Manoj Jarange Patil  Saam Digital
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : दोन दिवसात मोठा गौप्यस्फोट?, 'दाराआडची चर्चा उघड्यावर मांडणार'; मनोज जरांगेंचा दरेकरांना इशारा

Manoj Jarange Patil On Pravin Darekar : मराठा आंदोलक मनोज जरांगे आणखी आक्रमक झालेत. मातोश्रीबाहेरील आंदोलनासाठी थेट भाजपच्या प्रवीण दरेकरांना जबाबदार धरत त्यांनीच 13 संघटनांना एकत्र केल्याचा आरोप जरांगेंनी केलाय.

Sandeep Gawade

भरत मोहोळकर, साम टीव्ही प्रतिनिधी

मराठा आंदोलकांनी उद्धव ठाकरेंचं निवासस्थान मातोश्रीबाहेर आंदोलन केल्यानंतर आता मनोज जरांगे आणखीआक्रमक झालेत. मातोश्रीबाहेरील आंदोलनासाठी थेट भाजपच्या प्रवीण दरेकरांना जबाबदार धरत त्यांनीच 13 संघटनांना एकत्र केल्याचा आरोप जरांगेंनी केलाय. दरेकरांनी कुठं बैठका घेतल्या? त्याचा तपशीलच दोन दिवसात जाहीर करणार असल्याचा इशारा जरांगेंनी दिलाय..

गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगेंनी आपला मोर्चा भुजबळांवरून दरेकरांकडे वळवलाय. भाजपला मराठ्यांची धास्ती असल्यानेच त्यांनी नाराज संघटनांना सोबत घेतलंय. या माध्यमातून मराठा आंदोलन बदनाम करायचं षडयंत्र दरेकरांनी रचल्याचाआरोप जरांगेंनी केलाय.

या संघटनांसंदर्भातील माहिती आपल्याकडे आल्याचंही जरांगेंनी म्हटलंय. तर जरांगेंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेनंतर फडणवीसांचा मत्सर असलेले लोक त्यांच्याविरोधात बोलत असल्याचा टोला दरेकरांनी लगावलाय.

फडणवीस आणि दरेकर हे मराठ्यांना अंगावर घेत असल्याचं जरांगेंनी म्हटलंय. बंद दाराआड काय झालं ते उघड करणार असल्यचाही इशाराही त्यांनी दिलाय. त्यामुळे जरांगे नेमका कोणता गौप्यस्फोट करणार? आणि त्यातून भाजप आणि दरेकर कसा मार्ग काढणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT