Manoj Jarange vs Chhagan Bhujbal Latest News  Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange News: मनोज जरांगे यांचा बॅनर फाडला, पोलिसांत गुन्हा दाखल; एफआयआरमध्ये छगन भुजबळांचं नाव

Manoj Jarange vs Chhagan Bhujbal: राज्यात एकीकडे ओबीसी विरुद्ध मराठा असा आरक्षणाचा वाद पेटला असताना दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली.

डॉ. माधव सावरगावे

Manoj Jarange vs Chhagan Bhujbal

राज्यात एकीकडे ओबीसी विरुद्ध मराठा असा आरक्षणाचा वाद पेटला असताना दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. गंगापूर तालुक्यातल्या गवळी शिवरा इथं मनोज जरांगे पाटील यांचा लावण्यात आलेला बॅनर अज्ञात व्यक्तीने फाडला. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला त्यावरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विशेष म्हणजे एफआयआरमध्ये मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचं नाव आहे. ओबीसी एल्गार मेळाव्यात बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाचे आरक्षणाचे बॅनर काढून टाका, असे बोलल्यामुळे बॅनर फाडण्यात आल्याचा आरोप पोलिसांच्या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.

संदीप भाऊसाहेब औताडे यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, थेट भुजबळ यांचे एफआरमध्ये नाव आल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुन्हा ओबीसी विरुद्ध मराठा असा वादही रंगण्याची चिन्हे आहेत.

Edited by - Satish Daud

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नागपूर ते मुंबईला जाणाऱ्या रस्त्यावरील गवळी शिवरा कमानीजवळ मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा साखळी उपोषणाचे बँनर फाडण्यात आले आहे. सर्व प्रकारास छगन भुजबळ हे जबाबदार असून त्यांच्या विरुद्ध प्रक्षोभक भाषण करुन त्यांनी सकल मराठा समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे.

मंत्री छगन भुजबळ यांचे विरुध्द कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. छगन भुजबळ यांनी जालन्यातील ओबीसी मेळाव्यात मार्गदर्शन करताना मनोज जरांगे पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. तसचं त्यांनी महाराष्ट्रामध्ये गावोगावी लावलेले मराठा समाजाचे आरक्षणाचे बँनर काढून टाका अशा प्रकारचे चिथावणीखोर वक्तव्य केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT