Manoj Jarange Patil Saam Digital
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : तर तुमच्यावर वाईट वेळ येईल; मनोज जरांगेंनी भाजपच्या बड्या नेत्याला दिला इशारा

Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis : मनोज जरांगें पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून टार्गेट केलं आहे. छगन भुजबळ यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत

Sandeep Gawade

मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली सुरू झाल्यापासून मनोज जरांगें पाटील सातत्यांने छगन भुजबळ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांच्यावर गंभीर टीका करत आहेत. आज धाराशिवमध्येही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना, छगन भुजबळ यांच्या नादी लागू नका, नाहीतर तुमच्यावर वाईट वेळ येईल, असा इशारा दिला आहे.

देशात केवळ मराठ्यांच्याच सरकारी नोंदी आहेत. त्यामुळे नोंदी रद्द केल्या तर 288 आमदार पाडणार म्हणजे पाटडणार. आम्हाला त्या वळणावरती नेवू नका. छगन भुजबळ यांना समझवून सांगा. धनगर बांधवाच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही. छगन भुजबळ यांचं ऐकू नका, ते दिशाभूल करतात. थोडं थांबां तुमचा कार्यक्रमच करतो, असा धमकी वजा इशारा भुजबळांना दिला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी विनाकारण द्वेष पसरवू नये. 1974 ला ओबीसी समाजाला 16 टक्के आरक्षण मिळालं आणि आम्ही एकत्र आलो की तुम्ही जातीयवादी म्हणून डाग लावता. अंतरवालीत शांततेत आंदोलन सुरू होत, मात्र आमच्यावर लाठीचार्ज झाला. देवेंद्र फडणवीस तुम्ही छगन भुजबळ यांना बळ देवू नका. भुजबळ यांच्या नादी लागून तुमच्यावर वाईट वेळ येईल. त्यांचं न ऐकता मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी मागणी त्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Marathi Singer Death: ज्येष्ठ मराठी गायक काळाच्या पडद्याआड; सुगम संगीताचा सुवर्णपर्व संपला, संगीत विश्वावर शोककळा

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

Pulao vs Biryani: पुलाव आणि बिर्याणीमध्ये काय फरक असतो?

Moringa Leaves Benefits: शरीराची शक्ती वाढवतात 'ही' औषधी पाने, दररोज अशाप्रकारे खाल्ल्यास होईल फायदा

18th Newsmakers Achievers Awards 2026: मुंबईत विविध क्षेत्रांतील उत्कृष्टतेचा गौरव

SCROLL FOR NEXT