ठाम आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : ठसका लागला की वरती बघायला का सांगतात ? कारण ऐकून तुम्ही सुद्धा चक्रवाल

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये मोबाईल दुरुस्तीच्या कारणावरून वाद, दुकान चालकाला टोळक्याकडून बेदम मारहाण

Maharashtra Rain Alert: पाऊस धुमाकूळ घालणार! पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाड्यात तुफान पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT