manoj jarange patil warning to marahta leader state government on Maratha reservation  Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: अन्यथा बीडमधील मराठा रस्त्यावर उतरेल; मनोज जरांगेंचा सरकारला आणखी एक अल्टिमेटम

Manoj Jarange Patil: मात्र मराठा आंदोलकांना त्रास देण्याचा प्रकार थांबवला नाही तर दोन दिवसांत बीडमधील मराठा रस्त्यावर उतरेल असा ईशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय.

साम टिव्ही ब्युरो

लक्षमन सोळुंके

Manoj Jarange Patil:

बीडमधील अधिकारी आंदोलकांवर नाहक गुन्हे दाखल करतायत. हा प्रकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी थांबवावा. अन्यथा बीडमधील मराठा रस्त्यावर उतरेल, असा इशारा मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मराठा आरक्षणासाठी गेल्या काही दिवसांत बीड (Beed) आणि जालन्यात मोठी आंदोलने झाले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हे दाखल केले होते. तसेच दोन दिवसांपूर्वी गावबंदीचे बॅनर फाडल्याने जालन्यातील भोकदरन येथे दोन गटांत वाद झाला होता. यावेळीही पोलीसांनी दोन्ही गटातील तरुणांवर कारवाई केली.

त्यावरून बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं की, "बीड जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर अधिकाऱ्यांकडून नाहक कारवाई करण्यात येत आहे. अधिकारी आंदोलकांवर गुन्हे दाखल करतायत. हा प्रकार गंभीर असून बीडमधील अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी समज द्यावी.

तेथील अधिकारी हे जातीयवादी आहेत. मात्र मराठा आंदोलकांना त्रास देण्याचा प्रकार थांबवला नाही तर दोन दिवसांत बीडमधील मराठा रस्त्यावर उतरेल असा ईशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय.

अलीकडच्या काही दिवसांत राज्य सरकारने मराठा समाजला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी काम वाढवलं असून सरकारच्या या कामावर समाधानी असल्याचं देखील जरांगेंनी यावेळी सांगितलं.

बीड आणि जालन्यातील अनदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना आदेश दिले आहेत. त्यामुळे २४ तारखेपर्यंत काहीही बोलता येणार नाही. बीडमधील राजकिय नेत्यांची घरे,कार्यालये यांची तोडफोड मराठा आंदोलकांनी केली नसून त्यांच्याच राजकीय वादातून ही जाळपोळ झाली त्यामुळे मराठा समाज नाहक असे गुन्हे दाखल झालेले खपवून घेणार नाही, असंही जरांगेंनी यावेळी ठामपणे सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boat accident: समुद्रात नाव उलटली, १५ मुलांसह १३९ जणांचा मृत्यू; ११६ जण बेपत्ता

Maharashtra News Live Update: पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी

Congress Protest Live Update : दिल्लीत भाजप महिला मोर्चाचं काँग्रेसविरोधात आंदोलन, पाहा व्हिडीओ

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर कमी झाला तरी पगार वाढणार? २.१ च्या फॉर्मुल्याचे गणित समजून घ्या

Skin Care: चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी लावा बटाट्याचा रस; मिळेल ग्लोईंग स्मूद स्किन

SCROLL FOR NEXT