Manoj Jarange Patil addressing supporters after giving the “Chalo Delhi” call for a national Maratha convention. Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange: जरांगेंचा चलो दिल्लीचा नारा, देशभरातील मराठ्यांना साद घालणार

Maratha vs OBC Showdown: मुंबईतल्या आंदोलनानंतर जरांगेंनी देशभरातल्या मराठ्यांची मोट बांधण्यासाठी नवी रणनिती आखलीय.. जरांगेंचं पुढचं टार्गेट काय आहे? मराठा आरक्षणानंतर जरांगे कोणत्या मुद्द्यासाठी मैदानात उतरणार आहेत?

Suprim Maskar

आरक्षणासाठी मराठ्यांनी मुंबईत चक्काजाम केला.. त्याच्या आंदोलनाला यश मिळालं आणि गुलाल उधळून मराठे गावाकडे परतले.. त्यानंतर राज्यात हैदराबाद गॅझेटियरही लागू करण्यात आलयं... मात्र आता मराठ्यांचं वादळ दिल्लीमध्ये धडकणार आहे. खुद्द जरांगे पाटलांनीच चलो दिल्लीचा नारा दिलाय...

हैदराबाद गॅझेटियर लागू झाल्यानंतर ओबीसी समाजानं आक्रमक भूमिका घेतली..ओबीसींकडून जीआरला विरोधही करण्यात आला...मात्र सरकार आता सातारा गॅझेटियर लागू करण्याच्या तयारीत आहे.. त्याच पार्श्वभूमीवर जरांगे पाटील दिल्लीत अधिवेशन घेणार आहे.. लवकरच अधिवेशनाची तारीख जाहीर केली जाणार आहे...भुजबळ आणि जरांगेंचं वैर सर्वश्रूत आहे...

ओबीसी आरक्षण मिळाल्यानंतर भुजबळांनीही देशभरातल्या ओबीसींना एकत्र करण्यासाठी चलो दिल्लीचा नारा दिला होता...त्यांना शह देण्यासाठीच जरांगेंनीही देशभरातल्या मराठ्यांना एकत्र करण्याची रणनीती आखल्याची चर्चा आहे. यासाठी जरांगे राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, तामिळनाडूतल्या मराठ्यांना साद घालणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात कधीही आणि कुठेही लाखांची गर्दी जमवणाऱ्या जरांगेंच्या या राष्ट्रीय मेळाव्याला कसा प्रतिसाद मिळणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर कुणी फेकला रंग? खोडसाळपणा की महाराष्ट्र पेटवण्याचा डाव?

अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी; तोंडाशी मुलीचं लग्न,यवतमाळमधील शेतकऱ्याच्या मदतीला धावले आमदार शिवतारे, उचलणार लग्नाचा खर्च

Maharashtra Politics: फडणवीसांनी फुंकलं पालिकेचं रणशिंग, ठाकरे ब्रँडवरून राजकारण पेटलं, कुणाचा ब्रँड? कुणाचा वाजणार बँड?

वेळ येणार, धरणे आणि संपूर्ण जम्मू-काश्मीर...; पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाइंडची भारताला धमकी

Ajit Pawar Distributes Kunbi Certificates: मराठवाड्यात कुणबी दाखल्यांचं वाटप सुरू, भुजबळांचा सवाल – दाखले आधीच शोधून ठेवले होते का?

SCROLL FOR NEXT