Maratha Reservation Manoj Jarange News Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange: मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून पुन्हा आंदोलनाची घोषणा; २४ फेब्रुवारीपासून गावोगावी रास्ता रोको

Manoj Jarange Patil Andolan: मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २४ फेब्रुवारीपासून दररोज राज्यातील प्रत्येक गावात एकाचवेळी रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असं जरांगे यांनी जाहीर केलं आहे.

Satish Daud

Manoj Jarange Patil Maratha Reservation

राज्य सरकारने विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. परंतु, आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण हवंय, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे. सरकारने लवकरात लवकर सगेसोयरे अध्यादेशाचे लवकरात लवकर कायद्यात रुपांतर करा अन्यथा मोठं आंदोलन करू, असा इशाराच जरांगे यांनी दिला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात बुधवारी (२१ फेब्रुवारी) मराठा समाजाची बैठक बोलावली होती. या बैठकीत मराठा आरक्षणावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यानंतर जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

येत्या २४ फेब्रुवारीपासून दररोज राज्यातील प्रत्येक गावात एकाचवेळी रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असं जरांगे यांनी जाहीर केलं आहे. आपल्या मागण्या मान्य करण्याबाबत त्यांनी सरकारला २२ आणि २३ फेब्रुवारी या दोन दिवसांची मुदत दिली. (Latest Marathi News)

त्यानंतर दररोज गावागावात आंदोलन केलं जाईल, असं जरांगे यांनी सांगितलं आहे. आंदोलन करताना कोणीही जाळपोळ करायची नाही. आंदोलनाचा दहावी-बारावीच्या परीक्षांवर परिणाम होता कामा नये, असेही मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना सांगितलं आहे.

येत्या २९ फेब्रुवारीपर्यंत आमच्या मागण्यांची अंमलबजावणी केली नाही, तर १ मार्च २०२४ पासून राज्यातील वृद्ध महिला व पुरुष यांनी आमरण उपोषणाला बसायचे आहे, असंही जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना सांगितलं आहे.

आंदोलन करताना एकाचाही जीव गेला, तर त्यास सरकार जबाबदार असेल, असा इशाराही जरांगे यांनी दिला आहे. तसेच ३ मार्चला संपूर्ण राज्यात जिल्ह्याच्या वतीने एकाच ठिकाणी एकच रास्ता रोको करायचा, अशी माहिती देखील मनोज जरांगे पाटील यांनी बैठकीत दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

Maharashtra Election : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात दोन्ही सेनेचे शिवसैनिक आमनेसामने; पुढे नेमकं काय घडलं? वाचा

VIDEO : केलंय काम भारी, लुटली तिजोरी; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

AUS vs PAK: बाबर आझमने टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये विराटला सोडलं मागे

SCROLL FOR NEXT