Manoj Jarange Patil Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: आज मराठ्यांचा मोर्चा मुंबईकडे रवाना होणार! मनोज जरांगे पाटील सकाळी १० वाजता निघणार

Manoj Jarange Patil Mumbai Maratha Aarakshan: आज मनोज जरांगे पाटील लाखो मराठ्यांसह मुंबईकडे रवाना होणार आहे. मराठा आरक्षणासाठी ते मुंबईत आंदोलन करणार आहेत.

Siddhi Hande

मनोज जरांगे पाटील आज मुंबईत येणार

लाखो मराठा आंदोलक मुंबईत येऊन आंदोलन करणार

आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी नाकारली तरीही मनोज जरांगे पाटील निर्णयावर ठाम

अक्षय शिंदे पाटील, साम टीव्ही प्रतिनिधी

आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे रवाना होणार आहे. लाखो मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईकडे येणार आहेत. सकाळी १० वाजता ते आंतरवाली सराठीतून निघणार आहे. मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर आंदोलन करणार होते. परंतु उच्च न्यायलयाने परवानगी नाकारली आहे.

न्यायालयाने आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मनाई केल्यानंतर देखील जरांगे पाटील मुंबईला जाण्यावर ठाम आहेत. अंतरवाली सराटीमध्ये राज्यभरातील मराठा बांधव येण्यास सुरुवात झाली आहे. आज न्यायालय आंदोलनावरची मनाई कायम ठेवतं ? , की मनोज जरांगे यांना आंदोलन करण्यासाठी अटी शर्तीसह परवानगी देत? हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईला जाण्यावरती ठाम आहेत. आज सकाळी दहा वाजता ते जालन्यातील अंतरवाली सराटीतून लाखो मराठा बांधवांसह मुंबईच्या दिशेने रवाना होतील. 29 ऑगस्ट ला सकाळी दहा वाजल्यापासून मनोज जरांगे मुंबईच्या आझाद मैदानावरती आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहे.

त्यापूर्वी न्यायालयाने त्यांना आझाद मैदानावरती आंदोलन करण्यास मनाई केली असली तरी मनोज जरांगे मात्र आझाद मैदानावरतीच आंदोलन करण्यास ठाम आहे. न्यायदेवता आम्हालाही न्याय देईल आमचे वकील कोर्टात बाजू मांडतील असा आशावाद जरांगे पाटलांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आज न्यायालय आंदोलनावरची मनाई कायम ठेवतं , की मनोज जरांगे यांना आंदोलन करण्यासाठी अटी शर्तीसह परवानगी देत हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान आज सकाळी मराठा बांधव मनोज जरांगे यांच्यासह अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: २०२६ की २०२७; कधी होणार आठवा वेतन आयोग लागू? केंद्र सरकारने स्पष्टच सांगितलं

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी पंपासमोर ३ ते ४ किलोमीटरच्या रांगा

Mumbai : डोकं रिक्षावर आपटलं, फरफडत नेलं; ४ वर्षांच्या चिमुरड्याला अमानुष मारहाण, वसईचा व्हिडिओ पाहून काळजाचा ठोका चुकेल!

भोंदू बाबा अशोक खरातवर शिर्डीत गुन्हा दाखल; 4 एकर भूखंड बळकावला|VIDEO

Dhurandhar 2 Collection : जगभरात 'धुरंधर 2'चा धुमाकूळ; 1,400 कोटींच्या उंबरठ्यावर, रणवीर सिंहने रचला इतिहास

SCROLL FOR NEXT