Malvan Fort Rada  Saam tv
महाराष्ट्र

Malvan Fort Rada : मालवणच्या राजकोट किल्ल्यावर मनोज जरांगे पाटील जाणार; PM नरेंद्र मोदींचं नाव घेत स्पष्टच बोलले

Manoj Jarange patil on malvan fort rada : मालवणच्या राजकोट किल्ल्यावर मनोज जरांगे पाटील जाणार असल्याची माहिती स्वत: दिली आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव घेत मोठं भाष्य केलं.

Vishal Gangurde

जालना : मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळ्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. आज बुधवारी याच राजकोट किल्ल्यावर नारायण राणे आणि आदित्य ठाकरे यांचे समर्थक भिडले. या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांच्या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झालं. आता या ठिकाणी तणावपूर्ण शांतता असल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतर आता राजकोट किल्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी जालन्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या प्रकरणातील दोषींना सोडणार नसल्याचा इशारा दिला. मनोज जरांगे पाटील म्हणाले, 'राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली, त्याचं राजकारण करणार नाही. या पुतळ्याचं बांधकाम करणारा कोण, एखाद्या नेत्याने घाई गडबडीत केलं असावं. कंत्राटदार कोण, या पुतळ्याच्या कामाचा दर्जा काय होता.. राजकारण करायचं म्हणून करायचं नाही.

'पुतळा कोसळण्यामागे उद्घाटकाचा काय दोष, नरेंद्र मोदी आले आणि उद्घाटन करून गेले त्यांचा काय दोष. आम्हाला या प्रकरणात दोषी सापडले तर त्यांना सोडणार नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये राजकारण नको. आम्हाला प्रेरणा देणारं बलस्थान आहे. हे देशाचं दैवत आहे. आमची १ तारखेला राजकोट किल्ल्याला भेट देण्याची तयारी आहे. आम्ही बैठकीनंतर जाहीर कळवू, असे जरांगे पाटील यांनी सांगितले.

दोषींना कायमचं तुरुंगात टाका

'छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कसा कोसळला, याची सखोल चौकशी करून दोषी असणाऱ्याला कायमचं तुरुंगात टाका अन्यथा याचे सखोल परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. दिपक केसरकर यांच्या वक्तव्यावर दुपारी जरांगे यांनी टीका केली. केसरकर यांना काय बोलावं, मंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असं बोलणं म्हणजे अवघड आहे, असं सांगत मनोज जरांगे पाटील यांनी केसरकर यांच्यावर निशाणा साधलाय. केसरकर यांच्या बोलण्यातील शुभ संकेतचा अर्थ म्हणजे भाजपचं सरकार जातं, असा त्यांचा रोख असावा, असा टोला जरांगे यांनी केसरकर यांना लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश

Colours Of Tongue : जीभेचा रंग बदलला असेल तर सावध व्हा! शरीर देतेय 'या' गंभीर आजारांचे संकेत

Maharashtra News Live Update: मुंबई महापौर कार्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

Perfect Lipstick Shades For Women: महिलांसाठी परफेक्ट लिपस्टिक शेड्स, लाल आणि न्यूड रंगामध्ये लेटेस्ट ५ डिझाईन्स

Water for Weight Loss: वजन कमी करायचे आहे? मग रोज किती पाणी प्यावे? जाणून घ्या ७ महत्त्वाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT