Manoj Jarange Patil 
महाराष्ट्र

Manoj Jarange : मनोज जरांगेंना भुजबळांच्या समता परिषदेचा विरोध, नाशकात गाडी रोखली, काळे झेंडे दाखवले!

Manoj Jarange Patil News : नाशिकच्या सिन्नर येथे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला. समता परिषदेच्या महिला कार्यकर्त्यांकडून ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला.

Namdeo Kumbhar

Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या शांतता रॅलीचा आज नाशिकमध्ये समारोप झाला. छगन भुजबळांच्या (chhagan bhujbal) बालेकिल्ल्यामध्ये त्यांचं दिमाखात स्वागत झालं. पण त्यांना समता परिषदेच्या (Samata patishad) विरोधाचा सामनाही करावा लागला. त्यांना काळे झेंडेही दाखवण्यात आले.

नाशिकच्या सिन्नर येथे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला. समता परिषदेच्या महिला कार्यकर्त्यांकडून ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला. महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत परिस्थिती आटोक्यात आणली. सिन्नर येथून नाशिक कडे येत असताना जरांगेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला. मेघा दराडे नावाच्या महीलेसह आणखी एका अनोळखी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. नाशिकच्या सिन्नर येथील बस स्टँड जवळ ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

काळे झेंडे दाखवले -

नाशिकमध्ये मनोज जरांगे पाटील यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. काळे झेंडे दाखवणारे ओबीसी नेते गजू घोडके यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. गजू घोडके यांना पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅली दरम्यान काळे झेंडे दाखवण्याचा त्यांनी इशारा दिला होता.

मनोज जरांगे यांचे नाशिकमध्ये दिमाखात स्वागत झाले. मालेगाव स्टँडवर जेसोबी तून २०० किलो वजनाचा २५ फूट हार घालून मनोज जरांगे यांचं स्वागत करण्यात आले. मनोज जरांगे यांनी रॅलीही काढली. पण त्यादरम्यान त्यांची प्रकृती बिघडली. मनोज जरांगे यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांनी कारवर बसून घेतले. सुरुवातीला ते उभे राहून सर्वांचे अभिवादन करत होते. पण त्यानंतर सनरुफमधून गाडीवर बसून उपस्थितांना अभिवादन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

LDL cholesterol: निरोगी व्यक्तीची कोलेस्ट्रॉल लेव्हल किती? ही रेंज माहित आहे का?

Dark elbows causes: कोपर काळं पडतंय? धूळ-मळ समजून दुर्लक्ष करू नका, शरीरातील ‘या’ गंभीर समस्येचा असू शकतो संकेत

SCROLL FOR NEXT